Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  शहरात वर्षाच्या शेवटच्या दिवसापूर्वीच अतिउत्साही लोकांनी एक दिवसाआधीच ३१ डिसेंबरचा आनंद घेत असतांना चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातील एका लिपिकाने भर रत्यावर रात्री ९ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स चारचाकीने उडवीत तीन दुचाकी व एका चारचाकीला जबर धडक दिली आहे. यात एका पत्रकारचे परिवार थोडक्यात बचावले आहे. यानंतर पोलिसांनी या चारचाकी चालकाला घेवून जिल्हा पेठ पोलिसात आणले होते. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आकाशवाणी चौकाकडे जात असतांना रात्री ९ वाजेच्या सुमारास बॅरिकेड्स लावण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक प्रेमराज सुभाषराव वाघ हा मद्यधुंद अवस्थेत असतांना आकाशवाणी चौक परिसरातील बॅरिकेड्स चारचाकीने उडवत तीन दुचाकींसह एका चारचाकीला धडक…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  तालुक्यात शनिवारी कोरोना बाधित दोन रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय यंत्रणा अलर्ट झाली असून या दोघांवर चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात (आयसोलेशन) उपचार सुरू आहेत. उद्यापासून नवीन वर्ष सुरु होत असल्याने आता जनतेला नव्या वर्षात काळजी घेणे महत्वाचे राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाधित रुग्ण ३५ ते ३७ वयोगटातील महिला असून त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहे. त्यांचे नमुने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यापासून चाचण्या वाढवल्या असून दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची तपासणी करण्यात येत आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव तालुक्यातील बेळी गावातील सदगुरु झेंडूजी महाराज बेळीकर संस्थानातील भगवान श्री कुंडलेश्वर गोशाळेत आज पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ.राजूमामा भोळे यांनी भेट देत गोशाळेची पाहणी करीत दर्शन देखील घेतले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी प.पु.भरत महाराज बेळीकर यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. याठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आ.राजूमामा भोळे यांच्या संयुक्त विद्यमाने  ६० लाख रुपयांचा निधी सभामंडपासाठी तर सरक्षण भिंतीसाठी ४० लाख, पेव्हर ब्लॉकसाठी ३० लाख तर पुलासाठी ३० लाखांचा निधी देण्यात आला आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, सदगुरु झेंडूजी महाराज बेळीकर यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून भविष्यात ब दर्जाचे तीर्थक्षेत्र मिळवून…

Read More

कोल्हापूर : वृत्तसंस्था देशभरातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विधवा महिलावर अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असतांना एक धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. एका विधवा महिलेने शरीर संबंधास नकार दिल्याने त्या महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेह उसाच्या फडात पेटवून दिल्याची घटना कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात आशाताई मारुती खुळे या विधवा महिलेची हत्या झाल्याची ही घटना घडली आहे. विधवा महिला हत्या प्रकरणी संशयित योगेश पांडुरंग पाटील याला आजरा पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. संबंधित महिलेच्या पतीचे निधन झालं आहे. ती आईसोबत भादवन येथे राहते. भादवन ते भादवनवाडी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात नव्या वर्षात प्रत्येक हिंदूचे स्वप्न साकार होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी उत्तर प्रदेशच्या अयोध्या रेल्वे स्टेशनचं लोकार्पण केलं. तसेच यावेळी वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. याच लोकार्पण सोहळ्यातील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. ‘२२ जानेवारीला घराघरात दीपोत्सव साजरा करा’, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोकांना केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की,’राममय अयोध्या धाममध्ये आज विविध विकास योजनेचा लोकार्पण आणि पायाभरणी कार्यक्रमाचा अभिमान वाटत आहेत. आता संपूर्ण जग २२ जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहेत. यामुळे अयोध्यावासीतील लोकांमध्ये उत्साह निर्माण…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या मुद्यावर शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसशी (पवार गट) जवळपास मतैक्य झाल्याचे स्पष्ट केले. जागावाटपाच्या मुद्यावर आमचे राष्ट्रवादीशी जवळपास एकमत झाले आहे. पुढील 2 दिवसांत आमची वंचित बहुजन आघाडीशी चर्चा होईल. पण काँग्रेसने अद्याप आमच्याकडे जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला पाठवला नाही, असे ते म्हणालेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील संजय वाघेरे यांनी शनिवारी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर, मविआतील जागा वाटप व लोकसभा निवडणुकीसह विविध मुद्यांवर भाष्य केले. ठाकरे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीशी आमची बोलणी सुरू आहे. पुढील 2 दिवसांत संजय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात बनावट गावठी दोन पिस्तूल आणि १५ जिवंत काडतुसे घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत अटक केली आहे. यावेळी नमीर खान आसिफ खान (वय-१९) याला अटक करण्यात आले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील काट्याफाईल परिसरात संशयित आरोपी नमीर खान आसिफ खान हा सोबत २ गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत कडतुस घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशात गेल्या काही दिवसापासून थंडीचा कहर वाढल्यानंतर आता गेल्या २ दिवसांपासून राज्यातील तापमानात वाढ झाली असून राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा 10 अंशांच्या पुढे गेला आहे. मात्र सरत्या वर्षाला निरोप देताना थर्टी फर्स्टला राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. देशासह राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात राज्यातील हवामानात चढ-उतार पाहायला मिळणार आहे. राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता असून काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. 30 डिसेंबरपासून 2 जानेवारी दरम्यान राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  शहरातील गडकरी नगरात काही कारण नसताना एका अल्पवयीन मुलाला फायटरने नाकावर तोंडावर मारहाण करून जखमी केल्याची घटना २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती. त्याच्यावर उपचार केल्यानंतर अखेर गुरुवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील लाइफस्टाईल कॉलनी परीसारातीली अक्षय प्रदीप साबळे (वय-१७) हा मुलगा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता काही कारण नसताना संशयित आरोपी शौर्य शिवमोहन सिंग आणि अली फिरोज खान दोन्ही रा. जाम मोहल्ला, भुसावळ यांनी फायटरने नाकावर तोंडावर मारहाण करून गंभीर जखमी केले आणि…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  मेहरुण तलावामध्ये अंघोळीसाठी गेलेल्या शाहूनगर परिसरातील १३ वर्षीय चार मुले पाण्यात बुडून गटांगळ्या खाऊ लागली, त्यावेळी तीन जणांना वाचविण्यात यश आले; मात्र ईशान शेख वसीम (१३, रा. शाहूनगर) या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शाहूनगर परिसरात राहणारे ईशान शेख, मोईन खान अमीन खान (१३), अयान तस्लीम भिस्ती (१३) व असलम शेख सलाउद्दीन (१३) हे चौघे जण शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरात आंघोळीसाठी गेले. चौघेही पाण्यात उतरले व काही वेळातच ते गटांगळ्या खाऊ लागले. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आला. त्यावेळी ते…

Read More