जामनेर : प्रतिनिधी
शहरातील शिवाजीनगर परिसरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका व्यक्तीचे अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून कपाटाचे लॉक तोडून आतील सोन्या चांदीचे दागिने व रोकड लांबवण्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दररोज होणाऱ्या घोरपडी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
मिळालेली माहिती अशी की शिवाजीनगर परिसरात राहणारे व व्यापारी असणारे सुरज कुमार राजमल संकुचा वय 46 हे भाड्याच्या घरात राहत असून त्यांच्या घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉक तोडून त्यामधील दोन लाख 85 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने, 55 हजारांची रोकड आणि बारा हजार रुपये किमतीचे तीन घड्याळ असा एकूण तीन लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविण्याचा प्रकार 14 जुलै ते 15 जुलै च्या सकाळी अकरा वाजे च्या सुमारास घडला या प्रकरणी सुरज कुमार संकोचा यांनी जामनेर पोलीस स्टेशनला धाव घेऊन 15 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.