Author: editor desk

जळगांव : प्रतिनिधी  जळगांव जिल्हयातील मोठी बाजार पेठ असल्याने जिल्हयातील नागरीकांची खरेदीसाठी खूप गर्दी होत असते याचाच फायदा घेवून काही चोरटयांनी नागरीकांच्या दुचाकी चोरण्याचा धडाकाच लावला होता, विशेषता शहरातील मुख्य मार्केट भागात चोरीचं प्रमाण खूप वाढले होते. त्यावरून जळगांव शहर पो.स्टेला मो.सा. चोरीचे गुन्हे दाखल इ आलेले आहेत. जळगाव शहरात बरेच दुचाकी चोरीचे प्रकार हे घडत असल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय अधिकारी संदिप गावित जळगांव भाग जळगाव. यांनी मो.सा. चोरीचे गुन्हे उघडकीस आणने बाबत विशेष लक्ष देवुन सुचना केल्या होत्या त्यावरु दि.१४ रोजी रात्री १२.३० आरोपी हे गुन्हयातील चोरीची मो.सा.घेवुन फिरत आहेत अशी खात्रीशिर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर रात्रीच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी काल अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे एकत्र आले होते. प्रतिभा पाटील यांना दुखापत झाल्यानं त्यांची विचारपूस करण्यासाठी अजितदादांनी ही भेट घेतली. पण यावेळी या तिघांमध्ये काय चर्चा झाली? याबाबत खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. अजित पवार म्हणाले, “काल काकींचं एक ऑपरेशन झालं होतं, त्यांच्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. त्यामुळं मला दुपारीच जायचं होतं, ऑपरेशन झाल्या झाल्या. पण मला थोडा विलंब झाला कारण बरंच काम…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राष्ट्रवादीला जोरदार धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या सत्तेत सहभागी झालेले अजित पवार यांना नुकतेच खाते वाटप देखील झाले असून त्यानंतर त्यांनी लागलीच नाशिक येथे दौरा करीत आपले शक्तीप्रदर्शन केले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे देखील कौतुक केले आहे. त्यांचा सारखा नेता भारतात दुसरा नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. आगामी काळात होणाऱ्या एनडीएच्या बैठक आपण सहभागी राहणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या समविचारी पक्षांची बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीला मी आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. या बैठकीदरम्यान आपण पंतप्रधान…

Read More

पारोळा : प्रतिनिधी  तालुक्यातील एका शेतात काम करत असताना रानडुकराने केलेल्या हल्ल्यात दिनकर शिवाजी पाटील (रा. पळासखेडे सीम) हे जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. पळासखेडे सीम येथील शेतकरी दिनकर शिवाजी पाटील व त्यांची पत्नी आशाबाई हे दोघे जण त्यांच्या शेतामध्ये निंदणी करीत होते. त्याचवेळी मोठे रानडुक्कर शेतात आले आणि दिनकर यांना धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला आणि डोळ्याला इजा झाली. ग्रामस्थांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. गाव शिवाराला लागून वनविभागाचे खूप मोठे पडीक क्षेत्र आहे. त्यामुळे या परिसरात रानडुकरे, नीलगाय आणि हरणांचे कळपच्या कळप येऊन पिकांचे नुकसान करतात. वेळप्रसंगी शेतकऱ्यांना इजा पोहोचवतात. याबाबत वनविभागाला बऱ्याचदा सूचना देऊनही याविषयी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला परिसरातील नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवार, १४ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या तरुणाला तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संतप्त जमावाने तरुणाची दुचाकी पेटवून दिल्याने परिसरात खळबळ उडाली. काही संतप्त नागरिक त्याला पेटत्या दुचाकीवर फेकणार होते, मात्र काही पोलिस कर्मचारी व इतर नागरिकांनी त्यांना रोखले. अनेक वर्षांपासून रहिवास याबाबत अधिक माहिती अशी की, तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या १३ वर्षांपासून हे कुटुंब वास्तव्याला आहे. या ठिकाणी पती पत्नी, दोन मुले आणि दोन मुली राहतात. शुक्रवार, १४ जुलै रोजी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी शरद पवारांना धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यावर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घ्यायला १० दिवस उलटल्यावर आज खाते वाटप झाले असून यात शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. यात अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते, छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालय, तर दिलीप वळसे पाटील यांना सहकार खाते देण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, पशू संवर्धन खाते देण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्रालय देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  गेल्या अनेक वर्षापासून भारताची महत्वाकांक्षी मोहिम असलेलं चांद्रयान यशस्वीरित्या ३ लॉन्च करण्यात आली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन हे २.३५ मिनिटांनी लॉन्च झालं. अवघ्या देशाचं याकडं लागलं होतं. यावेळी केंद्रातील अनेक मंत्री अंतराळ केंद्रात उपस्थित होते. अवघ्या देशानं हा सोहळा टीव्हीवर लाईव्ह पाहिला. चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणानंतर 3 वर्षे, 11 महिने आणि 23 दिवसांनी शुक्रवारी भारताने चांद्रयान-3 मिशन लॉंच केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2.35 वाजता बाहुबली रॉकेट LVM3-M4 द्वारे ते अवकाशात पाठवले. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ इतर शास्त्रज्ञांसह मिशन कंट्रोल रूममध्ये आहेत. या मोहिमेद्वारे भारताला आपली अंतराळ शक्ती जगाला दाखवायची…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्तेत अजित पवार आल्याने आता सत्तेत तीन वाटे झाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असतांना शिंदेंनी त्यांची बैठक घेत मोठे बळ दिले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत 152 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला होता. त्यांच्या दाव्यामुळे भाजपच्या शिवसेना व राष्ट्रवादी या मित्रपक्षांना किती जागा मिळणार? याविषयी साशंकता निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेतील बंडावेळी आपल्यासोबत आलेल्या 50 पैकी एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नसल्याचा दावा केला. सत्ताधारी पक्ष विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून लढवणार आहेत.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी झाल्यानंतर अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे पण त्यांना अजून ही कुठलेही खाते मिळाले नसताना त्यांनी आज मंत्रालयातून कामकाजाला सुरुवात केली आहे. अजित पवार आज सकाळी ९.४५ वाजता मंत्रालयात दाखल झाले. यामुळे मंत्रालयातील अधिकाऱ्यांची धांदल उडाली. सध्या अधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांची बैठक सुरू आहे. राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या प्रशासकीय कामाला सुरवात केली आहे. अजित पवार यांनी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी एक बैठक बोलावली आहे. अर्थ विभागाचे सचिव डॉ. नितीन करीर यांच्यासोबत ते बैठक घेत आहेत. अद्याप आधिकृत खातेवाटप झाले नाही, मात्र अजित पवार यांनी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यास…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना दि.१२ रोजी घडली असून या प्रकरणी मारवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह रहिवासास असून दि.१२ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आई जवळून ५ रुपये घेवून दुकानात गेली असता कुणी तरी अनोळखी इसमाने तिला फूस लावून पळवून नेल्याची घटना यावेळी घडली. परिवारातील सदस्याने अल्पवयीन मुलीला गावासह परिसरात शोधाशोध केली असता पण ती मिळून न आल्याने अल्पवयीन मुलीच्या आईने मारवाड पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका.संजय पाटील हे…

Read More