Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला !
    राजकारण

    मोठी बातमी : अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला !

    editor deskBy editor deskJuly 16, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    अजित पवार यांनी सर्व मंत्र्यांसह शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांची वेळ न घेता संधी साधत अजित पवार गटाने त्यांची वायबी चव्हाण सेंटरवर भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार हे आमचे दैवत आहे, त्यांचे पायपडून आशीर्वाद घेतले असे म्हटले आहे. दरम्यान राष्ट्रवादी एकसंध राहावी यासाठी आम्ही शरद पवारांना विनंती केली असून त्यांवर त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही असे ही यावेळी पटेल यांनी म्हटले आहे. आता शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    पावसाळी अधिवेशनाआधी अजित पवार गटाच्या मंत्र्याची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ वाय. बी. चव्हाण सेंटरला पोहचले. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आज शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री वाय.बी. चव्हाण सेंटरला संधी साधून वेळ न मागता आलो होतो. यावेळी आम्ही त्यांचे आशीर्वाद घेतले असून सर्वांनी त्यांना विनंती केली आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध राहावा यासाठी मार्गदर्शन करायला हवे. मात्र, शरद पवार यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. मात्र, अद्याप विरोधी पक्षनेता कोण? यावर मविआतील घटकपक्षांचे एकमत झाल्याचे दिसत नाही. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीच याबाबत माहिती दिली आहे की, अजूनतरी विरोधी पक्षनेतेपदाबाबत काहीही चर्चा झालेली नाही. तसेच, आपण विरोधी पक्षनेतेपद स्वीकारणार का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता पक्ष घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे सूचक वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कष्टकरी कुटुंबातून मुंबई कोर्टापर्यंत; भगवान नन्नवरे यांची प्रेरणादायी वाटचाल

    August 11, 2026

    शालार्थ घोटाळ्याचा जळगाव कनेक्शन धक्कादायक! ६६ संस्था, ८४९ जण संशयाच्या भोवऱ्यात

    August 11, 2026

    राष्ट्रीय महामार्गांच्या हद्दीत नवीन ढाबे, हॉटेलला ब्रेक; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांत हटवण्याचे आदेश

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.