Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी प्रत्येकाच्या परिवारात सासू – सुनेमध्ये वाद होत असतात पण सासू सुनांच्या कौटुंबिक वादातून विषारी औषध प्राशन केलेल्या मैसुनाबाई दिलीप तडवी (४५, रा. घोरकुंड, ता. सोयगाव) या सासूचा जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, यावेळी झटापटीत विषारी औषध सुनांच्या अंगावरही पडल्याने त्यांनाही विषबाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील घोरकुंड येथे मैसुनाबाई तडवी यांचा मंगळवार, १६ जानेवारी रोजी संध्याकाळी त्यांच्या सुना सपना राजू तडवी (२५) आणि रुबिना आशिष तडवी (२२) यांच्यासोबत वाद झाला होता. यात मैसुनाबाई यांनी रागाच्या भरात पिकांवर फवारणीचे औषध सेवन केले. दोन्ही सुनांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकालेची दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर बुधवार, १७ जानेवारीला ऑनलाइन पद्धतीने न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास बकालेची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले गुन्हा दाखल झाल्यानंतर साडे सोळा महिन्यांनी सोमवार, १५ जानेवारी रोजी पोलिसांना शरण आला होता, त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी संपल्याने बकालेला बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ऑनलाइन पद्धतीने न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी त्याला मुख्य न्याय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत व त्यासाठी संबंधित कंपनीचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगून दीपाली मकरंद चौधरी (३३, रा. विद्युत कॉलनी, जळगाव) यांची नऊ लाख ८२ हजार ५० रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दीपाली चौधरी यांच्याशी २८ नोव्हेंबर २०२३ ते १६ जानेवारी २०२४ दरम्यान अभिलाषा, अल्बर्ट त्रिवेदी, अक्षय ठाकूर असे नाव सांगणाऱ्यांसह एका कंपनीच्या कस्टमर केअरच्या वतीने संपर्क साधण्यात आला. चौधरी यांना एका कंपनीचे नाव सांगून त्यामार्फत शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास त्याबाबत मोठा नफा मिळण्याची बतावणी केली.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वावडदे ता जळगाव येथे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत चौफुलीवर आरटीओ विभागकडून मोहीम राबविण्यात आली यावेळी आर टी ओ अधिकारी सचिन राठोड यांनी ट्रॅक्टर, ट्रेलर व अवजड वाहनांना सुरक्षा स्टिकर (रिफ्लेक्टर ) लावून ही मोहीम राबवली. यावेळी आरटीओ विभागाचे अधिकारी उमेश सोलापुरे व वाहनचालक मोईन पिंजारी व पत्रकार सुमित पाटील तसेच इतर वाहन चालक आणि नागरीक उपस्थित होते,

Read More

भुसावळ : प्रतिनिधी भरधाव चारचाकी वाहन दुभाजकावर आदळल्याने चालक देवेंद्र जालंदर पवार (२१, रा. साक्री फाटा भुसावळ) हे ठार झाले. हा अपघात बुधवार, १७ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रात नोकरीला असलेले देवेंद्र पवार हे बुधवार, १७ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता चारचाकी वाहनाने (क्र. एमएच १९, सीवाय ९६१६) भुसावळ येथून दीपनगर येथे जात होते. दीपनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव वाहन दुभाजकावर आदळले. यात देवेंद्र यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना एक धक्कादायक घटना चांदवड तालुक्यातील दुगाव याठिकाणी घडली आहे. जमीन व्यावसायिक राजू शिंदे यांच्यवर चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील दुगाव येथील जमीन व्यावसायिक राजू शिंदे (वय ४५) यांच्या छाती, मांडी, मानेवर चाकूने वार करण्यात आले. चाकूने वार केल्यानंतर शिंदे हे जमिनीवर कोसळले. घटनेत गंभीर जखमी शिंदे यांना सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित केले. राजू शिंदे हे नावाजलेले व्यावसायिक होते. त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. शिंदे यांच्यावर चाकूने वार केल्यानंतर संबंधित व्यक्ती…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक मोठ्या शहरात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी घटना समोर येत असतांना एक धक्कादायक घटना हरियाणातील यमुनानगरमध्ये घडली आहे. एका महिलेने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली असून पतीला संपवण्यासाठी महिलेने युट्यूबवरुन आयडिया शोधून काढली. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडसह तिघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी मीनाक्षी हिची साहिल नावाच्या व्यक्तीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीचं नंतर प्रेमात रुपांतर झालं. मात्र साहिलच्या प्रेमात पडताना मीनाश्रीला आपलं लग्न झाल्याचा विसर पडला. मात्र साहिलच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मीनाक्षी प्रेमासाठी पतीचाच काटा काढण्याचं ठरवलं. पतीच्या हत्येसाठी मीनाक्षी यूट्युबवर वेगवेगळ्या आयडिया शोधत होती. महिलेने तिच्या प्रियकरासह पती…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय सुरु असल्याच्या घटना अनेक ठिकाणी उघडकीस येत आहे. नुकतेच पुणे पोलिसांनी शहरात हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला आहे. पोलिसांनी राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेलला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी पुण्याच्या विमाननगर भागात ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील विमाननगर भागात पोलिसांकडून हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेलला ताब्यात घेण्यात आलं आहे. राजास्थानी अभिनेत्री आणि २ मॉडेल ऑनलाइन वेश्या व्यवसाय करण्यासाठी पुण्यात आल्यानंतर पुणे शहर गुन्हे शाखेने विमाननगर भागातून ताब्यात घेण्यात आलं आहे. विदेशातून ऑनलाइन माध्यमातून वेश्या व्यवसाय भारतात चालवण्यात यायचा. या ऑनलाइन वेश्या व्यवसायासाठी…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होवून मनोज अशोक नाथ (वय 33, रा. – रामपेठ, वरणगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार दि. १५ जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील रामपेठ परिसरात मनोज नाथ हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. सोमवार दि. १५ जानेवारी – रोजी दुपारी मनोज हा दुचाकीने – वेल्हाळे येथून घरी जाण्यासाठी निघालेला होता. विल्हाळे ते वरणगाव रस्त्यावर त्यांची – दुचाकी अचानक घसरली. या अपघातात मनोज नाथ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान, रस्त्यावरील ग्रामस्थांनी धाव…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांना जीवे मारण्याची धमकी प्रतिबंधित दहशतवादी संघटना शिख फॉर जस्टीसचा (एसएफजे) संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नूने मंगळवारी दिली आहे. मान यांची तुलना माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्याशी करीत ध्वजारोहण सोहळ्यात खलिस्तान समर्थकांनी त्यांना रोखावे, असे आवाहन पन्नूने केले. मोदी व मान यांना धमकी दिल्यानंतर गुप्तचर व तपास संस्था अॅलर्टवर आहेत. दिल्ली व पंजाबमध्ये सध्या कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुख्यात खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने पत्रकारांना ईमेलद्वारे पत्र व दोन व्हिडीओ पाठवत नरेंद्र मोदी व भगवंत मान यांना धमकी दिली. विदेशातील व…

Read More