Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी  तालुक्यातील वरणगाव सावतर शिवारातील शेताच्या गोदामातून चोरट्यांनी ३० हजारांच्या कापसासह २० कोंबड्या लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वरणगाव येथील उदय नारायणराव देशमुख यांनी या संदर्भात वरणगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २८ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सावतर शिवारातील त्यांच्या शेताच्या गोदामातून चोरट्यांनी अंदाजे ६ क्विंटल कापूस भरलेल्या गोण्या व २० कोंबड्या असा एकूण ३० हजारांचा मुद्देमाल लांबवला. शेतकरी देशमुख हे शेतात म्हशीचे दुध काढण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनात हवालदार मनोहर पाटील करत आहेत.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  धरणगावनजीक पवार पेट्रोल पंपाजवळ आयशरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. ही घटना गुरुवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, साळवा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर लोटू अत्तरदे (५८) भाऊ, मुलगा, मुलगी हे नागपूरहून रेल्वेने धरणगाव रेल्वेस्थानकावर आले. त्यांना घेण्यासाठी मोरेश्वर अत्तरदे हे धरणगावला आले होते. लहान मुलांना सोबत घेवून दुचाकीने साळव्याकडे जात असताना धरणगावच्या बाहेर चोपडा रस्त्यावरील पवार पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या आयशरने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याचे पाहून आयशर चालकाने घटनास्थळावरून धूम ठोकली. दरम्यान गंभीर जखमी मोरेश्वर अत्तरदे यांना पुढील उपचारासाठी…

Read More

मेष- आज तुम्ही एखाद्या गरीबाला मदत केलीत तर त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. आज तुम्ही दिवसभर खूप व्यस्त असाल. तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या संदर्भात धावपळ करावी लागेल. आज तुम्ही सहलीलाही जाऊ शकता. आज तुम्हाला तुमचे जुने अडकलेले पैसे मिळू शकतात, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. आज तुम्हाला तुमच्या घरच्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमच्या मुलांच्या वतीने तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल. वृषभ – आज तुमचा खर्च वाढू शकतो. तुम्ही अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करू शकता. तुम्ही तुमचे पैसे काळजीपूर्वक खर्च करावे, अन्यथा तुम्हाला भविष्यात पैशांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी वाढत असतांना नेहमीच पोलीस अधिकारी व कर्मचारी कारवाई करून गुन्हेगारांना वठणीवर आणत असतात नुकतेच नाशिक रोड पोलिसांनी कोम्बींग मोहिमेत पोलिसांना शिवीगाळ करणा-या एकास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मालधक्कारोड परिसरातील मातोश्री रमाबाईनगरातील भिमचंद्र रूपचंद चंद्रमोरे (वय ४५) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत हवालदार संदिप पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या आदेशान्वये मंगळवारी (दि.२८) रात्री शहरात सर्वत्र कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी पवार यांच्यासह त्यांचे सहकारी रमाबाई आंबेडकर नगर भागात मद्यपान केलेल्या…

Read More

जळगाव – प्रेमासाठी काही पण करणारी आजची तरुणाईचे प्रताप दिवसेंदिवसमोर उघडत आहे. यातच धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात दरोडा व अपहरणाची 25 रोजी शनिवारच्या रात्री घटना घडली होती. या प्रकरणात पोलीस तपास करत असताना मिळत गेलेल्या माहिती नुसार प्रकरण उघडकीस आली अन् पोलिसांसह सर्वच जण चक्रावून गेले. यात संशयित तरुणी निशा मोठाभाऊ शेवाळे (वय २३) हिनेच दरोडा व स्वतःच्या अपहरणाचे नाट्य रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी विनोद भरत नाशिककर (वय ३८, रा. गायत्रीनगर, शाजापूर, मध्य प्रदेश) व रोहित संजय गवळी (वय २२, रा. मोगलाई, धुळे) यांना मध्य प्रदेशातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तरुणीवर साक्रीतील…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी बसस्थानकाच्या पाठीमागे राहणारे नागरिक बाहेरगावी गेल्याने त्यांच्या घरातील दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील दोन लाख रुपये चोरट्यांनी लांबविले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रुख्मिणीनगरात राहणारे गुलाब सुभाष सोनवणे हे हरिद्वार येथे गेले आहेत. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या पुढील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी कपाट उघडून आत ठेवलेले २ लाख रुपये घेऊन मागील दरवाजाने पसार झाले. सकाळी त्यांच्या भावाला माहिती मिळताच त्यांनी पाळधी पोलिस चौकीत धाव घेतली, पोलिसांनी पाहणी केली व पंचनामा केला. हे पैसे प्लॉट घेण्यासाठी ठेवले होते. घटनास्थळी पोनि उद्धव ढमाले, सपोनि सचिन…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  तालुक्यातील बुधगाव फाट्यावर एक लाख २० हजार रुपये किंमतीचा २० किलो गांजा पकडला असून आरोपी फरार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील हातेड बुधगाव फाट्यावर बुधवारी चोपडा ग्रामीण पोलिस व डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान मोटारसायकलवरून १ लाख २० हजार रुपयांचा गांजा घेऊन जात असताना पकडला आहे. ५० हजार रुपयांचीदुचाकीही जप्त केली आहे. असा एकूण १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात दि. २९ रोजी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बुधगाव फाटा येथे ही कारवाई डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या पथकाने व…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी  एका तरुण खासगी वाहन चालकाने आपल्या वाहनाच्या कॅरीला दोर बांधून गळफास घेतल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील भवानी हॉटेलसमोरील महावितरण कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एरंडोल वृंदावननगर येथील रहिवासी योगेश शांताराम देशमुख (३४) या तरुणाने त्याच्या स्वतःच्या मालकीची टाटा मॅजिक गाडीवरील कॅरीला दोर बांधून गळफास घेतला. योगेश देशमुख हा खासगी वाहनचालक असून, त्याने घर बांधण्यासाठी कर्ज घेतले होते. त्यातच शासनाने एस. टी. मध्ये महिलांना सवलत जाहीर केल्याने खासगी वाहन चालविणे जिकरीचे झाले होते. त्यामुळे तो कर्ज फेडू शकत नव्हता. या विवंचनेत असल्याची चर्चा सुरू आहे. योगेश हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात वडील, बहीण…

Read More

मेष : आर्थिक बचत कामी येईल. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेले वातावरण राहील. वृषभ : इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवणे आनंदाचे निधान ठरेल. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल. कामच्या ठिकाणी तुम्हाला आज चांगला बदल झालेला दिसून येईल. मिथुन : आर्थिक स्थिती समाधानकारक. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात दिवाळीचा सण संपला असून आता लग्नसराईचा काळ सुरु झाला आहे या दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दराला मोठ्या प्रमाणात मागणी असते. सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. अशातच लग्नसमारंभात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार लग्नसराईत देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी अधिक प्रमाणात दिसून येत आहे. एचडीएफसीचे सिक्योरिटीजचे कमॉडिटी आणि करन्सी प्रमुख अनुज गुप्ता यांनी सांगितले की, शेअर बाजारातील चढउतारामुळे सोन्याचा भाव होऊ शकतो. लवकरच सोन्याचा दर हा ६७ हजारांपर्यंत जाऊ शकतो. आखाती देशातील युद्धाचा परिणाम हा सोन्या-चांदीच्या भावावर दिसून आला. दसऱ्याच्या काळात सोन्याचा भाव हा ६२ हजारांपर्यंत पोहोचला होता. अशातच आज सोन्याने…

Read More