अहमदनगर : प्रतिनिधी जिल्ह्यातील घारगाव येथे शिर्डीहून आळंदी येथे निघालेल्या दिंडीत भरधाव कंटेनर घुसून झालेल्या अपघातात चार वारकरी ठार तर आठ वारकरी जखमी झाले. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. हा अपघात रविवारी दुपारी संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पठार भागातील नाशिक-पुणे महामार्गावर घडला. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताराबाई गंगाधर गमे (वय ५२, रा. कोन्हाळे, ता. राहाता), भाऊसाहेब नाथा जपे (५०, रा. कनकुरी, ता. राहाता), बबन पाटीलबा थोरे (६५, रा. शिर्डी, ता. राहाता), बाळासाहेब अर्जुन गवळी (५०, रा. मढी, ता. कोपरगाव), अशी अपघातातील मयतांची नावे आहेत
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी वाळू चोरीसह वेगवेगळे गुन्हे दाखल असलेल्या संजय सुरेश त्रिभुवन (वय २६, रा. वाक, ता. भडगाव) या वाळू माफियाविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करीत त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. त्यानुसार ३ डिसेंबर रोजी त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय त्रिभुवन याच्याविरुद्ध भडगाव, पाचोरा पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल असण्यासह तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तरीदेखील त्याच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने भडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविला. हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे रवाना करण्यात आला. त्यानुसार संजयला स्थानबद्ध करण्याचे आदेश…
जळगाव : प्रतिनिधी इन्स्टाग्राम खात्यावरील फोटोंना लाईक करण्याचे टास्क देऊन व सुरुवातीला काही रक्कम देऊन डॉ. प्रणव परशुराम सामृतवार (२८, रा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह, मूळ रा. उमरसरा, जि. यवतमाळ) यांची १२ लाख ४२ हजार ३७० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील डॉ. प्रणव सामृतवार हे सध्या जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहतात. त्यांच्याशी ९ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या दरम्यान वेळोवेळी एका इन्स्टाग्राम खात्यावरून संपर्क साधण्यात आला. त्यात फोटोंना लाईक करण्यासह वेगवेगळे टास्क देण्यात आले. सुरुवातीला त्यांना नऊ हजार १५० रुपये देऊन त्यांचा विश्वास संपादन केला.…
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कोळगाव येथील भूषण दिलीप महाजन (३२) या दौंड (पुणे) येथे एसआरपीएफमध्ये असलेल्या व गावी सुटीवर आलेल्या जवानाचा शनिवारी रात्री दुचाकी अपघातात मृत्यू झाला. ग्रामस्थांनी या सुपुत्रास मिरवणूक काढत शेवटचा निरोप दिला. मिळालेल्या माहितीनुसार, भूषण महाजन (पाटील) हे लहान भावाला मुलगी झाल्याने बारशाच्या कार्यक्रमासाठी गावी काही दिवसांच्या सुटीवर आले होते. ते काही कामानिमित्त बाहेर गेले होते. रात्री ८ ते ९ च्या सुमारास गावानजीक दुचाकीने येत असताना अपघात झाला. त्यांना प्रथम चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात तेथून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव गावी आणत कोळगाव-पारोळा मार्गावरील एका शेतात त्यांच्यावर अंतिम संस्कार…
नंदुरबार : वृत्तसंस्था जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरद रस्त्यावर मोड ते उमरी गावादरम्यान भरधाव वेगातील बुलेटने धडक दिल्याने तीन वर्षीय बालक जखमी झाल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. गोपाळ विठ्ठल ठेलारी (रा. ऐचाळे, ता. साक्री, जि. धुळे) असे जखमी बालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर रोजी जखमी बालक याचे आई-वडील तळोदा ते बोरद रोडवरील मोड ते उमरी गावादरम्यान मेंढ्या चारत असताना रस्त्याने भरधाव वेगात जाणाऱ्या एमएच ४१-एमएल ९५३९ या बुलेटने गोपाळ याला धडक दिली. यानंतर मोटारसायकलस्वार पसार झाला. घटनास्थळावरून दरम्यान, पालकांनी मुलाला नंदुरबार येथे उपचारांसाठी दाखल केले होते.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत. त्या तरूणासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. तब्बल 10 हजारापेक्षा जास्त नोकऱ्या देण्यासाठी नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची असून मेळाव्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर रहायचे आहे. मेळाव्याची तारीख 09 आणि 10 डिसेंबर 2023 आहे. नाव – नमो महारोजगार मेळावा कोणकोणत्या पदांसाठी होणार मेळावा – फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशीनिस्ट, पेंटर, कारपेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, ट्रेनी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, इंजिनिअर आणि इतर पदे पद संख्या – 10,000+ आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/D.Pharm/MBA/पदवीधर/ डिप्लोमाधारक/पदव्युत्तर पदवी मेळाव्याची तारीख –…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील राजस्थान राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती लागले असून दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याचा ट्रेंड आता राजस्थानात कायम दिसला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल होताना दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, भाजप 105 जागांवर आणि काँग्रेस 73 जागांवर पुढे आहे, तर इतर उमेदवार 14 जागांवर पुढे आहेत. आतापर्यंत भाजपने 12, काँग्रेसने 3, भारतीय आदिवासी पक्षाने एक आणि इतरांना एक जागा जिंकली आहे. दरम्यान, काँग्रेसने आपला पराभव मान्य केला आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत आज संध्याकाळी राजभवनात जाऊन राजीनामा देणार आहेत. विधानसभा अध्यक्ष डॉ.सी.पी.जोशी यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे परसादीलाल मीना, प्रताप सिंह खाचरियासह काँग्रेसच्या 25…
मुंबई : वृत्तसंस्था देशातील तीन राज्यात भाजपने सत्ता खेचून आणली असून तेलंगणा एबीव्हीपीचा कार्यकर्ता काँग्रेसने खेचला अन्यथा तेलंगणाचं चित्रही वेगळं दिसलं असते. आमचा निर्णय काहींना आवडला नव्हता पण देशात मोदींशिवाय पर्याय नाही हे आता स्पष्ट झालं, भाजपच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा चेहरा नरेंद्र मोदी हेच त्रिवार सत्य आहे, असे देखील अजित पवार या वेळी म्हणाले, अजित पवार म्हणाले, मोदींमुळे देशाची प्रतिमा उंचावली आहे. निकाल चांगला येणार हे मी आधीच बोललो होतो. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. इंडिया, इंडियावाले आता ईव्हीएमबाबत बोलतील. ईव्हीएम घोटाळा हा रडीचा डाव आहे. मोंदींसमोर कोण उमेदवार असणार आहे हे सुद्धा विरोधकांचं…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील एका सामाजिक कार्यकर्ते वैभव बोरसे यांनी आपल्या मुलीचा प्रथम वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत शहरातील एका मूकबधिर शाळा अन्नदान करून साजरा केल्याने परिसरात या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वैभव बोरसे यांनी आज दिनांक 3 डिसेंबर रोजी मुलगी स्वरा बोरसे हिचा प्रथम वाढदिवसाच्या अवचित्त साधून आपल्या धरणगाव शहरातील लहान मुलांची मूकबधिर शाळा आहे.त्या शाळेमध्ये प्रथम वाढदिवस साजरा करण्यात आला व तेथील खरोखरच गोरगरीब गरजूवंत तेही आपल्यातलेच आहेत या संकल्पनेतून अन्नदान करण्याचा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला वैभव बोरसे यांच्या सर्व मित्र परिवार उपस्थित होता
वर्धा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी चुकीच्या घटना घडत असतांना अशीच एक धक्कादायक घटना वर्धा येथील सावंगी मेघे परिसरात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाच्या शौचालयात अर्भक मृतावस्थेत आढळून आले आहे. याप्रकरणी वसतिगृहातील महिला कर्मचाऱ्याने पोलिसांत तक्रार दिलीय. सावंगी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय महाविद्यालय परिसराला लागून असलेल्या सरस्वती वसतिगृह आहे. या वस्तीगृहाच्या ग्राउंड फ्लोरवर असलेल्या शौचालयाच्या खड्ड्यात अज्ञाताने मृत अर्भक फेकलं होतं. याची माहिती वसतिगृहात काम करणाऱ्या महिलेला मिळताच त्यांनी पाहणी केली. याबाबतची तक्रार त्यांनी तत्काळ सावंगी पोलिसांत दिली. पोलिसांनी तत्काळ वसतिगृह गाठून तपासणी केली असता अर्भक मृतावस्थेत असल्याचे समजले. अज्ञातांनी मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट…

