Author: editor desk

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव – यावल रस्त्यावर एका २८ वर्षीय तरुण लोखंडी गावठी पिस्तुल बाळगताना आढळून आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, तालुक्यातील किनगाव – यावल रस्त्यावरील मेष ठिबक कंपनीजवळ दि १२ रोजी ३ वाजेच्या सुमारास एक २८ वर्षीय तरुण काळ्या रंगाच्या दुचाकीसोबत ३० हजार रुपये किमतीची गावठी पिस्तुल व मॅक्झीनसह आढळून आला. संशयित आरोपी गोलुसिंग दिलीपसिंग भाटीया (वय २८, रा.) बेह्राम्पुरातील जि.खरगोन मध्यप्रदेशयेथील रहिवासी आहे. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास यावल पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबाहले हे करीत आहेत.

Read More

नशिराबाद : प्रतिनिधी एका १७ वर्षीय अल्पवयीन युवतीस लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी संबध ठेवत ७ महिन्याची गरोदर केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसात एका विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, एका १७ वर्षीय युवतीस लग्नाचे आमिष दाखवीत वेळोवेळी संबध प्रस्थापित करत तिला सात महिन्याची गर्भवती केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पीडित युवतीच्या वडिलांनी दि १२ रोजी नशिराबाद पोलीस स्थानकात धाव घेत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील रहिवासी विशाल तानाजी पवार याच्या विरोधात बलात्कारचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. जळगाव तालुक्यातील पाथरी शिवारात झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते शेतकर्‍यांशी बोलत होते. दरम्यान, सध्या गुरांवर लंपी या संसर्गजन्य रोगाचा प्रकोप वाढीस लागला असून याचा प्रतिकार करण्यासाठी लसीकरणाला गती देण्याचे निर्देश आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. तर, याप्रसंगी त्यांनी आमदार निधीतून पाथरी ते जवखेडा रस्ता तयार करून देण्याची ग्वाही दिली. सध्या गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू असून आज ना.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहराजवळ कांताई बंधारा नागाई-जोगाई मंदिर परिसरात शिवाजी नगर परिसरातील मुलांनी रविवारची ट्रीप काढली होती. यावेळी अचानक एका मुलीचा पाय घसरल्यामुळे ती पाण्यात पडली. एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्नात चार मुलं पाण्यात वाहून जात होती. त्यातील तिघांना वाचविण्यात यश आले तर एक तरुण बेपत्ता होता. अखेर मागील १३ तासांनंतर त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. शहराजवळ कांताई बंधाऱ्याजवळ दुपारी 2 मुली आणि 2 मूल बुडाले होते. यापैकी 2 तरुणी व 1 तरुणास पाण्यातून बाहेर काढण्यात यशस्वी झाले आहे. मात्र नयन योगेश निंबाळकर (वय १७) हा तरुण सापडला नव्हता. नयनला शोधण्यासाठी महानगरपालिकेचे अग्नीशमन दलाचे पथक, पोलिस प्रशासनासोबत जैन इरिगेशनच्या पथकाने प्रयत्न…

Read More

एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अनेक चढ-उतार येतात. कधीकधी अशी परिस्थिती येते की, पैसे उधार घेण्याची इच्छा नसते मात्र गरजच इतकी असते की पैसे उधार घ्यावे लागतात. यावेळी तुम्ही तुमचे नातेवाईक, मित्र किंवा बँकेकडून पैसे कर्जाच्या स्वरुपात घेता. परंतु जेव्हा तुम्ही घेतलेले पैसे परत करू शकत नाही तेव्हा समस्या अधिकच बिकट होते. बऱ्याचवेळा पैशांची जुळवाजुळव करुनही तुम्ही कर्जाची परतफेड करू शकत नाही. कधी कधी परिस्थिती अशी येते की तुम्हाला कर्जापेक्षा व्याजच अधिक द्यावे लागते. ज्योतिष शास्त्रानुसार, हे सर्व घडते कारण तुम्ही आर्थिक व्यवहार करताना दिवस आणि नियम लक्षात न ठेवता व्यवहार करता. दरम्यान, ज्योतिष शास्त्रात आठवड्यातील कोणत्या दिवशी तुम्ही पैशाशी संबंधित व्यवहार…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील कुंड पुलावर गणपती विर्सजनाची आरती सुरु असतांना डोलारखेडा फाट्याकडून येणाऱ्या एका भरधाव आयशरने दिलेल्या धडकेत तरुण ठार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कुंड पुलावर दि. १० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास चिखली येथील काही तरुण विसर्जनासाठी आले होते. यावेळी गणपती विर्सजनदरम्यान श्री गणेशाची कुंड पुलावर आरती सुरु असतांना डोलारखेडा फाट्याकडून येणाऱ्या नवीन आयसर गाडीवरील ड्रायवरने (नाव-गाव माहीत नाही) त्याच्या ताव्यातील आयशर गाडी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत चालवित आणून भागवत ऊर्फ शंकर कांडेलकर (कोळी, वय-२७ रा. चिखली) यांच्या मरणास तसेच इतरांना जखमी केले. तसेच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १२व्या भारतीय छात्र संसदेचे दि.१५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान स्वामी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे आयोजन केले आहे. सन २०११ पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून, छात्र संसदेचे हे बारावे वर्ष आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे. अनेक राष्ट्रीय संस्थांनीही या संसदेला पाठिंबा दिला आहे. बाराव्या भारतीय…

Read More

पैठण : वृत्तसंस्था राज्यात शिंदे गट व ठाकरे गट वाद आता चव्हाट्यावर आला असतानाचा पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी पैसे देवून गर्दी जमविण्यात आल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. मंत्री संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ असलेल्या पैठणमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत संदिपान भुमरे शक्तिप्रदर्शन करणार असून आज होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान यासंदर्भात एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या सभेसाठी महिलांना प्रत्येकी ३०० रूपये देण्याची मागणी करताना या क्लिपमध्ये ऐकायला येत आहे. तर समोरचा व्यक्ती एका महिलेला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका प्रसिद्ध महिला डॉक्टरास सोशल मिडीयाच्या व्हाट्सॲपद्वारे एका व्यक्तीने अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरांच्या व्हाट्सॲपवर अज्ञात व्यक्ती अश्लील संदेश पाठवीत व्हाईस कॉलिग करीत घाणेरड्या भाषेत बोलत होता. अनोळखी मोबाईल क्र.८७८८६५ ८२७६ या क्रमाकाहून महिला डॉक्टरास त्रास देण्याचा प्रकार गेल्या २७ ऑगस्ट पासून २०२२ सुरु आहे. याप्रकरणी महिला डॉक्टरच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि.लीलाधर कानडे हे करीत आहेत.

Read More

फैजपूर : प्रतिनिधी शहरातील फैजपूर मर्चट सोसायटीत एका व्यक्तीने तब्बल ४ कोटी २० लाख रुपयाचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, रविद्र भागवत जावळे (वय ६०, धंदा शेती व व्यापार रा. फैजपूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, जावळे यांच्या नातेवाईकाकडून उमेश मुकुंद वाणी (वय ५०, धंदा : व्यापार, रा.ढाके वाडी जळगाव), अशोक गोपनाथ मंडोरे (वय ६० रा.श्रद्धा बंगला, गणपती नगर जळगाव), प्रदीप अरुण वाणई (वय ४०, रा. खान्देस मिल कॉलनी,जळगाव), संजय मोतीराम जैन (वय ४५, रा. जळगाव, जि.के.भारंबे (वय ६१, सेवानिवृत्त…

Read More