• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रस्त्याचा वाद अन तरुणाचा ट्रॅक्टरने चिरडून हत्या

editor desk by editor desk
October 25, 2023
in क्राईम, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
रस्त्याचा वाद अन तरुणाचा ट्रॅक्टरने चिरडून हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशभरातील अनेक राज्यात शेतीच्या वादातून असो वा रस्त्याच्या वादातून असो छोटे मोठे भांडण सुरु असतांना पण सध्या राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील बयाना गावात रस्त्याच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा ट्रॅक्टरने चिरडून हत्या करण्यात आली. आरोपीने ट्रॅक्टरचे चाक तरुणाच्या अंगावर 8 वेळा घातले. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे.

सदर पोलीस ठाण्याचे एसएचओ जयप्रकाश परमार यांनी सांगितले की, अड्डा गावातील बहादूर गुर्जर आणि अतारसिंग गुर्जर गटामध्ये रस्त्याच्या संदर्भात बराच काळ वाद सुरू आहे. या वादावरून बुधवारी सकाळी आठच्या सुमारास दोन्ही पक्ष पुन्हा आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाठ्या-काठ्या आणि दगडफेक केली. हाणामारीत दोन्ही बाजूंच्या महिलांचाही सहभाग होता. लढत असताना 35 वर्षीय निरपत गुर्जर जमिनीवर पडला. तेव्हा एका तरुणाने निरपतवर ट्रॅक्टर चालवला. थांबवूनही आरोपी ट्रॅक्टर चालकाने न थांबता जमिनीवर पडलेल्या निरपतवर ट्रॅक्टरचे चाक 8 वेळा चालवले. जखमी निरपतचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. मृताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बयाना सीएचसी येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मारामारीदरम्यान गोळीबाराचा आवाजही ऐकू आला. आरोपी ट्रॅक्टर चालकाची ओळख पटवली जात आहे.

Tags: murderRajsthan
Previous Post

महामार्गावर भीषण अपघात : ट्रकचालक ठार तर दोन जखमी !

Next Post

गरबा खेळताना मुलीसोबत नृत्य : तरुणांनी मुलीच्या वडिलांची केली हत्या

Next Post
गरबा खेळताना मुलीसोबत नृत्य : तरुणांनी मुलीच्या वडिलांची केली हत्या

गरबा खेळताना मुलीसोबत नृत्य : तरुणांनी मुलीच्या वडिलांची केली हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रवीण गायकवाड यांनी हल्ल्याप्रकरणी सरकारला धरले जबाबदार !
क्राईम

प्रवीण गायकवाड यांनी हल्ल्याप्रकरणी सरकारला धरले जबाबदार !

July 14, 2025
जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर अजितदादांचे सूचक विधान !
राजकारण

जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर अजितदादांचे सूचक विधान !

July 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

लाकडी काठीने तिघांनी केली तरुणाला बेदम मारहाण !

July 14, 2025
सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्यांची शनीपेठ भागातून काढली धिंड !
क्राईम

सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्यांची शनीपेठ भागातून काढली धिंड !

July 14, 2025
भुसावळातील दोघांवर हद्दपारीची कारवाई !
क्राईम

जळगावातील दोघांना जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार !

July 14, 2025
कुत्रा आडवा आला अन अपघातात महिला ठार !
क्राईम

कुत्रा आडवा आला अन अपघातात महिला ठार !

July 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group