जळगाव : प्रतिनिधी ग्रामीण भागात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कीर्तनकार मंडळी वारसा जपत आहे. मात्र, ग्रामीण भागात वारकरी साहित्याची उणिव भासत असल्याने वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे आणि वाढला पाहिजे. सांस्कृतिक व धार्मिक परंपरा टिकून ठेवण्यासाठी भजनी साहित्य वाटप केले जात आहे. जीवन सुकर होण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विचार महत्वाचे असून वारकरी संप्रदायाचा विचार समाजाला तारू शकतो. नुसते वारकरी साहित्य वाटपापुरते नव्हे तर वारकरी संप्रदाय व धर्म कार्यासाठी नेहमीच कटिब्ध्द राहील, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्र आयोजित पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर आयोजित भजनी मंडळ साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी मंत्री…
Author: editor desk
नागपूर : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी शक्तीशाली नेते आहे. मात्र पनोती हा शब्द त्यांनी स्वतःला का लावून घेतला हे समजत नाही. त्यामुळे पनोती शब्द ट्रेडिंग झाला आहे. सर्वसामान्य लोक त्याचा वापर करीत आहे. काँग्रेसने मोदी यांच्याबद्धल हा शब्द वापरला नाही. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनीच तसा समज करून घेतला असेही पटोले म्हणाले. ओबीसी आणि मराठा समाजात राज्य सरकारने भांडण लावले आहे आहे. ते आता टोकाला गेले असून आरक्षणावरून सुरू असलेला धुमाकूळ थांबवण्यात यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. जरांगे आणि भुजबळ काय म्हणतात त्यावर आम्हाला बोलायचे नाही. दोन्ही समाजाला न्याय कसा देता येईल हे सरकारने ठरवावे. दोघांचे भांडण आता…
अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात खुनाच्या घटना घडत असतांना एक थरारक घटना अहमदनगरच्या पारनेर शहरात घडली आहे. घराच्या जागेवरुन झालेल्या वादात अडीच वर्षाच्या चिमुकल्यासह आईची हत्या केल्याची घटना गुरुवारी संध्यकाळी अहमदनगरच्या पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये घडली आहे. यातील आरोपींविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून आरोपी मात्र फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर परिसरात राहणाऱ्या श्रीमंदिलकर आणि येणारे कुटुंबियांमध्ये घराच्या जागेवरून वाद सुरु होते. यावरुन दोन्ही कुटुंबियांमध्ये नेहमीच खटके उडत असत. मात्र गुरुवारी या वादाने टोक गाठलं आणि दोन जणांचा जीव यामध्ये गेला आहे. किरण श्रीमंदिलकर आणि येणारे कुटुंबात पुन्हा वाद झाला. यावेळी किरण याने शितल येणारे आणि…
जळगाव : प्रतिनिधी भोपाळ विभागातील बुधनी-बरखेरा स्थानकादरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जात आहे. यासाठी भुसावळ विभागातून जाणाऱ्या २४ गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढील प्रमाणे : क्र. १२१५३ लोकमान्य टिळक टर्मिनस – राणी कमलापती एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजी रद्द. क्र. १२१५४ राणी कमलापती-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ८ डिसेंबर रोजी रद्द. क्र. १२७२० हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत तर क्र. १२७१९ जयपूर- हैदराबाद एक्स्प्रेस २९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्र. ११०७९ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजी तर क्र. ११०८० गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ९ डिसेंबर…
जळगाव : प्रतिनिधी मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले मोकाट फिरत आहे. त्यामुळे दहा दिवसाच्या आत बकालेला तात्काळ अटक करा अन्यथा दि. ४ डिसेंबर पासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमसोर आमरण उपोषण करण्याचा इशारा छत्रपती शिवाजी बिग्रेडने दिला आहे. मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा व उच्च न्यायालयाने त्याला जामीन नाकारला असून पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तो मोकाट फिरत आहे. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असून समाजात असंतोष निर्माण होत आहे. गेल्या वर्षभरापासून बकालेला संरक्षण देणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना तातडीने निलंबीत करावे. तसेच या गंभीर…
धरणगाव : प्रतिनिधी शहरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून त्यातील डिझेल चोरणाऱ्या टोळीतील एकाला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे. तर तीन जण फरार झाले. त्यात एक कार आणि १२० लीटर डिझेल जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील आयटीआयजवळ रात्री दोन ट्रक चालक थांबले होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास धुळे येथील चार जण कारने आले. त्यांनी त्या ट्रकचालकांच्या गळ्याला चाकू लावला आणि ट्रकमधून डिझेल चोरी करण्यास सुरुवात केली.त्याच वेळी गस्तीवर असलेले पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे हे तेथे पोहोचले. त्यांनी त्या आरोपींना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरांनी चोपडा रस्त्याकडे पळ काढला. पोलिसांनी १२ किमी पाठलाग करून त्यांची…
जामनेर : प्रतिनिधी शहरानजीक शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अनोळखी वाहनाने तीन वाहनांना कट मारीत विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात एका मुख्यध्यापकासह दोन जणांचा दुर्देवी मृत्यू तर तीन जण जखमी असल्याची झाल्याची माहिती समोर येत आहे. हि घटना जामनेर- बोदवड रस्त्यावरील मालदाभाडीनजीक घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेरहून बोदवडकडे सुनील भोई आणि दत्तू माळी हे दुचाकीने निघाले होते. त्याच्यामागे ईश्वर पारधी हेही दुचाकीने मालदाभाडीकडे निघाले होते. मालदाभाडीनजीक समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने या दोन्ही दुचाकी आणि त्यांच्यामागे असलेल्या चारचाकी वाहनाला कट मारला. यामुळे दुचाकी बाजूला फेकल्या गेल्या आणि त्या एकमेकांवर आदळल्या. यात वरील तीनही जण जागीच ठार झाले. या भीषण घटनेनंतर अपघातातील…
पुणे : वृत्तसंस्था जिल्ह्यातील आळेफाटा येथे १२ टायर मालवाहू वाहन आगीत जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. मात्र अग्निशमन वाहन जुन्नर हुन आळेफाटा ला पोहोचेपर्यंत मालवाहू ट्रक पुर्णपणे जळून खाक झाला होता. तसेच या ट्रक ला आग नेमकी कश्यामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून घटनास्थळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे . मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील सुर्यकांत शिंदे यांनी आपली एम.एच.१४ ई.एम.९५२७ हि १२टायर मालवाहतुक गाडी गुरूवार २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास ओतुर रोडवर असलेल्या राजू बेळगावकर यांच्या गॅरेजमध्ये लावुन घरी गेले होते. रात्री २ वाजण्याच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात अनेक धक्कादायक घटना घडत असतांना एक अशीच घटना ओडिशामधून समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिची हत्या केली आहे. नराधम पतीने यावेळी आपल्या पोटच्या लेकीचाही जीव घेतला आहे. मुलगी आणि पत्नी झोपलेली असताना त्याने घरात साप सोडला आणि सर्पदंशामुळे माय लेकीचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील गंजाम जिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी महिला आणि तिच्या मुलीचा मृत्यू झालाय. दुपरी बराच वेळी महिलेने घराचे दार उघडले नाही त्यामुळे शेजारच्या व्यक्तींना काहीतरी चुकीचे घडल्याचा संशय आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांना याबाबत माहिती मिळातच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात आल्यावर पोलिसांना महिला आणि तिची मुलगी या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था वॉशरूमला जाऊ न दिल्याने विमानात प्रवाशांसमोर महिलेने पँट काढून टॉयलेट करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये महिला प्रवासी कर्मचाऱ्यांशी वाद घालतानाही दिसत आहे. फ्रंटियर एअरलाइन्सच्या फ्लोरिडाहून फिलाडेल्फियाला जाणाऱ्या फ्लाइटमधील एका महिलेने तिची पँट काढण्याचा प्रयत्न करत लघुशंका करण्याची धमकी देऊ लागली. महिला प्रवाशाच्या या कृत्याने इतर प्रवाशांनाही धक्का बसला. महिला प्रवाशाला वॉशरूमला जायचे होते, मात्र विमान कर्मचाऱ्यांनी तिला सध्या वॉशरूम वापरता येणार नाही, असे सांगितले. यामुळे महिला प्रवासी संतप्त झाली आणि तिने सीटच्या समोर शौचची धमकी दिली. त्यानंतर तीने तिची पँट खाली ओढली. महिलेला हे करताना पाहून इतर प्रवाशांनी विरोध केला. मात्र ती…

