धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात गेल्या काही महिन्यापासून एकना अनेक घटना नियमित घडत असतांना आता पुन्ह्या एका महाविद्यालयाच्या घटनाबाह्य व भ्रष्ट कारभारासंदर्भात बातमी समोर आली आहे. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, धरणगाव येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यायातील विविध घटनाबाह्य व भ्रष्ट कारभारासंदर्भात जानेवारी २०२० मध्ये महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रविण बोरसे यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पुराव्यासह केलेल्या तक्रारी संदर्भात प. रा. हायस्कूल व्यवस्थापन मंडळ, धरणगाव आणि जळगाव विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने तत्कालीन प्राचार्य बिराजदार यांना चौकशी समितीने दोषी ठरवलेले असतानाही क्लिनचीट देऊन अभय दिल्याबद्दल १७ ऑगस्ट २०२३ पासून डॉ. बोरसे आमरण उपोषणास बसत आहेत. २०१२ पासून महाविद्यालयात…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे व फडणवीस यांच्या सत्तेत अजित पवार सहभागी झाल्यापासून शिंदे गटाला मोठी चिंता लागून होती, यातील अनेक नेत्यांनी उघडपणे बोलून देखील दाखविले होते तर गेल्या तीन दिवसापासून पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाचे वारे सुरु असतांना आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच्या पत्नी लता शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. दि.१७ ऑगस्ट रोजी वांद्रे येथील ताज लॅन्डस् एन्ड या हॉटेलमध्ये संध्याकाळी 7 वाजता हे स्नेहभोजन पार पडणार आहे. अजित पवार गट मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांसाठी आयोजित केलेले हे पहिलेच स्नेहभोजन असणार आहे. यावेळी मुख्यमंत्री मंत्र्यांसोबत बैठकही घेणार असल्याचे बोलले…
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पदभार घेतल्यापासून अनेक वाळूमाफियावर मोठा वचक लागला आहे. तर दुसरीकडे महसूल प्रशासन थेट कारवाई करीत असल्याने वाळूमाफियामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. धरणगाव तालुक्यातील मौजे आव्हाणी येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चेसिस क्र QZTM31619084832 हे राहुल रमेश धनगर रा.पाळधी ता धरणगाव यांचे मालकीचे असून सदर वाहन पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे सदरची कारवाई श्री मनिषकुमार गायकवाड उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग यांचे मार्गदर्शनाखाली धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, पाळधी मंडळ अधिकारी अमोल पाटील, भरत पारधी मंडळ अधिकारी धरणगाव समा तडवी पोलीस कर्मचारी यांनी केली आहे
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये आज 3.4 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला आहे. हे भूकंपाचे धक्के सकाळी 6.45 च्या सुमारास जाणवले आहेत. भूकंपाचे केंद्रस्थळ 5 किमी खोल असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली असल्याची माहिती समोर आलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज १६ ऑगस्ट सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह जवळच्या…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसापासून अजित पवार यांच्या हालचालीमुळे महाविकास आघाडीसह सर्वच पक्षामध्ये खळबळ निर्माण होत असतांना आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री होता येईल ही अट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार समोर ठेवली आहे. त्यामुळेच अजित पवार हे शरद पवारांचे समर्थन मिळवण्यासाठी वारंवार त्यांची भेट घेत असल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे.’ त्याचबरोबर पुढे वड्डेटीवार म्हणाले की, ‘अजित पवार हे शरद पवारांना भेटण्यासोबतच त्यांच्या सोबत येण्यासाठी दया,…
जळगाव शहरातील मेहरून तलावावरील जॉगिंग ट्रॅकवर १५ रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान एकाच्या दुचाकीला ठोस मारून अपघात झाल्याच्या कारणावरून चौघांनी मिळून तरुणाला मारहाण करून त्याच्याकडून मोबाईल घड्याळ आणि रोकड लुटून पसार झाल्याची घटना घडली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहरून रोडवरील गुलाब बाबा कॉलनीमधील तारीक अल्ताफ खाटीक (वय २३) हा खाजगी नोकरी करीत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. १५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मेहरून तलावाच्या जॉगिंग ट्रॅकवर आला असता तेथे एक पल्सर मोटरसायकलवर आलेल्या व्यक्तीने त्याच्या मोटरसायकलला ठोस मारून अपघात झाल्याच्या कारणावरून इतर दोन व्यक्ती आणि…
यावल : प्रतिनिधी यावल पश्चिम व पुर्व वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारावर केलेल्या संयुक्त कारवाईत सुमारे १२ लाख रूपये किमतीच्या वाहतुक मोटरसह सुमारे ३० हजार रूपये किमतीचे लाकुड जप्त केलेले आहे. वनविभागाच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहिती अनुसार दि. १४ ऑगस्ट सोमवार रोजी रात्री ४ ते ६ वाजेच्या दरम्यान उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव यांचे कडून मिळालेल्या गुप्त माहिती वरून यावल ते किनगाव रस्त्याने गस्त करीत असलेल्या वन विभागाच्या पथकास चुंचाळे गावा जवळ संशयितरित्या जात असलेल्या वाहन क्रमांक.एमएच २८ बी ८५४३ याचा अटकाव करून वाहनाची तपासणी केली असता अवैधरित्या विनापरवाना (बिनापासी ) लाकूड तसेच यावल ते हरिपुरा रस्त्याने गस्त करित असताना वाहन…
सांगली : वृत्तसंस्था राज्यात गेल्या महिन्याभरापासून अनेक वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एका नव्या वक्तव्याने चर्चेत आले आहे. आज मंगळवारी सांगलीत आपल्या सहकाऱ्यांसह पदयात्रा होती. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. भिडे यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनीच ही पदयात्रा काढल्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. भारताचा राष्ट्रध्वज भगवा करण्याच्या मागणीसाठी यांनी काढली. ‘भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजही भगवा असावा,’ असा त्यांचा युक्तिवाद आहे. भिडे यांच्या धारकऱ्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी यापूर्वीच 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी तिरंगा फडकवणार नाही व राष्ट्रगीतही म्हणणार नसल्याचे स्पष्ट केले होते. संभाजी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एक दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास आई वडील आपल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला थेट पोलीस स्थानकात घेवून आले मुलीचा अवस्था बिकट होती. तिची बोलण्याचीही मानसिकता नव्हती. यूपीच्या चित्रकूट जिल्ह्यातील हा प्रकार आहे. ही १० वीच्या वर्गात शिकणारी मुलगी होती. पीडित मुलीच्या आईनं पोलिसांना जे सांगितले ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. संध्याकाळी आई किचनमध्ये जेवण बनवत होती तेव्हा मुलीच्या रडण्याचा आवाज आला. आई धावत तिच्या रुममध्ये गेली तेव्हा ती बेडखाली पडून विव्हळत होती. कदाचित तिला पीरिड्सचा त्रास होत असेल असं आईला वाटले. परंतु आईनं तिला विचारल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला तो ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली. पीडित मुलीनं…
जळगाव : प्रतिनिधी शेतकरी, वंचित, दुर्लक्षित घटक, सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनात शासकीय योजना व मदतीच्या रूपाने नवी पहाट आणण्याचे काम शासन करत आहे. जिल्ह्यात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. यापुढेही जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाला सर्वोच्च प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी शुभेच्छा संदेशात पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, महानगर पालिका आयुक्त…

