नाशिक : वृत्तसंस्था इंदौर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मनमाडनजीक रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये ६ जण ठार, तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मनमाड-येवला मार्गावर कंटेनर आणि स्वीफ्ट कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये स्वीफ्ट गाडीतील मधील नाशिकच्या पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मनमाड-मालेगाव मार्गावर चोंडी घाटाजवळ कंटेनर कारवर उलटून झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार झाला असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदौर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दोन अपघात झाले. मनमाड-मालेगाव रस्त्यावर चोंडीजवळ कंटेनर (क्रमांक आर. जे. १४ जी.पी. ३४३५) आणि…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील आकाशवाणी चौकासह एमआयडीसी परिसरातून दुचाकी लांबवणाऱ्या राहुल गणेश महाजन (वय-२०) रा. तांबापुरा व सोमनाथ भागवत अहिरे (रा. कुसुंबा) या दोघ चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दुचाकीच्या दुचाकींसह मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रामानंद नगर व एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने केली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आकाशवाणी चौक परिसरात राहणारे भाऊसाहेब दादाजी बागुल हे दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता ते आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जवळ दुचाकी (एमएच ४१ आर २३६३) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान चोरून नेलेली दुचाकी ही लाडवंजारी मंगल कार्यालयावरून संशयित राहुल महाजन हा घेऊन…
नंदुरबार : वृत्तसंस्था भरधाव पिकअप वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना नवापूर ते बोकरझर गावादरम्यान घडली. याबाबत पीक चालकाविरुद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवजान गावित हा त्याची दुचाकीने (क्रमांक एमएच ३९ आर २७१२) नवापूरकडून बोकड़झर गावाकडे जात असताना समोरून आलेल्या पिकअप वाहनाने (क्रमांक एमएच १८ एम ९८२१) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीस्वार दिवज्ञान हा फेकला गेल्याने त्याला गंभीर मार लागला त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत सुरेश रुपजी गावित, रा. बोरझर यांनी फिर्याद दिल्याने पिकअप चालक देवीदास पंडित कोठावदे (६१) रा. पिंपळनेर, ता. साक्री याच्याविरुद्ध नवापूर पोलिसात अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची घटना सुरु असतांना एक भीषण अपघाताची घटना पुणे जिल्ह्यातील भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाटात वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाल्याची घटना घडली. हि गाडी घाटातून खाली गेली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. यामुळे सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. पुणे जिल्ह्यातील भोरमार्गे महाडच्या दिशेने जात असताना वरंधा घाटातून गाडी जाताना वारवंड गावाच्या हद्दीत रस्त्याचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेच्या चारित जाऊन पलटी झाल्याने अपघात झाल्याची घटना घडली. या गाडीत काही प्रवाशी होते. या गाडीतले २ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. या दोघांना किरकोळ दुखापत झाली. मात्र यामध्ये चारचाकी गाडीचे मोठं…
जळगाव : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करताना या देशातल्या प्रत्येक स्त्री, पुरुष आणि निसर्गनिर्मित गोष्टींचा, मुक्या जनावरांचा आणि त्यासोबतच भोगोलिक दृष्टीचा सुद्धा विचार करत देशाला आणि भारतीय जनमानसाला एक गौरवांकित संविधान दिलेले आहे. हे संविधान प्रत्येक भारतीयांचा जीवन जगण्याचा सन्मार्ग असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संविधान जागर समितीतर्फे आयोजित संविधान गौरव दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संविधान जागर समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पालकमंत्र्यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. पालकमंत्री बोलताना पुढे म्हणाले की , सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत भारतीय संविधान…
जळगाव : प्रतिनिधी महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १४ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस दि. ६ डिसेंबर रोजी आहे. यानिमित्त नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या दरम्यान तीन विशेष गाड्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दादर ते सेवाग्राम, अजनी, नागपूर या दरम्यान सहा विशेष गाड्या. तर अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या दरम्यान एक विशेष गाडी असेल. क्र. ०१२६२ ही गाडी नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी ११:५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ३:३० वाजता पोहोचेल. क्र. ०१२६४ ही…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एका तरुणीच्या प्रियकराने तिची क्रूरपणे हत्या केलीये. हत्या केल्यावर नराधमाने तिच्या शरीराचे तब्बल ३१ तुकडे केले आहेत. हि घटना ओडिसा येथे घडली आहे. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरून गेलाय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, २२ वर्षांची तरुणी बुधवारी आपल्या आईबाबांना सांगून घरातून बाहेर पडली. रात्र झाली तरी मुलगी घरी परतली नाही म्हणून तिच्या कुटुंबियांनी तिची शोधाशोध सुरू केली. मुलीचा काहीच तपास लागत नसल्याने शेवटी त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरंगपूर जिल्ह्यातील जंगलात शोधकार्यात तरुणीचा मृतदेह सापडला आहे. तिच्या मृतदेहाचे ३१ तुकडे करून जमिनीत पुरण्यात आले…
वाशीम : वृत्तसंस्था मुलगी आणि वडिलांचं नातं हे अत्यंत घट्ट आणि जिव्हाळ्याचं नातं असतं. एखादा बाप आपल्या मुलीच्या डोळ्यात कधीच अश्रू बघू शकत नाही. पण लाडेगाव येथील एका बापाने पोटच्या लेकीला संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील लाडेगाव एक धक्कादायक घटना घडलीय. मुलीवर चाकू हल्ला करून तिला गंभीर जखमी केलं आहे. ही घटना लाडेगाव ऑटो पॉईंट चौकात घडलीय. बापाने मुलीला संपवण्याचा प्रयत्न का केला, त्या मागे काय कारण आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, मानोरा तालुक्यात असलेल्या हिवरा येथील १६ वर्षीय मुलगी लाडेगाव ऑटो पॉईंट चौकात उभी होती. ही मुलगी पिप्री मोडक…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील गवळीवाडा परिसरात राहणारा राहुल रामदास गवळी (वय २८) हा तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी नांदगाव ते मनमाड दरम्यान घडली. याप्रकरणी रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शनिपेठ परिसरातील गवळीवाड्यात राहुल गवळी हा तरुण वास्तव्यास होता. हातमजूरी करुन तो कुटुंबाला हातभार लावित होता. शुक्रवारी राहुल हा रेल्वेतून प्रवास करीत असतांना त्याचा तोल जावून तो रेल्वेतून खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्टेशनप्रबंधक यांनी रेल्वे पोलिसांन दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाची ओळख पटवून मृतदेह जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला.…
बीड : वृत्तसंस्था रस्त्यावर थांबलेल्या एका ओळखीच्या महिलेला दुचाकीवर लिफ्ट दिली. त्यानंतर तिला घरी नेऊन अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या घरच्यांना खोट्या केसमध्ये अडकवून जेलमध्ये टाकेल, अशी धमकी दिली. हा प्रकार बीड शहरात २० नोव्हेंबरला घडला. याप्रकरणी २३ नोव्हेंबरला शिवाजीनगर ठाण्यात आरोपी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस मुख्यालयावर हनुमान श्रीराम कयवाडे हे कर्तव्यावर असून बीड शहरातील पिडीता हि आपल्या मुलीला दिवाळीच्या सुट्टया असल्याने माहेरी गेली होती. २० नोव्हेंबरला सायंकाळी तिच्या भावाने तिला मंजिरी फाटा येथे सोडले. संसारोपयोगी साहित्य खरेदी करायचे असल्याने पीडिता बीडला येत होती. फाट्यावरून रिक्षाने ती बीडला आली. परंतु,…

