Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशात गेल्या काही वर्षाआधी चांद्रयान लाँच करण्यात आले होते पण ते अयशस्वी झाल्यानंतर आज पुन्हा एकदा चांद्रयान-2 लाँच झाल्यानंतर 3 वर्षे, 11 महिने आणि 23 दिवसांनी भारत चांद्रयान-3 मिशन लॉन्च करणार आहे. दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM3-M4 रॉकेटद्वारे ते अवकाशात पाठवले जाईल. या मोहिमेद्वारे भारताला आपली अंतराळ शक्ती जगाला दाखवायची आहे. मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरेल. चांद्रयान-३ अंतराळयानामध्ये तीन लँडर/रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहेत. सुमारे 40 दिवसांनंतर म्हणजेच 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काल १३ जुलै रोजी कोकण दौऱ्यावर होते. दापोली, चिपळून आणि खेड येथील मनसे कार्यकर्त्यांशी राज ठाकरेंनी पक्षबांधणी संदर्भात संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी खेडमध्ये भाषण करताना स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच खेडमधील जनता मनसेच्या उमेदवारांना नक्की साथ देतील, असा विश्वासही राज ठाकरे यांनी बोलून दाखवला. राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, “माझ्यासमोर तुम्ही सर्वजण बसला आहात. मला तुमची साथ हवी आहे, अशी माझी अपेक्षा आहे. ऐन मोक्याच्या वेळी मला तुमची साथ हवी आहे. मला फक्त एवढंच सांगायचंय की मागच्या वेळी ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. पण आता नगरपरिषदेच्या निवडणुका आपल्याला स्वबळावर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील मेहरूण तलावाच्या ट्रॅकजवळ अज्ञात चार जणांनी दुचाकीवर येऊन, बाकावर बसलेल्या दोन युवकांवर चाकूने वार करून त्यांना जखमी करत त्यांच्याजवळील महागडे मोबाइल जबरीने हिसकावून पसार झाल्याची घटना घडली. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन संशयितांना अटक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमांशू शशिकांत कुटे (वय २५) हा युवक मूळ वाशिम येथे राहणारा असून, जळगाव शहरात शिक्षणासाठी महाबळ परिसरात राहतो. मंगळवारी रात्री ११ वाजता हिमांशू आपला मित्र देवेश चव्हाण (वय २४) याच्यासोबत मेहरूण तलाव वॉकिंग ट्रॅकवरील बाकावर बसला होता. त्यावेळी चार अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले. एकाने चाकूने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील आत्महत्या कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला शौचासाठी गेलेल्या एका युवकाला रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ९:३० वाजता घडली. भावेश मुरलीधर सोनार (वय २८) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हरिविठ्ठलनगर भागात भावेश सोनार हा युवक आपल्या आई, वडील व मोठ्या भावासह वास्तव्याला होता. बुधवारी रात्री घरी आल्यानंतर ९:०० वाजेच्या सुमारास घरातून शौचासाठी निघाला. रात्री ९:३० वाजेच्या सुमारास आत्महत्या कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅकलगत रेल्वेचा धक्का लागल्याने भावेशचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती रेल्वे ट्रॅकलगत असलेल्या काही युवकांनी रात्री पोलिसांना दिली. हरिविठ्ठल नगरातील काही…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशात सुरु असलेले गुन्हेगारी कृत्य कुठेही थांबायचे नाव घेत नाही आहे नुकतेच बेपत्ता झालेला मुलगा 8 वर्षांनतर सापडला आहे. मात्र, हा मुलगा आठ वर्षे कुटे गायब झाला होता हे समजल्यावर पोलिसांना देखील धक्का बसला आहे. कारण, या मुलाचे अपहरण त्याच्या जन्मदात्या आईनेच केले होते. जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलाला लैंगिक गुलाम बनवले होते. लैंगिक गरज भागवण्यासाठी आईने मुलाला कैद करुन ठेवले होते. टेक्सासमध्ये ही घटना घडली आहे. 8 वर्षांपूर्वी एक 25 वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला होता. तो आपल्या दोन कुत्र्यांना फिरायला घराबाहेर पडला आणि अचानक गायब झाला. 2015 मध्ये तो बेपत्ता झाला होता. आता तो सापडला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याच्या राजकारणात शरद पवार, उद्धव ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर निघाले असतांना आता त्यांच्या पाठोपाठ राज ठाकरे देखील बाहेर पडले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचे चित्र दिसू लागले आहे. आजपासून कोकण दौऱ्याला सुरुवात केली असून आज चिपळूणमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. येत्या पंधरा दिवसांमध्ये राज ठाकरे पक्षाचा मेळावा घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यामध्ये जो व्यभिचार सुरु आहे तो मी कधीही करणार नाही. तडजोड करावी लागली तर घरात बसेन परंतु तडजोड करणार नाही. कार्यकर्त्यांनी मनाने एकत्र येऊन काम करणं आवश्यक असल्याचं राज यांनी सांगितलं. राज ठाकरेंनी आजपासून कोकण दौऱ्याला सुरुवात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  दुचाकी चोरीचा आरोप करीत पुणे येथे कंपनीत असलेल्या नितीन दत्तू पाटील या तरुणाला ताब्यात घेत त्याला डांबून ठेवत बेदम मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलिस निरीक्षकांसह पाच कर्मचान्यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे. या प्रकरणी १३ जुलै २०२३ रोजी आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे. तरुणाच्या आईने नशिराबाद पोलिस ठाण्यासह पोलीस अधीक्षकांकडे पाठपुरावा केला. अखेर उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत संबंधितांवर कारवाई करण्यासह पाच लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मूळ नाचणखेडा, ता. जामनेर येथील रहिवासी असलेल्या यमुनाबाई दत्तू पाटील या सध्या शिवकॉलनीत राहतात. त्यांचा मुलगा नितीन हा पुणे येथे कंपनीत कामाला असताना त्याला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असलेले नुकतेच दिल्ली दौऱ्यावरून राज्यात परत आले असून दिल्लीत ठरल्याप्रमाणे आज राज्यातील खाते वाटप होणार असून मात्र मंत्रीमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर होणार असल्याची बातमी बाहेर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन जवळपास १० दिवसांचा काळ उलटला. मात्र, अद्यापही नवीन सरकारच्या खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून रस्सीखेच सुरू आहे. अशातच खातेवाटप आणि राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता मावळली आहे. सगळ्यात पक्षातील नेते विस्ताराकडे लक्ष लावून बसले आहेत यावेळी पण आमदार पदरी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  आज पहाटेच्या सुमारास कल्याण येथून भीमाशंकरला जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला आंबेगाव तालुक्यातील गीरवली येथे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. येथील स्मशानभूमी जवळ असणाऱ्या ओढ्यावरील पुलावरून वीस फूट खोल ओढ्यात बस कोसळून अपघात झाला असून या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. काही प्रवाशांना किरकोळ मार लागल्याची माहीती आहे. सदर गाडीमध्ये एकूण 35 प्रवासी होते. त्यापैकी दोघांना थोडीशी दुखापत झाली असून बाकी सर्व सुखरूप आहेत. घटनास्थळी पाच रूग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

यावल : प्रतिनिधी  तालुक्यातील कोळवद शिवारात बैलगाडीला विद्युत तारांचा धक्का लागल्याने बैलजोडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर बैलगाडीतील सहा 1 जणांचा जीव वाचल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोळवद येथील शेतकरी सुनील अशोक चौधरी मंगळवारी शेतमजुरांसोबत बैलगाडी घेऊन कामाला गेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास शेतातील पेरणीचे काम आटोपून परत येत असताना रस्त्यावर वीज खांबांच्या तणावासाठी लावलेली चिनीप्लेट तुटली होती. यात विद्युत प्रवाह उतरला होता. यास बैलगाडीचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. प्रसंगावधान राखत सर्वांनी तत्काळ बैलगाडीतून उड्या घेतल्याने त्यांचा जीव वाचला. एक लाख रुपये किमतीची ही बैलजोडी होती. शासनाकडून शेतकऱ्याला…

Read More