परभणी : वृत्तसंस्था जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथील नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तिच्याच पतीने धारदार शस्त्राने वार करीत हत्या केली. गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. घटनेनंतर जयश्री हिचा पती रोहित गायकवाड हा बोरी पोलिस ठाण्यात हजर झाला, वारंवार सांगूनही पत्नी जयश्री ही आपल्यासोबत राहायला तयार होत नसल्याने आपण रागाच्या भरात तिचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील रोहित गायकवाड ( वय २२) याच्याशी दोन वर्षापूर्वी जयश्री वाव्हळ प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते दोघे छत्रपती संभाजीनगर येथे काही दिवस सोबत राहिले. जयश्री ही गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास शाळेत जात असताना पती रोहित याने धारदार…
Author: editor desk
वडोदरा : वृत्तसंस्था गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील हरणी सरोवरात एक नौका उलटल्याचा दुर्दैवी प्रकार गुरुवारी दुपारी घडला. यात सुमारे १६ जणांना जलसमाधी मिळाली आहे. मृतांमध्ये १४ बालके व २ शिक्षकांचा समावेश आहे. त्यांनी जीवरक्षक जॅकेट परिधान केले नव्हते. त्यामुळे सरोवरात पर्यटन भ्रमंती करणे त्यांच्या जीवावर बेतले. या दुर्घटनेतून ९ बालके व २ शिक्षकांचे प्राण वाचवण्यात मोठे यश आले आहे. या सर्वांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या महितीनुसार, वडोदऱ्यातील न्यू सनराइज शाळेतील २३ विद्यार्थी सुट्ट्या असल्यामुळे हरणी सरोवरात पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्या सोबत सुमारे चार शिक्षक होते. यापैकी कोणीही जीवरक्षक जॅकेट परिधान केले नव्हते. याचदरम्यान अचानक नौका 1 उलटली.…
जामनेर : प्रतिनिधी विटांनी भरलेले मालवाहू वाहन गटारीच्या ढाप्यावरून जात असताना तो ढापाच तुटला. त्यामुळे हे वाहन उलटले. यात विटांखाली दबला गेल्याने एक जण जागीच ठार झाला. तर, एक जण गंभीर जखमी आणि दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, म्हसावदवरून नेरी मार्गे अजिंठाकडे जाणारी एम.एच. ०४ डी.डी. ७७०९ ही विटांनी भरलेली गाडी नेरी दिगर येथील विकास सोसायटीजवळ समोर उभ्या असलेल्या कापसाच्या गाडीला ओव्हरटेक करत होती. त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीवरून गाडी गेल्यामुळे गटारीचा ढापा तुटला आणि गाडी उलटी होऊन एक मजूर गाडी आणि विटांमध्ये दाबला जाऊन ठार झाला. श्याम तुळशीराम पाठे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका परिसरात सकाळी १० वाजेच्या सुमारास आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी १७ जानेवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको परिसरात अमोल चंद्रकांत आराक (वय ३४) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात ललीत ऊर्फ लल्या संतोष वाघ (रा. पिंप्राळा) याने अमोल आराकच्या आईला शिवीगाळ केली होती. आईला शिवीगाळ का केली, असा जाब अमोलने विचारला. याचा राग आल्याने ललीत वाघ याने शिवीगाळ करून धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केली. याबाबत संशयित आरोपी ललीत…
भुसावळ : प्रतिनिधी शेतातील सामायिक ट्यूबवेलचे पाणी घेण्यावरून एका शेतकऱ्याला दोन जणांनी काठी व फावड्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना १७ रोजी भुसावळ तालुक्यातील वांजोळा शिवारात घडली. याप्रकरणी आपसातल्या दोघा नातेवाइकांविरोधात भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील बहिरूंबा बाबा मंदिराजवळील रहिवासी राजेंद्र यादव बावस्कर (५२) हे या घटनेत जखमी झाले आहेत. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी १७ रोजी सकाळी साडेनऊ वाजता ते वांजोळा शिवारातील त्यांच्या शेतात सामायिक ट्यूबवेलमधून पिकांना पाणी भरत होते. त्यावेळी रवींद्र यादव बावस्कर आणि पंकज रवींद्र बावस्कर (दोन्ही रा. खळवाडी, भुसावळ) यांनी राजेंद्र यांना मारहाण केली. या…
जळगाव : प्रतिनिधी अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करुन त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ३० हजारांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी चौघा संशयितांविरुद्ध पोक्सो व खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती डीवायएसपी संदीप गावित यांनी गुरुवारी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाची काही महिन्यांपूर्वी स्विमिंग शिकत असताना संशयितांसोबत ओळख झाली होती. त्यानंतर दि. १७ रोजी संशयितांनी पीडित मुलाला खान्देश कॉम्प्लेक्स परिसरात नेत त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करून त्याचा व्हिडीओ बनवला. संशयितांनी पीडित मुलाकडे ३० हजारांच्या खंडणीची मागणी केली. मुलाकडून क्यूआर कोडद्वारे दोन वेळा रक्कमही घेतली. परंतु तरीही संशयित आरोपींची मागणी वाढतच असल्याने पीडित…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील लढा देत आहे. नुकतेच मुंबईतील आंदोनलाच्या तयारीसाठी घेतलेली येत्या २० जानेवारीला संपत आहे. त्याआधी सरकारकडून मनोज जरांगे यांनी मनधरणी करण्यात यश येताना दिसत नाही. बच्चू कडू यांनी तोडगा निघाल्याचा दावा केला होता. मात्र स्वत: मनोज जरांगे यांनी हा दावा खोडून काढला आहे. मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत बच्चू कडू यांचा दावा खोडून काढला आहे. कोणताही तोडगा निघाला नाही, नुसती चर्चा सुरू आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. चार महिन्यांपासून जी चर्चा सुरू आहे, तीच चर्चा अजूनही सुरू आहे.आधी नोंदी मिळालेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्या. सगेसोयरे व्याख्या स्पष्ट…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ग्रामीण भागासह शहरात देखील मोठ्या प्रमाणात गांजा विक्री सुरु असल्याच्या अनेक घटना घडत असतांना यावर पोलीस विभागातर्फे मोठी कारवाई देखील सुरु आहे. नुकतेच पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने एकाच दिवशी केलेल्या दोन कारवाईत 1 कोटी 31 लाख 55 हजार 300 रूपये किमतीचा जवळपास 96 किलो 87 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी कृष्णा मारुती शिंदे, अक्षय बारकू मोरे, हनुमंत भाऊसाहेब कदम, देवी प्रसाद उर्फ देवा सिताराम डुकळे या चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक चार चाकी वाहन आणि दोन मोठ्या रुग्णवाहिका जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातून पिंपरी…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथे एका स्कूल बसने चार वर्षाच्या मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. या घटनेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी जमलेल्या जमावाने संतप्त हाेत स्कूल बस पेटवून दिली. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार या घटनेनंतर स्कूल बस चालक हा पळून गेला. या घटनेत हमजा शाहरुख शेख या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ताे त्याच्या आई समवेत किरणा दुकानात निघाला होता. या दरम्यान सुसाट वेगाने आलेल्या बसने त्याला चिरडले. हे दृष्य पाहून हमजा याची आई भावूक झाली. तिने हंबरडा फाेडला. दरम्यान संतप्त जमावने या बसमधील 10 ते 12…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील गोविंदा रिक्षा थांब्याजवळ १६ जानेवारी रोजी रात्री हेमराज येसाजी चव्हाण (वय ३६, बालाजीपेठ, मारवाडी व्यायामशाळेजवळ) या तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. यात तरुण जखमी झाला असून, या वादात चौकात दगडफेकही झाली. हल्लेखोर दुचाकीने पसार झाल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गोविंदा रिक्षा थांब्याजवळ १६ जानेवारी रोजी रात्री पावणेअकरा वाजता येसाजी व त्याचा मित्र रोहन कुरकुरे हे पायी फिरत असताना भगवान सोनवणे याचा फोन आला व त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ का करतोय असे विचारल्यावर त्याने चौकातील डीपीजवळ असल्याचे सांगितले. तेथे गेल्यावर भगवान सोनवणे व इतर दोघांनी धक्काबुक्की करत एकाने चॉपर काढून पोटात वार केला.…

