धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील एका रस्त्यावर ३८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. घटनास्थळी असलेल्या काही लोकांनी त्या तरुणाला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील सोनवद शिवारातील झुरखेडा ते सोनवद रोडवरिल विरफाट्याच्या पुढे पद्माकर नारायण पाटील याचे शेताजवळील रोडवरील निंबाच्या झाडाजवळ संदिप झेडु भोई (वय ३६) हे दि.२३ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमरास जळगाव येथे कपडे घेण्यासाठी गेलो होतो जळगाव येथून दुपारी ३ वाजता सोनवद येथे घरी येत असताना त्यांना झाडाखाली खाली एक अनोळखी पुरुष वय 38 वर्ष. अंदाजे नाव गाव माहीत नाही हा पडलेला होता तो काहीएक हालचाल करित नव्हता तेव्हा त्यांनी लागलीच पोलीस स्टेशनला फोन करुन पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांसह त्यांनी त्या इसमास ग्रामिण रुग्णालय धरणगाव येथे दाखल केले असता. डॉक्टरांनी इसमास मयत घोषित केले. सदर मयत अनोळखी इसम वय 38 वय अंदाजे, नाव गाव माहीत नाही, अंगात पिवळा निळा चौकटीचा फुल बाहीचा शर्ट, लाल रंगाची फुल पँन्ट असे परिधान केलेल कपड्याचे वर्णन अशुन त्याचे मरणाबाबत धरणगाव पोलीस स्टेशला खबर देण्यास आली आहे.