Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन पिस्तुल घेत माजवत होता दहशत : एलसीबीने घेतले ताब्यात !
    क्राईम

    दोन पिस्तुल घेत माजवत होता दहशत : एलसीबीने घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskDecember 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका परिसरात बनावट गावठी दोन पिस्तूल आणि १५ जिवंत काडतुसे घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत अटक केली आहे. यावेळी नमीर खान आसिफ खान (वय-१९) याला अटक करण्यात आले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील काट्याफाईल परिसरात संशयित आरोपी नमीर खान आसिफ खान हा सोबत २ गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत कडतुस घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता काट्याफाईल परिसरात कारवाई करत संशयित आरोपी नामीर खान याला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळून गावठी बनावटीचे २ पिस्तूल आणि १५ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी याच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्याच्या राजकारणात खळबळ: १७ रिक्त जागांसाठी निवडणूक, मेमध्ये आणखी ९ जागांचा फैसला

    April 16, 2026

    बांधकाम कामगार भांडी योजना लाभासाठी शंभर रुपयांची लाच!

    April 16, 2026

    नाशिक धर्मांतर-छळ प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; ‘निदा खान’च मुख्य सूत्रधार !

    April 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.