जळगाव : प्रतिनिधी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर मोबाईल व इतर मदत करणाऱ्या जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या किरणकुमार बकाले याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याला कारागृहात नेण्यापूर्वी मोबाईल, इअर बर्ड देऊन बोलण्याची सोय करून दिली होती. या प्रकरणी मराठा समाजाने आक्षेप घेत चौकशी व संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी ईश्वर खवले आणि चंद्रकांत पाटील या दोन्ही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांना नियंत्रण…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ धार्मिक स्थळ अभियाना अंतर्गत आज महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत बालाजी पेठ येथील बालाजी मंदिर येथे स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला. त्यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे, महानगर प्रमुख उज्वलाताई बेंडाळे, स्वच्छ धार्मिक स्थळ संयोजक डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, माजी महानगरप्रमुख दीपक सूर्यवंशी, माजी उपमहापौर, सुनील भाऊ खडके, माजी महापौर भारतीताई सोनवणे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, माजी नगरसेवक पिंटू काळे, माजी नगरसेवक विरेण खडके, ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखाताई पाटील, चित्राताई मालपाणी आदि पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पुणे दौरा असतांना पिंपरीत परिसरात पंतप्रधान आवास योजनेच्या कार्यक्रमात त्यांनी एक मोठा वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, एक किंवा दोन अपत्यावर थांबा. मी खासदार असताना असलेली लोकसंख्या आणि आता असलेली लोकसंख्या ही तुलनेने खुपचं वाढली असून काही दिवसांनी ब्रह्मदेव आले तरी घरे बांधून देऊ शकणार नाही, मी लवकर आल्याने काहींची अडचण झाली. सकाळी-सकाळी लवकर सुरुवात केली ते कामांसाठी बरे पडते. पण त्यामुळे काहींची अडचण झाल्याचे दिसत आहे. अजित पवार म्हणाले की, बाबांनो माझी तुम्हाला विनंती आहे, एक किंवा दोन आपत्यावर थांबा. मी इथला खासदार असताना असलेली लोकसंख्या…
जळगाव : प्रतिनिधी पारोळ्याजवळ शनिवारी गॅस सिलिंडरच्या टँकरला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार व पोलीस घटनास्थळी आहेत. दोन रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्याने आग विझवण्यात आली आहे. या आगीत कोणतेही जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले आहे पारोळा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याने गॅस सिलेंडरने भरलेल्या टँकरला भीषण आग झाले लागल्याची घटना शनिवारी २० जानेवारी रोजी मध्यरात्री घडली आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पारोळा येथील तहसीलदार आणि पोलीस कर्मचारी…
मुंबई : वृत्तसंस्था देशातील प्रत्येक रामभक्तांना अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या दर्शनाची ओढ लागली असतांना राम भक्तांना श्रीरामाच्या भेटीची आतुरता लागली आहे .याच भक्तीचा फायदा कल्याणमध्ये तिघांनी घेतल्याचं उघड झालं आहे .आम्ही तुम्हाला श्रीरामाचं दर्शन घडवून आणतो, असं आमिष दाखवून एका 58 वर्षीय महिलेचे सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले आहेत. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे . पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. तक्रारदार महिला बुधवारी दुपारी खडकपाडा भागातून पायी चालली होती. यावेळी त्यांना तीन भामट्यांनी अडवले. आम्ही रामभक्त आहोत, आम्ही तुम्हाला प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवून आणतो. यासाठी…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथील नेहमीच सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाच्या बाबतीत अग्रेसर असलेले जीपीएस मित्रपरिवार यांचा वतीने आयोध्या येथील श्रीराम लल्ला यांचा प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचा पार्श्वभूमीवर पाळधी सह परिसरातील गावांमध्ये श्रीराम ध्वजाचे वाटप करण्यात येत आहे. येत्या 22 जानेवारी रोजी आयोध्या नगरीत श्रीराम लल्लांचे प्राणप्रतिष्ठान सोहळा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर देशासह राज्यभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी विविध उपक्रम राबविले जात आहेत त्याचप्रमाणे पाळधी येथील जीपीएस मित्रपरिवार यांनी देखील सुंदर असा उपक्रम हाती घेत प्रत्येक घरावर श्रीरामांचा ध्वज असावा या प्रामाणिक धार्मिक हेतूने ध्वजाचे वाटप केले आहे. सदर उपक्रम हा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून आत्महत्या होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घडत असतांना नुकतेच जळगाव शहरातील एका परिसरात ३३ वर्षीय तरुणाने चक्क कामासाठी गेलेल्या आईला मोबाइलवरून मी आत्महत्या करत आहे, असे सांगत गळफास घेवून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात निकेतन समाधान पाटील (वय ३३) या तरुणाने गुरुवार, १८ रोजी अपार्टमेंटमध्ये सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवारी निकेतन पाटीलची आई गावात कामाला गेलेल्या होत्या. त्यामुळे निकेतन हा घरी एकटाच होता. त्याने आईला मोबाइल करून आत्महत्या करत असल्याचे सांगून…
जळगाव : प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील कुसुंबा येथील एका २४ वर्षीय महिलेला मूलबाळ होत नव्हते. त्यामुळे सासरच्यांनी छळ केल्याच्या कारणावरून महिलेने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबा येथील वर्षा गणेश सूर्यवंशी (२४) हिचे ३ वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिला मूलबाळ होत नसल्याने घरात वाद होत होते. यात १८ तारखेलाही पती-पत्नी आणि सासू यांच्यात वाद झाला. या जाचाला कंटाळून वर्षाने विषारी द्रव प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. सुनील मांगू पाटील (४७) यांच्या फिर्यादीवरून पती गणेश उर्फ परेश संजय सूर्यवंशी (२९), सासरे संजय आत्माराम सूर्यवंशी (५३), सासू रेखाबाई संजय सूर्यवंशी (४८,…
मालेगाव : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच मनमाड-मालेगाव मार्गावर चोंडी घाटाजवळ एका अवघड वळणावर भरधाव बसने ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला बसने पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार तर बस मधील ७ ते ८ प्रवाशी जखमी झाले आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या अपघातामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. जखमींना मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
वर्धा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडल्यानंतर आरोपींना कारागृहात पाठविण्यात येत असते पण या आरोपीचा माज कारागृहात सुद्धा उघड होत आहे. नुकतेच वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कारागृह अधीक्षकांना भेटू दे म्हणत कैद्याने कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी कैद्यावर वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वर्धा शहर पाेलिस तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनूसार वर्धा कारागृह अधीक्षकांना भेटण्याचा तगादा लावत न्यायदीन बंदीवानाने थेट कर्तव्यावर असलेल्या हवालदाराशी धक्काबुक्की केली. त्यास मारहाण करीत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. न्यायदीन बंदीवानाचे नाव रेहमत खान हबीब खान पठाण (रा. हिंगणघाट) असे आहे. ताे जिल्हा कारागृहात बंदीस्त आहे. कारागृहातील हवालदार बॅरेक…

