मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून गारपिटीसह अवकाळी पाऊस सुरु असतांना आता वातावरणात सुधारणा होत असतानाच राज्यात अचानक आलेल्या दाट धुक्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली. अरबी समुद्रावरून आलेले वारे आणि ढगाळ हवामानामुळे वाढलेली आर्द्रता याचा परिणाम म्हणून शुक्रवारी सकाळी राज्याच्या काही भागात दाट धुक्याची लहर पसरली होती. त्यामुळे १५ ते २० फूट अंतरावरील दिसत नव्हते. आगामी दोन दिवस असेच वातावरण राहिल, त्यानंतर धुके कमी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे. धुक्यामुळे गारपीटीच्या तडाख्यातून उरलेल्या पिकांवर रोगराई पसरण्याची चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, पावसाळी वातावरण हळूहळू निवळत असून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा…
Author: editor desk
मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरातील प्रवर्तन चौकाजवळ तीन दुकानांना अचानक आग लागली. या आगीत बूट, चप्पल व गोळ्या बिस्किटांचे दुकान खाक झाले तर किराणा दुकानाला मोठा फटका बसला आहे. सुमारे सात लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी लागलेल्या या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीच्या कारणावरून शहरात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. या दुकानांमधून आगीचे लोळ उठताना दिसताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. बूट व चप्पलचे दुकान तसेच गोळी-बिस्किट पान मसाल्याचे दुकान या आगीत जळून खाक झाले. मुख्य चौकातील या घटनेमुळे प्रचंड गोंधळ…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील नगरदेवळाजवळील निपाणे येथील शेतकरी हिरमण दीपचंद पाटील यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना मजूर महिलेवर बिबट्याने हल्ला केला. मात्र महिलेने आणि मजुरांनी आरडाओरड करताच बिबट्याने धूम ठोकली. ही घटना दि. १ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. पावलांच्या ठशांवरून हा बिबट्याच असल्याची पुष्टी वनविभागाने केली आहे. निपाणे सरपंच रोशन पाटील व गावातील युवकांनी पुढाकार घेत बराच वेळ बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न केला वनविभागाचे कर्मचाऱ्यांना पाचारण केले. त्यांनी पावलांच्या ठशांवरून हा बिबट्याच असल्याचे स्पष्ट केले आणि वनपाल प्रकाश देवरे यांनी शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याआधी दि. १२ नोव्हेंबर रोजी सीताराम पाटील यांच्या शेतातील सात वासरांचा फडशा बिबट्याने पाडला…
मेष : आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. एकांतात वेळ घालवाल. वृषभ : आर्थिक खर्च वाढतील. जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्यांमध्ये राहून आनंदाचा काळ घालवा. शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल. मिथुन : सांपत्तिक स्थिती सुधारेल. नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. कुणी जवळच्या आणि जुन्या मित्राला भेटून आज तुम्ही अतीतच्या दिवसात व्यग्र होऊ शकतात. कर्क : शेअर बाजार आणि…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या नवीपेठ परिसरात आज लक्ष्मी गोल्डन हाऊस या ज्वेलर्स दुकानाचे लाकडी दरवाजाला अडकवलेली लोखंडी पट्टीचे हुक तोडून दुकानातील तिजोरी तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने नवीपेठ भागातील वीज गेली होती. या अंधाराचा फायदा घेऊन चोरटयांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला असून एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आज १ डिसेंबरच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमाराला चोरटे आले असून १ वाजून ५३ मिनिटाला तो बाजूच्या दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या चोरट्याने दुकानातील सीसीटीव्हीच्या वायरी कापून टाकल्याचे आणि बाजूच्या इंडिया फर्निशिंग दुकानाचा सीसीटीव्ही कॅमेरा वाकविल्याचे…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला गुरूवार ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीसांनी अजिंठा चौकातून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या. संशयित आरोपीवर वेगवेगळ्या स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहे. राकेश पंडीत भाट (वय-२४) रा. मोठे वाघोदे ता. रावेर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. या अनुषंगाने जिल्हा पेालीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली. दरम्यान, सीसीटीव्ही आणि जनरल फुटेजच्या आधारे संशयित आरोपी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी डॉ.सेल चे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस डॉ.नितीन वसंतराव पाटील यांची त्यांनी सात आठ वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामांची पावती म्हणून पक्षाने त्यांना बढती दिली. कोरोना काळात केलेले कार्य असो,किंवा सांगली, कोल्हापूर च्या पूरस्थिती मध्ये जाऊन घेतलेले कॅम्प असतील,किंवा जळगाव जिल्ह्यात वेळोवेळी घेतलेले आरोग्य शिबीर असेल किंवा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना 24 तास रुग्ण सेवेचे मार्गदर्शन व सहकार्य असेल अशा सेवेमुळे डॉ.नितीन पाटील यांना डॉ.सेलचे प्रदेश कार्यकारिणी ने बढती दिली, प्रदेशअध्यक्ष आमदार श्री.जयंत पाटील साहेब यांनी नुकतीच कार्यकारिणीला मंजुरी दिली. डॉ.सेलचे प्रदेश अध्यक्ष मा.डॉ.सुनील जगताप यांनी हि नियुक्ती जाहीर केली. या निवडीबद्दल मा.महसूलमंत्री…
सातारा : वृत्तसंस्था साताऱ्यातील पुणे-बेंगळुरू महामार्गावर गुरुवारी रात्री डीजेचा दणदणाट पाहायला मिळाला. गौरीशंकर कॉलेज परिसरात डीजे व्यावसायिकांसह दोन गट आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना खुन्नस देत तलवारी नाचवण्यात आल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. “माझ्या डॉल्बीचा आवाज मोठा की तुझ्या डॉल्बीचा आवाज मोठा”, अशी खुन्नस देत दोन्हीही गटांनी डीजेचा दणदणाट सुरू केला. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दोन्ही गट एकमेकांना तलवारीचा धाक दाखवून खुन्नस देत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. याप्रकरणी सातारा पोलिसांनी ३० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत ७ जणांना अटकही करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगळुरू महामार्गावरील गौरीशंकर कॉलेज…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील बदलत्या हवामामुळे सध्या जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. हिमाचलच्या लाहौल स्पितीमध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर 35 हून अधिक रस्ते आणि 45 पॉवर ट्रान्सफॉर्मर ठप्प झाले आहेत. NH 3 सोलंगनाळा ते अटल बोगदा आणि NH 305 जालोरी जोत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये बर्फवृष्टीनंतर कुपवाडा ते तंगधार केरन रस्ता बंद करण्यात आला आहे. काश्मीरला राजौरी आणि पुंछला जोडणारा मुघल रस्ताही बंद आहे. गुरुवारी मुघल रोडवर पोशाणा ते पीर की गलीपर्यंत अडीच फूट बर्फवृष्टी झाली. येथे, तामिळनाडूमध्ये गेल्या 28 नोव्हेंबरपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे चेन्नईतील अनेक शहरांमध्ये रस्ते जलमय झाले आहेत. भारतीय…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणावरून दोन नेत्यामध्ये वाक्ययुद्ध रंगले असतांना आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरी राजीनाम्याची मागणी केली असली तरी ते आमचे मित्र आहेत. मी जेव्हा पाहिजे तेव्हा राजीनामा द्यायला तयार आहे. मात्र, त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास नक्की देणार, असे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भुजबळ हे राज्यात दौरे करून नाशिकमध्ये परतल्याच्या पार्श्वभूमीवर बोलत होते. भुजबळ म्हणाले, गारपीटग्रस्तांकडून काही फोन आले. त्यात त्यांनी साहेब तुम्ही काही आलेच नाही, अशी विचारणा केली. त्यावर मी त्यांना सांगितले, आम्हाला तर गावबंदी आहे. तरीपण जोपर्यंत मी आमदार आहे, तोपर्यंत मला मतदारसंघात जाणे आवश्यक आहे.…

