जळगाव : प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजी नगराजवळील एका परिसरात भर दिवसाच्या सुमारास एकाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामुळे बराच वेळ परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती जळगाव शहर पोलिस स्थानकात जाताच पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसराच्या मागील बाजूस असलेले हुडको परिसरातील एका गल्लीत आज दि.१७ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जुन्या वादातून वाद सुरु होता. त्यामुळे घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झालेली होती. हा वाद इतक्या टोकाला गेली लोकांची गर्दी पगाविन्यासाठी एकाने हवेत गोळीबार केल्याने जमलेले लोक तत्काळ घटनास्थळाहून निघून गेले याची माहिती जळगाव शहर पोलिसांना माहित पडतच त्यांनी घटनास्थळी…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था भाजप व शिवसेनेसोबत जावून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्षाध्यक्ष शरद पवार यांची घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पोहोचलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी मंत्र्यांनी रविवारीच पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या गोटातील आमदार शरद पवारांची भेट घेणार आहेत. शरद पवार वाय बी सेंटरमध्ये उपस्थित नाहीत. ते थोड्याच वेळात तिथे पोहोचतील. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांना बजावलेले व्हीप तथा विरोधी पक्षांच्या बंगळुरूतील बैठकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी होत असल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी…
नागपूर : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या ८ नेत्यांनी राज्यातील शिवसेना-भाजपसोबत सत्तेत सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या ८ आमदारांसह मंत्रीपदाची शपथ देखील घेतली. त्यानंतर रविवारी अजित पवारांसह ८ आमदारांनी थेट शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधान आले होते. तर आजपासून १७ जुलै म्हणजेच आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात राजकीय खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आधीपासून वर्तवली जात होती. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्या काही मिनिटांमध्ये त्याचा प्रत्यय आला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या सभागृहाचं कामकाज सुरू होताच विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्या मंत्र्यांचा परिचय करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उभं राहून नव्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक धार्मिक स्थळावर पर्यटक विचित्र कपडे घालून फोटोसेषन करीत वादग्रस्त व्हिडीओ नियमित चर्चेत येत असतात त्याच कारणाने केदारनाथ मंदिर प्रशासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केदारनाथ मंदिरात मोबाईल फोन घेऊन जाण्यास, फोटो काढण्यास आणि व्हिडिओ बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिराच्या व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने यासंदर्भातील सूचना फलक मंदिर परिसरात ठिकठिकाणी लावले आहेत. मंदिर परिसरात मोबाईल फोन घेऊन प्रवेश करू नका, मंदिराच्या आवारात कोणत्याही प्रकारचे फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी करण्यास पूर्णपणे मनाई असून तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आहात, असे या सूचना फलकांमध्ये सांगण्यात आले आहे. केदारनाथ मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील आराधना कॉलनीतील रहिवासी असलेल्या रुशील प्रवीण चौधरी वय – २१ यांचे सोमवार दि.१७ रोजी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ११ वाजता मू.जे.महाविद्यालय मागील घरून निघणार आहे. नेरी नाका स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. रुशील हा कॉम्प्युटर बीमचे संचालक संजय चौधरी, किशोर चौधरी यांचा पुतण्या तसेच उडान दिव्यांग फाउंडेशनच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी यांचा मुलगा होता. त्यांच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, काका, काकू, आत्या, मामा, भाऊ, भावंडे असा परिवार आहे.
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील खडका येथील जिनिंग मिल परिसरातील एका खोलीमध्ये रविवारी सकाळी एक महिला विवस्त्र व बेशुद्धावस्थेत आढळून आली. भुसावळ तालुका पोलिसांनी तिला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल केले आहे. या महिलेची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खड़का येथील जिनिंग मिल परिसरातील एका खोलीमध्ये ५९ वर्षीय महिला बेशुद्धावस्थेत पडलेली असल्याची माहिती भुसावळ तालुका पोलिसांना मिळाली. त्या वेळी सहायक पोलिस निरीक्षक रुपाली चव्हाण, पोहेकॉ संजय तायडे, पोकॉ. संगीता निळे हे घटनास्थळी पोहोचले. या महिलेला भुसावळ येथे ट्रॉमा सेंटर येथे नेण्यात आले. नंतर तेथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. येथे तिच्यावर उपचार…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील २८ वर्षीय महिलेचा विहिरीत पाणी काढताना पाय घसरून पडल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. पुनम राहुल पाटील (२८, मराठे गल्ली, धरणगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पाटील परिवारातील सदस्य भोणे शिवारातील आपल्या शेतात कापूस पिकाला खत देण्यासाठी गेले होते. यावेळी पुनम पाटील यांनी पती राहुल यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांना खताच्या गोण्या उचलून दिल्या. सुमारास जेवण करण्यासाठी पुढे पांडुरंग पाटील यांच्या विहिरीवर गेली. बराच वेळ झाला म्हणून इतर सदस्य विहिरीजवळ गेले असता पुनम या त्या ठिकाणी दिसल्या नाहीत. म्हणून त्यांनी विहिरीत डोकावले असता पुनम त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.…
जळगाव : प्रतिनिधी लग्नापूर्वी पतीचे ज्या महिलेशी प्रेमसंबंध होते, त्या महिलेने घरी येऊन तुझ्या पतीला माझ्याकडे पाठव, नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी देत या ‘पतीदेवा’च्या पत्नीला मारहाण केल्याची घटना १४ जुलै रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या घडली. याप्रकरणी १५ जुलै रोजी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीच्या बचावासाठी या पत्नीने पुढाकार घेत महिलेविरुद्ध फिर्याद दिली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणाचे गेल्या सात ते आठ वर्षांपासून एका महिलेसोबत प्रेम संबंध होते. मात्र या तरुणाचे लग्न झाल्याने त्याने सदर महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे सदर महिला या तरुणाच्या पत्नीला वारंवार फोन करून शिवीगाळ करीत असे.…
मुंबई : वृत्तसंस्था पावसाळ्यात किंवा भरतीच्या वेळी समुद्रात जाऊ असं आव्हान वारंवार केलं जातं. अनेकवेळा याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण हे नसतं धाडस जीवावरही बेतू शकतं. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समुद्राला उधाण आलं असताना एक जोडप समुद्रातील खडकावर बसून फोटोशूट करत होतं. तर त्यांचा मुलगा मोबाईलमध्ये त्यांचा व्हिडिओ बनवत होता. पण तो क्षण त्यांच्या आयुष्यातला शेवटचा ठरला. मुलाच्या मोबाईलमध्ये त्याच्या आईचा मृत्यूचा थरार कैद झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना प्रत्येकासाठी इशारा आहे. समुद्राला उधाण आलं असताना समुद्रापासून दूर राहिला पाहिजे. थोडीसी मस्करी जीवावार बेतू शकते. नेमकं याकडेच या जोडप्याने…
जळगाव : प्रतिनिधी गार्डन डेव्हलपींगसाठी रोपे पाठविण्याच्या नावाखाली तरुणाला २५ लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी रामानंद अगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्युत कॉलनीमध्ये राहणारे दीपक बळीराम चौधरी हे वास्तव्यास असून यांचा गार्डन डेव्हलपींगचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांना विविध प्रकारचे झाडे लागत असल्याने गेल्यावर्षी दि. ५ जानेवारी २०२२ मध्ये त्यांनी शंकर गवळा रा. चित्रदुर्ग कर्नाटक यांच्यासोबत संपर्क साधला होता. त्यांनी मला गार्डन डेव्हलपींगसाठी लागणाऱ्या झाडांबाबत सांगितले असता, शंकर गवळी यांनी त्यांना सागवान व इतर झाडे घेण्यासाठी चित्रदुर्ग येथे बोलावून घेतले. त्यानुसार दीपक चौधरी यांनी तेथे जावून सुमारे दीडलाख रुपयांचे रोखीने झाडे खरेदी केली होती. त्यानंतर…

