Author: editor desk

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील पहूर पेठ येथे रविवारी संध्याकाळी आठवडी बाजारात क्षुल्लक कारणावरून दोन विक्रेत्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन त्याचे मारहाणीत रूपांतर झाल्याची घटना घडली. यावेळी बाजारात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यादरम्यान, पोलिस घटनास्थळी दाखल होताच जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असून, तणावपूर्ण शांतता आहे. यात दोन्ही बाजूंकडील सहा जण जखमी आहेत. यात एका महिलेचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहूर येथे रविवारी आठवडी बाजार भरतो. गफार खाँ पठाण व श्याम भोई यांचे दुकान शेजारी लागतात. सायंकाळी क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यादरम्यान बाजारात गोंधळ उडाला. पळापळ सुरू झाल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील गडकरी नगराजवळील शिवदत्त नगर परिसरात रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बाप-लेकामधील भांडण सोडविणे एका पोलिस कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पोलिसावरच मुलाने चाकूहल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात बाजारपेठ पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी अक्षय चव्हाण हे जखमी झाले आहेत. कौटंबिक वादानंतर मलाकडन त्रास होत असल्याने त्रस्त पित्याने ११२ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधत मदतीची मागणी केली होती. यावर बाजारपेठ पोलिस ठाण्याचे हवालदार अक्षय चव्हाण हे मदतीसाठी पोहचले. संशयित मुलाला समज देत असतानाच त्याने स्वयंपाक घरातील चाकूने हल्ला चढवत अक्षय चव्हाण यांना जखमी केले. या घटनेनंतर संशयित पसार झाला. चव्हाण यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहित महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, चक्क पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या सहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. पहिलीच्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी दुपारी शाळेतून घरी जात होती. यावेळी रस्त्यात या मुलीला अडवून बाळू ज्ञानोबा जाधव याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यामुळे, पीडित मुलीच्या आईने पैठण पोलीस ठाणे गाठून या अत्याचार प्रकरणाची तक्रार दाखल केली. सदर घटनेनंतर…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मोदी सरकारने वर्षाच्या शेवटच्या दिवशी जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी विचारधारेच्या संघटनेवर एक मोठी कारवाई केली आहे. जम्मू कश्मीरमधील ‘तहरीक-ए-हुरियत’ या संघटनेवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट पोस्ट करत माहिती दिली आहे. मोदी सरकारने UAPA अंतर्गत ही कारवाई केली आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षांपासून जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादाला प्रोत्साहन देणाऱ्या संघटनेवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. फुटीरतावादी विचार पेरण्याचे आरोप ‘तहरीक-ए-हुरियत’ या संघटनेवर होता. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावर ‘एक्स’ अकाऊंटवरून या संघनेवर केलेल्या कारवाईबाबत माहिती दिली आहे. मोदी सरकारने ‘तहरीक-ए-हुरियत’वर UAPA अंतर्गत कारवाई करत बेकायदेशीर संघटना घोषित…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तरप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैदानावर क्रिकेट खेळता खेळता १० वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने मृत मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या अमरोहा येथील प्रिन्स सैनी असे या मुलाचे नाव असून आहे. राजीव सैनी यांचे कुटुंब हसनपुरनगरमधील मोहल्ला कायस्थान येथे राहते. त्यांचा मुलगा प्रिन्स श्रीमती सुखदेवी इंटर कॉलेजमध्ये दहावीचा विद्यार्थी होता. शनिवारी (३०,डिसेंबर) दुपारी तो मित्रांसोबत शहरातील सोहरका रोडवर असलेल्या मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. दुपारी खेळताना प्रिन्सला तहान लागली. मैदानावरच बॉटलमधील थंड पाणी प्यायला ज्यानंतर त्याची प्रकृती खालावली आणि तो चक्कर येऊन जमिनीवर पडला. प्रिन्सला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था सरत्या वर्षातील आज शेवटचा दिवस असून उद्यापासून नवं वर्ष सुरू होत असल्याने राज्यातील अनेक ठिकठिकाणी नव वर्षाचं स्वागत केलं जात आहे. अशातच या नव वर्षांच्या या पार्ट्यांमध्ये काही ठिकाणी रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात येतं. अशाच एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. ठाण्यातील रेव्ह पार्टीवर छापा टाकून पोलिसांकडून मोठी कारवाई केली गेली आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात गुन्हे शाखा पोलिसांची धडक कारवाई केली आहे. ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाच्या लगत रेव पार्टी करत असताना 100 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ठाणे गुन्हे शाखा उपयुक्त शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांच्याकडून संयुक्त रित्या कारवाई करण्यात आली आहे. नव…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वराड येथील लक्ष्मण माणिक वाडले (वय ५०) हे दि.२९ शुक्रवारी नऊ वाजता टँकर (एम.एच. १९ सीवाय ४३८८) भरण्यासाठी मनमाड येथे गेले होते तेथून जळगावकडे जात असताना रात्री दोन वाजता वराड गावाजवळच असलेल्या पुलाच्या भिंतीला टँकर धडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आऊट साईडने आलेल्या एका गाडीने टँकरला कट मारल्यामुळे टँकर पुलाच्या भिंतीवर धडकल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. वराड स्टॉपवर पुलाच्या भिंतीला टँकर धडकल्यामुळे लक्ष्मण वाडले यांना मार लागल्याने ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते. हा अपघात पाहून गावकऱ्यांसह रामजी ऑइल मिलच्या कामगारांनी टँकरजवळ धाव घेवून लक्ष्मण वाडले यांना तात्काळ गाडीतून बाहेर काढले आणि खाजगी गाडीने जळगाव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील किनोद या गावात मध्यरात्रीच्या सुमारास कुटुंबिय गाढ झोपेत असतांना अश्विनी विशाल चौधरी (वय २४) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांचे पती पाणी पिण्यासाठी उठल्यानंतर उघडकीस आली. पत्नीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह बघताच त्यांनी आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील किनोद येथे अश्विनी चौधरी या विवाहिता कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी आपल्या कुटुबियांसोबत जेवण केल्यानंतर चौधरी कुटुंबीय झोपले. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अश्विनी यांनी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. पहाटे तीन वाजेच्या सुमारास पती विशाल चौधरी पाणी पिण्यासाठी उठले व…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरातील मारवड रस्त्यावर प्रताप महाविद्यालयाजवळ दि. ३० रोजी दुपारी १ च्या सुमारास एसटी व दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना  घडली. याप्रकरणी बस चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील पिंपळे रोड भागातील वामन नगरातील रहिवासी प्रीतम गजमल शिंदे (४९) हे ३० रोजी नेहमीप्रमाणे दुचाकीने शेतीच्या कामानिमित्त बोरगाव येथे जाण्यास निघाले. दुपारी १ वाजेच्या सुमारास धार रस्त्यावरील क्रीडा संकुलाजवळ अमळनेर-तांदळी एसटी बसची (क्रमांक एमएच ४०-एन ९०८२) धडक बसल्याने डोक्यास, तोंडास मार लागला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुकुंदा शिंदे यांच्या फिर्यादीवरून बसचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील पवन नगरातील ४५ वर्षीय धर्मा किसन गवळी हे माहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी रेल्वेने निघालेले असतांना ते रेल्वेतून पडल्याने ठार झाल्याची घटना शनिवार, ३० डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्रजापतनगरनजीक असलेल्या रेल्वे रुळाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बांधकामाच्या ठिकाणी सेंटरिंगचे काम करणारे धर्मा गवळी यांच्या पत्नी खंडवा येथे माहेरी गेल्या होत्या. त्यांना घेण्यासाठी गवळी हे सकाळी रेल्वेने जायला निघाले.प्रजापतनगरनजीक रेल्वे रुळावर खांब क्रमांक ४२१/२बी ते ४२१/४बी दरम्यान ते रेल्वेतून खाली पडले. नागरिकांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. गवळी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. मयताच्या खिशात रेल्वेचे तिकीटही आढळून आल्याची…

Read More