जळगाव : प्रतिनिधी
देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ धार्मिक स्थळ अभियाना अंतर्गत आज महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत बालाजी पेठ येथील बालाजी मंदिर येथे स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला.
त्यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे, महानगर प्रमुख उज्वलाताई बेंडाळे, स्वच्छ धार्मिक स्थळ संयोजक डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, माजी महानगरप्रमुख दीपक सूर्यवंशी, माजी उपमहापौर, सुनील भाऊ खडके, माजी महापौर भारतीताई सोनवणे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, माजी नगरसेवक पिंटू काळे, माजी नगरसेवक विरेण खडके, ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखाताई पाटील, चित्राताई मालपाणी आदि पदाधिकारी उपस्थित होते.