Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  रस्त्याने जात असताना काहीही कारण नसताना सोमनाथ निंबा वंजारी (२९, रा. रामेश्वर कॉलनी) यांना मारहाण करीत त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी घडली. या प्रकरणी दादू ऊर्फ दीक्षांत देवीदास सपकाळे व त्याच्यासोबत असलेल्या एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सपकाळे याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ३१ रोजी संध्याकाळी मजुरी काम करणारे सोमनाथ वंजारी हे सिद्धार्थनगर रस्त्यावरून जात असताना तेथे उभ्या असलेल्या दीक्षांत सपकाळे याने माझ्याकडे काय पाहतो, असे म्हणत मारहाण केली. त्यावेळी सोमनाथ हे तेथून निघून गेले. त्यानंतर मेहरुण तलावाकडून परत येत असताना…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  शहरातील धुळे रोडवरील पुन्शी पेट्रोलपंपासमोर आपसातील भांडण मिटविण्यासाठी मध्यस्थी केल्याप्रकरणी प्रवीण विलास गोत्रे व मच्छिंद्र गोत्रे यांना चाकूने मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी विसपुते (३५) याने मच्छिंद्र गोत्रे यांच्या छातीला चावा घेतला. धनंजय विसपुते (४०) याने प्रवीण गोत्रे यांच्या पोटात चाकूने घाव घातला. या घटनेत हे दोघेही जखमी झाले आहेत. प्रवीण गोत्रे यांच्या फिर्यादीवरून धनंजय विसपुते व पवन विसपुते या दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे. तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी करीत आहेत.

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  शहरात पोलिसावर चाकूहल्ला करणा-या संशयित आरोपीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना भुसावळात सोमवारी सकाळी सुनील मैलेलू उघडकीस आली. सुनील व्यंकय्या मैलेलू (२२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील गडकरी नगराजवळील शिवदत्त नगर परिसरात रविवारी दुपारी कौटुंबिक वादानंतर मुलाकडून आई- वडिलांना ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्रस्त पित्याने ११२ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केली होती. यानंतर मदतीसाठी गेलेले बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी अक्षय चव्हाण (३३) यांच्यावर संशयित तरुणाने चाकूने हल्ला केला होता. यानंतर संशयित आरोपी पसार झाला होता. सोमवारी त्याचा मृतदेह रेल्वे मार्गाजवळ आढळून आला. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक पती व पत्नीमध्ये छोट्या मोठ्या कारणाने भांडण सुरु असते. पण काही कालातंराने हे भांडण शांत देखी होत असते पण एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे. एका शुल्लक कारणावरुन बायकोने कात्रीने हल्ला करत नवऱ्याचा डोळ्याला इजा पोहोचवली आहे. नवरा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये बागपत जिल्ह्यात नवऱ्याने बायकोकडे गाणी ऐकण्यासाठी मोबाईल मागितला होता. यावरुन झालेल्या वादानंतर ही घटना घडली आहे. प्रियंका असे पत्नीचे नाव आहे. तर अंकित असे तिच्या नवऱ्याचे नाव आहे. अंकितने प्रियंकाकडे गाणी ऐकण्यासाठी तिचा मोबाईल मागितला होता. परंतु,…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील काही राज्यात सायबरवरून होणारी लुट गेल्या काही वर्षापासून झपाट्याने वाढत चाललेली असतांना आता नवीन एक मोठा घोटाळा समोर आला आहे. हि घटना बिहार राज्यातून समोर आली आहे. महिलांना प्रेग्नंट करण्याच्या नावावर अनेकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पगार बिहार सायबर पोलिसांनी पदार्फाश केलाय. महिलांना प्रेग्नंट करा, १३ लाख रुपये मिळवा. महिला प्रेग्नंट नाही झाल्या तरी ५ लाख कुठेच गेले नाहीत, अशा प्रकारची ऑफर तरुणांना देऊन त्यांना लुटले जात होतं. याप्रकरणी बिहार पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८ जणांना अटक करण्यात आलीय. नोकरी नाही का, पैशाची तंगी आहे, लखपती बनायचंय तर ही स्कीम तुमच्यासाठी आहे, असे मेसेज अनेक तरुणांना सोशल…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात नव्या वर्षाचे जंगी स्वागत होत असतांना एक धक्कादायक बातमी जपानमधून समोर आली आहे. जपानमधील एका प्रांतात नेहमीच भूकंपाचे हादरे जाणवत असतात. आज देखील जपानमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. हा भूकंप तब्बल ७.४ रिश्टर स्केलचा होता. भूकंपानंतर समुद्र किनाऱ्यालगतच्या शहरांना त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. भूकंपाच्या रिश्टर स्केलचे प्रमाण जास्त असल्याने यात नागरिकांच्या घरांचे तसेच अन्य मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या ठिकानचे काही व्हिडीओ देखील समोर आलेत. नोटो द्वीपकल्पात शेजारील शहरांत भूकंप झाल्यानंतर असलेल्या परिस्थितीचा व्हिडीओ तेथील स्थानीकांनी सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये अनेक घरांची पडझड झाल्याचे दिसत आहे. भूकंपामुळे येथील…

Read More

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहर गुन्हेगारीच्या घटनेमुळे नेहमीच चर्चेत येत असतांना आता कोल्हापूर शहर देखील गुन्हेगारीच्या घटना घडू लागल्या आहे. शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा निर्घृण खून करण्यात आलाय. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून उसाचा फड पेटवून दिला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आशाताई मारुती खुळे या विधवा महिलेचा खून कऱण्यात आला आहे. या महिलेच्या पतीचे निधन झाल्याने ती आईसोबत भादवन येथे राहते. याप्रकरणी संशयित योगेश पांडुरंग पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवार नावाच्या शेतात उसाच्या फडात योगेश याने सदर महिलेला जबरदस्ती नेले. याठिकाणी त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आशाताईने विरोध केला. तो तिला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील एका ३० वर्षीय महिलेने विषारी औषध सेवन केल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी शायदा अहमद तडवी (वय ३०) यांना दि. २९ रोजी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या कुटुंबियांनी सायंकाळच्या सुमारास त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना दि. ३० रोजी रात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. नम्रता अच्छा यांनी दिलेल्या…

Read More

पुणे : वृत्तसंस्था दिलेले पैसे परत मागितल्याने भावाने आणि त्याच्या पत्नीने बहिणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून बहिणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी शनिवारी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता ऊर्फ नीता रामेश्वर राठोड (३१, रा. ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव आहे. याप्रकरणी सुनीता यांचे पती रामेश्वर राठोड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनीता यांचा भाऊ संदीप शामराव चव्हाण आणि त्याच्या पत्नी (दोघे रा. ताथवडे) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ६ डिसेंबर रोजी वाकड येथे घडला. फिर्यादी रामेश्वर आणि सुनीता…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कल्याणे होळ येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्यासह मुलाला लाकडाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरूवारी घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ येथे सरिता मनोज कापडणे (वय-३१) या महिला पती आणि मुलासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. जुन्या भांडणाच्या कारणावरून गुरूवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता शेजारी राहणारे भाईदास जगन कापडणे यांच्याशी वाद झाला. याच रागातून भाईदास कापडणे, छोटू जगन कापडणे, सिमाबाई, पौर्णिमा, सुनंदाबाई, मिलींद, जगन खंडू कापडणे, आणि कलाबाई (पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा. कल्याणे होळयांनी सरिता…

Read More