जळगाव : प्रतिनिधी
शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा भर दिवसा विनयभंग केल्याची घटना दि.१४ रोजी दुपारी उघडकीस आली होती. हि घटना परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी लागलीच संशयित तरुणाची दुचाकी पेटवून दिली होती. या प्रकरणी आता तालुका पोलिसात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कोल्हे हिल्स जवळील एका परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह रहिवासास असून दि. १४ रोजी दुपारच्या सुमारास एक अनोळखी इसम दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलगी आपल्या लहान बहिणीसोबत घरी एकटी असल्याची संधी साधत बळजबरीने घरात घुसत अल्पवयीन मुलीसोबत चुकीचे कृत्य केले. तसेच संशयित आरोपी भारत सुभाष सूर्यवंशी(वय ३४) याने अल्पवयीन मुलीस तु जर कुणाला काही सांगितले तर तुमच्या घराचा सत्यानाश होईल असे बोलून धमकी दिल्या प्रकरणी तालुका पोलिसात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक आप्प्पासौ.पवार हे करीत आहे.