जळगाव : प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या पिंप्राळा येथील तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला जखमी केले. मात्र सुदैवाने तो तरुण बिबट्याच्या तावडीतून सुटला. आणि त्याचे प्राण वाचले. मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा येथील गणेश गणपत झाल्टे (वय ३२) हा दिव्यांग आहे. तो धुपेश्वर रस्त्यावरील शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. गणेश याने आरडाओरडा करत रस्त्याकडे धाव घेतली. त्यानंतर बिबट्याने पलायन केले. यात गणेशच्या खांदा आणि हाताला जखमा झाल्या आहेत. त्याला कुन्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वढोदा वनक्षेत्र कार्यालयाचे वनपाल धुडगुंडे,…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी नाशिक येथे पतीवर उपचार करून रावेर येथे गावी परतत असताना कार खांबावर धडकल्याने सावित्री सुनील हसकर (५०, रा. रावेर) या जागीच ठार झाल्या. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवार, २ डिसेंबर रोजी पहाटे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगाव ते नशिराबाद दरम्यान टोल नाक्यानजीक झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस भरतीचे प्रशिक्षण देणारे सुनील हसकर यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत त्यासाठी ते अधून-मधून तेथे जात असतात. शुक्रवारी उपचार घेऊन रात्री नाशिक येथून रावेर येथे ते कारने परतत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सावित्री हसकर, अन्य एक महिला व मित्र होते. कार नशिराबाद टोलनाक्यानजीक पोहोचली. त्यावेळी…
चोपडा : प्रतिनिधी चोपडा शहरात पशुधनाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केल्याने १० ते १५ जणांनी चोपडा येथील सपोनि अजित सावळे, हेकॉ संतोष पारधी यांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना जुन्या यावल रोडवर शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पशुधनाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली होती. यानंतर साने गुरुजी वसाहतीमधील १० ते १५ जण पोलिस ठाण्यात आले. कारवाई केल्याबाबत विचारणा करू लागले. पोलिसांनी त्यांना तिथून हाकलून लावले. यानंतर सावळे व पारधी हे रात्री ११ वाजता पेट्रोलिंग करीत असताना यावल रोडवर उभ्या असलेल्या जमावाने त्यांना अडवले तसेच लोखंडी…
मेष – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. जर आपण काम करणार्या लोकांबद्दल बोललो तर आज तुमच्या कार्यक्षेत्रात काही तणाव असेल, ज्यामुळे तुम्हाला थोडी काळजी वाटू शकते. कोणाशीही वाईट शब्द बोलू नका आणि रागावू नका, अन्यथा प्रकरण आणखी बिघडू शकते. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि समोरच्या व्यक्तीशी बोलताना आवाजाची पातळी नीट ठेवा. शिक्षण व्यवस्थेशी संबंधित लोकांसाठी, आज चांगले काम केल्याने अर्थपूर्ण परिणाम मिळू शकतात ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदी होईल. वृषभ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम राहील. जर आपण व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर तुम्हाला व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एखादा मोठा प्रकल्प तुमच्या हातून निसटू शकतो, ज्यामुळे…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग मोठी कारवाई करीत असतांना नुकतेच नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून भरवस फाट्यावर दमण येथील दारू घेऊन जाणारा कंटेनर पकडत त्यातील सुमारे 14 हजार दारू बाटल्यांसह 80 लाख70 हजारांचा ऐवज हस्तगत केला. या कारवाईत उत्तर प्रदेशातील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. रमजान खान सलमान खान (वय 27, नसीरपूर, पृथ्वीगंज, जि. प्रतापगड) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातील सहाचाकी कंटेनर (एमएच 04 आरबी 4868) यासह 17 हजार 232 दारूच्या बाटल्यांचे 501 बॉक्सही हस्तगत करण्यात आले. दादरा नगर हवेली आणि दमण दीव येथे उत्पादित होणारी;…
अकोला : प्रतिनिधी महिला व बालक यांच्या सुरक्षा संबंधाने जनजागृती पर सप्ताह चे आयोजन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या संकल्पनेतून, श्री अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शना खाली अकोला पोलीस लॉन येथे दुपारी ०३ वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा मध्ये व्हिडिओ दाखविण्यात आले, आणि नंतर प्रमुख मार्गदर्शक श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक, श्री संजय सेनगर सदस्य. बाल हक्क आयोग, महाराष्ट्र राज्य, श्री सुभाष दुधगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला. श्रीमती उज्वला देवकर, पोलीस निरीक्षक, भरोसा सेल अकोला, सरकारी अभियोक्ता श्री अवतीरक, श्री अक्षय डोंगरे, श्री गोपाल मुकुंदे पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा, यांनी मुलांना कायद्याचे बारकावे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात अनेक गुन्हेगारी घटना शेवटच्या टोकावर जात असल्याच्या घटना घडत असतान एक धक्कादायक घटना चेन्नईच्या क्रोमपेट परिसरातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने तिच्या मृतदेहाचे फोटो व्हॉट्सअॅप स्टेसला ठेवल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या एका मैत्रिणीने स्टेटस पाहिल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रोमपेटमधील एका हॉटेलमध्ये सकाळी १०.३० वाजता आशिक (२० वर्ष) आणि फौसिया (२० वर्ष) हे दोघे आले होते. हॉटेलमध्ये आल्यानंतर फौसिया आणि आशिक यांच्यात जोरदार भांडण सुरु झालं. फौसियाने आशिकच्या मोबाईलमध्ये असेलल्या महिलांच्या फोटोबाबत विचारणा केली. यावरुन आशिकने फौसियाने हॉटेलमध्ये…
भंडारा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी प्रेमप्रकरणातून अनेक गुन्हेगारी घटना सातत्याने उघडकीस येत असतांना नुकतेच भंडारा जिल्ह्यात युवकाच्या खून प्रकरणी तिघांना पाेलीसांनी अटक केली आहे. प्रेम प्रकरणातून युवकाचा खून झाल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पाेलीस सखाेल तपास करीत आहेत. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार तीन दिवसांपूर्वी रात्री दहाच्या सुमारास नयन मुकेश खोडके हा १९ वर्षीय युवक घरी न सांगता निघून गेला होता. ३० नोव्हेंबरला कोरंभी-सालेबर्डी नाल्यात संशयितरीत्या ताे मृतावस्थेत पाेलीसांना आढळला. या घटनेनंतर पाेलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी विविध ठिकाणी तपासाची पथके फिरवली. त्यानंतर पाेलीसांनी एका दिवसातच संशयिताचा छडा लावला. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाल्याची…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्थानकाजवळील बिग बाजार परिसरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस एकाने पळवून नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.३० नोव्हेबर २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील बिग बाजार परिसरात आली असता याठीकानाहून एक अल्पवयीन संशयित आरोपीने तिला पळवून नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव क्षीरसागर हे करीत आहेत.
वर्धा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडत असतांना अशीच एक भीषण अपघाताच्या घटना वर्धा जिल्ह्यातून समोर आली आहे. शाळेत शिकणाऱ्या लहान बहिणीला भेटण्यासाठी स्कुटीवरून जाणाऱ्या मोठ्या बहिणीला ट्रकने धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना शुक्रवारी आर्वी शहरातील एचडीएफसी बॅकेसमोर घडली. अपघातानंतर नागरिकांनी मोठी गर्दी करून ट्रकची तोडफोड केली.त्यामुळे दोन वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात प्रियाक्षी रमण लायचा (वय १९, रा. आर्वी) हिचा मृत्यू झाल आहे. प्रियाक्षी तंत्रनिकेतन पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होती. ती…

