Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी मध्यप्रदेश, गुजरातसह राज्यात विविध ठिकाणी बंद घर फोडून चोरी करणाऱ्या टोळीतील जियाऊल्ला खान असदऊल्ला खान (वय ६० रा. नांदुरा जि. बुलढाणा), सैय्यद अफसर सय्यद अजगर (वय २२ रा. पिंप्राळा हुडको) या दोघांच्या रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने सोमवारी पिंप्राळा हुडको परिसरातून मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील घरफोडी आणि ऑडीटर कॉलनीतील घरफोडी केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही घरफोडी करणारी टोळी ही सैय्यद अफसर याच्या पिंप्राळा हुडको येथील घरात राहत असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ सुशिल चौधरी यांना मिळाली.…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील मनवेल येथील माहेर असलेल्या पुष्पा जितेंद्र कोळी (वय २५) या विवाहितेने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील मनवेल येथील माहेर असलेल्या पुष्पा कोळी यांचा तीन वर्षापुर्वी घटस्फोट झाला होता. त्यामुळे त्या आपल्या आई-वडीलांसोबतच वास्तव्यास होत्या. सोमवार रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांनी घरातील छताच्या लाकडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना विवाहितेच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच, त्यांनी लागलीच विवाहितेला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन विवाहितेला मृत घोषीत…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील डेअरी भागातील मॉडर्न डेअरीच्या मागे सार्वजनिक जागेत सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. त्यात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात १ लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २२ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. पोहेकों नितीन वाल्हे, भूषण पाटील, महेंद्र पाटील, पोकाँ भरत गोराळकर, राकेश महाजन, विजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. मॉडर्न डेअरीच्या पाठीमागे काही लोक घोळका करून पैसे फेकून पत्ता जुगाराचा खेळ खेळताना दिसल्याने त्यांच्यावर अचानक छापा टाकून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी मुख्यमंत्री शिंदेवर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रतिउत्तर दिले आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची पाहणी आज केली यावेळी माध्यमांशी बोलत होते. ‘जो राम का नही वो किती काम का नही’ असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. केली. रामाने त्यांना (उद्धव ठाकरेंना) सद्बुद्धी द्यावी, काँग्रेसला बाळासाहेबांनी विरोध केला त्यांना त्यानी सत्तेत घेतलं. लग्न एकाबरोबर संसार एकाबरोबर आणि हानीमून एकासोबत केलं. सत्तेच्या खूर्चीसाठी आणि अहंकारापोटी ते वागत आहेत त्यामुळे लोकं त्यांना सोडून जात आहेत, असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना…

Read More

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था शहरातील एका परिसरात दोन गटात तुफान राडा झाला असून लाठ्या काठ्यांनी हाणामारी तसेच दगडफेक देखील करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 64 जणांना अटक केली आहे. रस्त्याच्या वादातून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन गटात तब्बल दीड तास दगडफेक सुरू होती, यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी अश्रू -धुरांच्या नळकांड्यांचा देखील वापर केला. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना पडेगावमधील आहे. एका घरासमोर 4 मुले बसल्याच्या कारणावरून दोन गटांत वादावादी झाली. या वादावादीचे रुपांतर लाठ्या-काठ्या आणि दगडफेकीमध्ये झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात राम मंदिराचा उद्घाटन उत्साह सुरु असतांना दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावामध्ये घसरण होईल, अशी सर्वांनाच आशा होती. परंतु आता ग्राहकांच्या या आशेची निराशा झाली आहे. कारण मंगळवारी सोन्याच्या भावामध्ये कोणतीही घसरण झालेली नाही.मात्र दुसऱ्या बाजूला चांदीचे भाव घसरले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना सोन्याऐवजी चांदी खरेदीवर जास्त भर द्यावा लागणार आहे. अशा स्थितीत तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पहिले आजचे भाव तपासा. Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,800 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,050 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची…

Read More

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील ऑफिसचे काम संपवून सिल्लोडला निघालेल्या शासकीय वाहनाचा झालेल्या अपघातात तहसील कार्यालयातील तीन कर्मचारी जखमी झाल्याची घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात घडली. या घटनेतील जखमी झालेल्या लोकांना सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या अपघाताबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर सिल्लोड मार्गावर केरळा फाटा जवळील पेट्रोल पंप समोर हा अपघात झाला. तहसील कार्यालयाचे वाहन एका उभ्या असलेल्या वाहतुकीच्या वाहनास धडकले यामध्ये तिघेही जण जखमी झाले आहे. या तिघांना सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. या घटनेत वाहन चालक कयूम देशमुख, कोतवाल राजीव…

Read More

सावदा : प्रतिनिधी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीत सर्व रामभक्त व्यस्त असतांना चोरट्यांनी संधीचा फायदा घेत शहरातील स्वामीनारायण नगरात तीन ठिकाणी मध्यरात्री घरफोड्या केल्या. शहरात तीन ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून सुमारे 6 ते 7 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. एकाच रात्री तीन घरफोड्या झाल्यामुळे नागरीकांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कोळंबे गुरुजी (हल्ली मुक्काम पुणे) यांच्या घराचे कुलूप कापून सुमारे 18 हजार रुपये तसेच चांदीचे शिक्के लांबवण्यात आली तर त्यांच्या शेजारील भांडे व्यापारी अजय भागवत कासार (34, स्वामी नारायण नगर, पाण्याच्या टाकीजवळ) यांच्या घराची मागची खिडकीची ग्रील तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. गोदरेजचे कपाटाचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शिरसाळा येथून दर्शन घेवून पतरणाऱ्या तरुणाची दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात नेहाल राजेश माचरे (वय १८, रा. कंजरवाडा) या तरुण जागीच ठार झाला. अक्षय राजेश माचरे (वय २३) आणि त्याचे नंदुरबार येथून आलेली आतेबहीण उन्नती रविचंद्र रमाईचेकर (वय १२) हे दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा फाट्याजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात नेहाल राजेश माचरे हा तरुण आई, वडील, तीन भाऊ, एक बहिणीसह वास्तव्यास आहे. त्याचे वडील हातमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. तर नेहाला शिक्षण घेत असतांना एका फोटो स्टुडीओमध्ये काम करुन कुटुंबाला हातभार लावित…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील बहुचर्चित आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने दाखल केलेल्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या ३९ आमदारांना नोटीस जारी केली. शिंदेंनी दोन आठवड्यांत सविस्तर उत्तर देण्याचे न्यायालयाने बजावले. ठाकरे गट उच्च न्यायालयात का जात नाही? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला; पण उच्च न्यायालयात बराच वेळ जाईल. त्यामुळे आम्ही तिथे धाव घेणे टाळले, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाची असून शिवसेनेच्या दोन्ही गटांतील आमदार अपात्र नाहीत, असा निकाल महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच दिला. त्यास शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते सुनील…

Read More