Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणीशी मैत्री, प्रेम अन अत्याचार ; पोलिसात आले खरे नाव समोर !
    क्राईम

    तरुणीशी मैत्री, प्रेम अन अत्याचार ; पोलिसात आले खरे नाव समोर !

    editor deskBy editor deskOctober 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील एका २३ वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन तरुणीला खोटे नाव सांगून ओळख निर्माण करीत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण करीत व नंतर त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी अफताब उर्फ अप्पू कलमीस बेग (२३, रा. समतानगर) या तरुणाविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारी तरुणी एका नामांकीत महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. सध्या ती एका महाविद्यालयात अभियांत्रिकीची शिक्षण घेत आहे. इयत्ता अकरावीमध्ये असतानाच तिच्याशी अप्पू याने खोटे नाव सांगून ओळख निर्माण केली. त्यांच्यात संवाद वाढत जाऊन त्याचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. नंतर ते दोघे कॅफेमध्ये सोबत जावू लागले. त्यावेळी तरुणाने दोघांचे फोटो मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर २१ ऑगस्ट २०२१ रोजी तो तरुणीला कोल्हे हिल्स परिसरात मित्राच्या खोलीवर घेऊन गेला. तेथे अत्याचार केला. त्यानंतर सोबतचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार करीत राहिला. नेहमीच्या ब्लॅकमेलिंगमुळे तरुणी आजारी पडली व हा त्रास असह्य झाल्याने या १८ वर्षीय तरुणीने शुक्रवार, २७ ऑक्टोबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अफताब उर्फ अप्पू कलमीस बेग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि गोपाल देशमुख करीत आहेत

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.