Author: editor desk

इंदूर : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात गुन्हेगारी वाढत आहे, तर शाळकरी मुलांमध्ये देखील अशीच गुन्हेगारी चव्हाट्यावर येत असतांना मध्यप्रदेशातील इंदूर येथील एका खासगी शाळेत झालेल्या भांडणात चौथीच्या एका विद्यार्थ्याच्या पायावर त्याच्या तीन वर्गमित्रांनी अभ्यासात वापरल्या जाणाऱ्या कर्कटकने १०८ वेळा वार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची दखल घेत बाल कल्याण समितीने सोमवारी पोलिसांकडून तपास अहवाल मागवला. हे प्रकरण धक्कादायक आहे. इतक्या लहान वयातील मुलांच्या या हिंसक वर्तनाचे कारण काय आहे हे शोधण्यासाठी आम्ही तपास अहवाल मागितला आहे. मुले हिंसक दृश्यांसह व्हिडीओ गेम खेळतात की नाही याचा शोध घेतला जाईल, असे सीडब्ल्यूसीच्या अध्यक्षा पल्लवी पोरवाल यांनी सांगितले.

Read More

जळगाव : प्रतीनिधी भडगाव तालुक्यातील कजगाव येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कजगाव परिसरात दि. २६ रोजी संध्याकाळी व मध्यरात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतातील अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसासोबतच वादळी वारा देखील असल्यामुळे केळीचे घड जमिनिवर कोसळले असून वेचणीला आलेल्या कापसाचे देखील आतोनात नुकसान झाले आहे. तसेच तूर, मका, ऊस, दादर आदी पिकांसह फळबागांचे ही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने कजगाव परिसरातील अनेक शिवारात विविध पिकांचे नुकसान झाले आहे. बहुतांश शेतातील पिके आडवी पडली असून शेतातील पिके भूईसपाट झाले आहेत. वेगवेगळ्या संकटांमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता अवकाळी…

Read More

जळगाव : प्रतीनिधी  शहरातील शिवाजीनगरातील अमनपार्कमध्ये शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केले. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजी नगरातील अमन पार्कमध्ये रईस शेख रशिद शेख हा तरुण वास्तव्यास असून त्यांच्या शेजारी राहणारे अब्दुल लतीफ शेख व ईस्माईल शेख, खलील शेख, वशीम शेख, नदीम शेख हे राहत असून त्यांनी त्यांच्या घरासमोर मोबाईचे दुकान टाकले आहे. त्याठिकाणी गर्दी होत असल्याने सन २०२१ मध्ये त्यांच्यामध्ये वाद झाले होते. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास रईस शेख हा घरी जात असतांना त्यांच्या शेजारी राहणारा नदीम…

Read More

पारोळा : प्रतिनिधी  पारोळा कजगाव रस्त्यावरील डी. बी. पाटील कॉलेजजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास सासूरवाडीला जात असलेल्या तरुणाला भरधाव वाहनाने उडविल्याची घटना घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महेश राजेंद्र जावरे (वय २५, रा. भोंडण) या तरुणाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील भोंडण येथे महेश राजेंद्र जावरे हा तरुण रविवारी सायंकाळी महेश हा दुचाकीवर मेहूटेहू येथे आपल्या सासूरवाडीला जाण्यासाठी निघाला. दरम्यान, पारोळा कजगाव रस्त्यावरील डी. बी. पाटील कॉलेज जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने महेशच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये महेश हा गंभीर झाला होता. नागरिकांच्या मदतीने महेशला रुग्णवाहिका चालक…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी युवतीच्या दुचाकीला बसचा कट लागल्याने बस गावात आल्यानंतर दोघांनी बसचालकास लाथाबुक्क्यांसह चापटांनी बेदम मारहाण केल्याची घटना २७ च्या सायंकाळी नांदेड येथे गावठाण चौकात घडली. दरम्यान, बसचालकाची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावहून नांदेडला सायंकाळी चार वाजता येणारी बस (एमएच-१४/बीटी-३०१९) ही चार वाजेच्या सुमारास नांदेडला आल्यानंतर नारणे गावाकडे जाते. ही बस नारण्याहून नांदेडकडे येत असताना नम्रता महेंद्र पाटील (२०) हिच्या दुचाकीला बसने कट मारला. त्यामुळे दुचाकी घसरली व नम्रता पाटील हिच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. बस गावात आल्यानंतर मुलीच्या नातेवाइकांनी बसचालक तुकाराम आनंदराव रायसिंग (४६, बांभोरी) यांना बेदम मारहाण केलीबसचालक गंभीर अवस्थेतच साडेचार वाजेपासून सायंकाळच्या साडेसहा वाजेपर्यंत बसच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईवरील हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करत असतानाच अचानक पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरु असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी भाषण सुरूच ठेवलं. भर पावसात त्यांनी भाषण करत 26/11 च्या शहिदांना आदरांजली वाहिली आहे. अमृता फडणवीस यांच्या पुढाकाराने ग्लोबल पीस ऑनर्सने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गेटवे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते. यावेळी 26/11तील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा राज्यात दौरे सुरू असून खानदेश दौऱ्यामध्ये जळगाव शहरात ४ डिसेंबर रोजी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या नियोजनासाठी व तारीख निश्चित करण्यासाठी आज जळगाव जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचा पदाधिकारी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सभेचे नियोजन करण्यात आले. जळगाव जिल्हा सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या आयोजनाबाबत जळगाव येथे रविवारी सकाळी साडेदहा वाजता पद्मालय रेस्ट हाऊस येथे समाजाची बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत आयोजन व स्थळाबाबत चर्चा करण्यात आली. सभेची तारीख निश्चित नसल्याने तारीख निश्चित करण्याबाबत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यभरात अनेक ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असतानाच काही ठिकाणी गारपिटीनेही तडाखा दिला आहे. रविवारच्या तडाख्यानंतर सोमवारी देखील राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या पावसामुळे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक सुधारला असून मुंबईतील प्रदूषण कमी झाले आहे. शिवाय सोमवारी संध्याकाळी मुंबई शहर उपनगरात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. यवतमाळ जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाची रिपरिप सुरूच आहे. हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आहे. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरूच आहे. वाशिम जिल्ह्यात विजांच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील तरसोद येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या निधीतून राजपूत समाजाच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते झाले. तरसोद येथे राजपूत समाजाचे सभागृह व्हावे याकरिता समाजबांधवांनी अनेक दिवसांपासून मागणी केली होती. या सभागृहामुळे समाजबांधवांना कार्यक्रम घेणे सोईचे ठरणार आहे. गावात हक्काचे सभागृह होणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील होते तर प्रमुख मान्यवर म्हणून तालुकाप्रमुख शिवराज पाटील, उपतालुका प्रमुख जितेंद्र राणे, पंकज पाटील, शांताराम राजपूत, सुदाम राजपूत, प्रविण राजपूत, हिरालाल राजपूत व राजपूत समाजाची सर्व मंडळी व मान्यवर…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षभरापासून अभिनेत्री कॅटरिना कैफ वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत येत असतात. सध्या ‘टायगर ३’च्या यशाचा आनंद घेत आहे. एक था टायगर आणि टायगर जिंदा है च्या यशानंतर हा तिसरा भागही प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. आतापर्यंत सिनेमाने ४०० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. कॅटरिना कैफच्या जोया या गाजलेल्या भूमिकेचं याही सिनेमातून कौतुक होतंय. सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने कॅटरिनाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये तिने एका भयानक अनुभवाबद्दल सांगितलं आहे. मृत्यूला आपल्या समोर बघणं म्हणजे काय याचा अनुभव अभिनेत्री कॅटरिना कैफला आला. एका मुलाखतीत ती म्हणाली, ‘एकदा मी चॉपरवर होते. अचानक हवेमुळे चॉपर अशांत झाले. तेव्हा मला जाणवलं…

Read More