Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  विनापरवाना गावठी हातभट्टीची दारूविक्री आणि धोकादायक व्यक्ती ठरलेल्या जिल्ह्यातील चार जणांना स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. त्यानुसार चारही जणांची वेगवेगळ्या कारागृहांत रवानगी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर पोलिस ठाण्यात सात गुन्हे दाखल असलेल्या योगेश भरत राजपूत (२९, रा. जामनेर) हा बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारूविक्री करत होता. त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली. मात्र त्याच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पाठविला. तसेच पहूर पोलिस ठाण्यात वेगवेगळे १६ गुन्हे दाखल असलेला सुपडू बंडू तडवी (४२, रा. चिलगाव, ता. जामनेर) हा देखील हातभट्टीची दारू विक्री करत होता.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग याठिकाणी एका बंद पडलेल्या घरात तब्बल 5 मृतदेहांचे सांगाडे सापडल्याने मोठी खळबळ उडाली असून हे सर्वच्या सर्व 5 मृतदेह एकाच कुटुंबातील लोकांचे असल्याची शक्यता आहे. सदर व्यक्तीची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याबाबत अधिक माहिती समोर आलेली आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. अर्धवट उघडलेल्या घराच्या दारात एक कवटी काही जणांना दिसल्याने ही घटना उघडकीस आली. पोलीस सदर घटनास्थळी पोचल्यानंतर त्यांनी मृताच्या नातेवाईकांशी आणि आसपासच्या लोकांशी चर्चा केली असता त्या कुटुंबातील लोक हे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एमआयडीसी परिसरात प्लॉट खाली करण्याच्या कारणावरून काशिनाथ चौकात तरूणावर चाकूहल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काशिनाथ चौकाजवळ असलेल्या मोकळ्या प्लॉटवर बांबू विक्री करण्यासाठी जागा विनोद राजाराम बाविस्कर (वय-३९, रा. बांभोरी ता.जि.जळगाव) या तरुणाला दिली होती. दरम्यान प्लॉट धारक शंभू भोसले याने प्लॉट खाली कर असे विनोद बाविस्कर याला सांगितले होते. त्यावर विनोद बाविस्कर यांनी प्लॉट खाली करण्यास नकार दिल्याने या रागातून संशयित आरोपी शंभू भोसले, विशाल वाघ, महेश चिंचोलकर, विजय अहिरे उर्फ भोपाली आणि कार्तिक भोसले उर्फ सोनू सर्व…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या जेएन.१ व्हेरियंटने हातपाय पसरायला सुरूवात केली असून राज्यातील विविध जिल्ह्यांत कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत चाललीये. अशात नाशिकमध्ये २ नवीन रुग्ण सापडलेत. नाशिकच्या सिन्नरमध्ये पुन्हा दोन महिला कोरोना बाधित आढळ्या आहेत. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चाललीये गेल्या ३ दिवसांपूर्वी सिन्नरमध्ये २ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता पुन्हा २ रुग्ण आढळल्याने रुग्ण संख्या ४ वर पोहचली आहे. कोरोनाची लक्षणं दिसल्यास तातडीनं कोरोना चाचणी करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. अमरावतीमध्ये देखील पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. पाच नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद आरोग्य प्रशासनाने केली आहे. 52…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून देशातील अनेक अल्पवयीन मुलांसह वयोवृद्धापर्यत अनेकदा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्देवी निधन झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. नुकतेच मध्यप्रदेशात एका पेंटरचा रंगाकाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. व्हिडिओत एका माणसाला अचानक हृदयविकाराचा झटका येतो आणि तो जमिनीवर कोसळतो. मिळालेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी ही घटना घडली. आशिष असे मृत व्यक्तीचे नाव आहे. एका रिपोर्टनुसार, इंदूरमधील एका साइटवर आशिष घराचे रंगकाम करत होता. अचानक आशिषला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तो थोडा वेळ एका ठिकाणी बसला. काही वेळानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला.…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था इन्स्टाग्रामवर मैत्री केल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका २५ वर्षीय युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे सर्वस्व लुटणाऱ्या आरोपीविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील बजाज नगरातील अमित सुनील मालेवार (वय २९) असे प्रियकराचे नाव असून हे दोघेही खासगी नोकरी करतात. इन्स्टाग्रामवर चॅटिंग करताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून बजाजनगर येथील आपल्या भाड्याच्या खोलीत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. युवतीने लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने बजाजनगर पोलिसांत तक्रार दाखल केली.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मोबाइलमध्ये व्हिडीओ पाहत असताना अंगावर शिंकला म्हणून अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर फेकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना अंधेरी येथे घडली. यामध्ये मुलाचा चेहरा विद्रूप झाला असून, त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी सायंकाळी, हुसैनउमेर सोलंकी हा मित्र जुबैनबरोबर मोबाइलमध्ये व्हिडीओ बघत असताना, तेथे ओळखीचा १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा आला. व्हिडीओ बघत असताना हुसेनला शिंक आली. तो अल्पवयीन मुलाच्या दिशेने शिंकला. अंगावर शिंकल्याच्या रागात तो घरी जाऊन शर्ट बदलून आला. खिशातील सॅनिटायझर हुसैनच्या अंगावर टाकले व लायटरने आग लावली. त्यात त्याचा चेहरा भाजला. अन्य मित्रांनी आग विझवली. घरी आणल्यानंतर त्याला तत्काळ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातून १४ वर्षीय मुलगा व मुलीला पळवून नेल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात दि.२८ रोजी १४ वर्षीय मुलगा व मुलगी घराजवळ असतांना अनोळखी व्यक्तीने अद्यात कारणाने काही तरी फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. हि बाब परिवारातील सदस्यांना समजली असता त्यांनी परिसरात शोध घेतला असता ते मिळून न आल्याने त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसात धाव घेत अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  सामाईक भिंतीवर कपडे टाकण्याच्या कारणावरुन दोन महिलांमध्ये हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये अल्का चंद्रकांत घुले (वय ५०, रा. वानखेडे हौसिंग सोसायटी) यांना बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वानखेडे हौसिंग सोसानटी परिसरात अल्का चंद्रकांत घुले या वास्तव्यास असून त्या नर्स म्हणून नोकरी करतात, त्यांच्या घराशेजारी असलेल्या उपषा उत्तम घुले यांच्यासोबत सामाईक भिंतीवर कपडे टाकण्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला, या वादातून उषा घुले व नितीन घुले यांनी अल्का घुले यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत अल्का घुले यांचा हात फ्रैक्चर झाला असून त्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  अल्पवयीन असतानाही विवाह करून दिला त्यातच मुलीला जन्म दिल्याचा प्रकार दि. २७ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह सासू, सासरे आणि आई-वडिलांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी राहते. अल्पवयीन असताना तिच्या आई-वडिलांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील एका तरुणाशी लग्न लावून दिले. हे लग्न ऑगस्ट २०२२ मध्ये झाले. त्यानंतर पिडीतीने मुलीला जन्म दिला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात पतीसह सासू, सासरे आणि आई-वडिलांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि…

Read More