Author: editor desk

रावेर : प्रतिनिधी अयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त शहरातून निघालेल्या शोभयात्रेवर भोई वाड्याजवळ समाजकंटकांकडून दगडफेक केल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी रात्रभर अटकेची मोहीम राबवित २२ संशयितांना जेरबंद केले होते. चौकशीअंती १४ संशयितांना पोलिसांनी अटक करीत त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शहरात तणावपुर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातून निघणाऱ्या शोभायात्रेवर अचानक दगडफेकीची घटना घडली. पोलिस यंत्रणा अधिक सर्तक असल्यामुळे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, तहसीलदार बी. ए. कापसे यांच्या सहकाऱ्यांनी काही वेळातच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या दगडफेकीमध्ये सहायक पोलीस निरीक्षक आशिष पाटील यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी व लहान…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील कन्हेरे येथील २२ वर्षीय तरुण काही दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाला होता. सोमवारी कन्हेरे शिवारातील एका विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल मधुकर पाटील हा दि. १३ जानेवारी रोजी घरी कोणालाच काही न सांगता निघून गेला होता. याआधीही तो दोन ते तीन वेळेस असाच घरातून बेपत्ता झाला होता. परंतु, तो प्रत्येकवेळी घरी परतत असे. मात्र, यावेळेस तो घरी आलाच नाही. सोमवारी दुपारी ३:१५ वाजेच्या सुमारास गावातील नामदेव महारू पाटील यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये त्याचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आल्याने गावकऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. याबाबत मनोज पाटील यांनी पोलिसात खबर दिली.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशातील अयोध्या येथे प्रभू राममंदिर उद्घाटन सोहळ्याचा जल्लोष अन् उत्साह देशभर पाहायला मिळतोय. या सोहळ्यावरुन राजकीय वातावरण राज्यात चांगलेच तापल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून भाजप या सोहळ्याचे राजकारण करत असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. खासदार संजय राऊत यांनीही यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. संजय राऊत यांच्या या आरोपांना आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे. “अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यामुळे देशभरात आनंदोत्सव होत आहे. आम्ही सुद्धा दर्शनाला येत्या काही दिवसात जाणार आहे. मात्र काही काळे मांजर आडवे जात आहे. फालतू प्रश्न उबाठा गटाचे नेते उपस्थित करत आहेत. तिकडे आरती चालली म्हणून…

Read More

अयोध्या : वृत्तसंस्था देशातील अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा निश्चित वेळेवर झाली असून यावेळी दिग्गज उद्योगपती, बॉलिवूड आणि दक्षिणेतील अनेक सेलिब्रिटी आणि संत उपस्थित होते. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, मुकेश अंबानी आणि पत्नी नीता, अनिल अंबानी आणि दाक्षिणात्य कलाकार चिरंजीवी-रामचरण यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. बाबा रामदेव हे बागेश्वर धामचे कथाकार पं.धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत दिसले. कतरिना कैफ, विकी कौशल, आलिया, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित हे देखील अयोध्येत आले आहेत. अनुपम खेर यांनी सोमवारी सकाळी हनुमानगढीला भेट दिली. म्हणाले, “प्रभू रामाकडे जाण्यापूर्वी हनुमानजींचे दर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.” विवेक ओबेरॉय म्हणाले, “मी पहिल्यांदाच अयोध्येत आलो आहे आणि इथे मला प्रत्येक श्वासात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक आहे. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या कक्षेत बसणारे आरक्षण देण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसी व इतर कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. शाश्वत आणि कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला मिळावे, ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी वेगवेगळ्या आघाड्यांवर शासन काम करत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी कुर्ला परिसरातील शिवसृष्टी येथील श्री गणेश मंदिर, श्री नंदिकेश्वर मंदिर, श्री हेरंब मंदिर, सिद्धेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था, श्री…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील प्रत्येक रामभक्तांची गेल्या पाच शतकांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता आला आहे. बहुप्रतीक्षित राममंदिर प्रतिष्ठापना सोहळा अवघा काही तासांवर येऊन ठेपला आहे. गेली अनेक दशके तंबूत राहाव्या लागलेल्या रामलल्लांची सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी भव्यदिव्य मंदिरात प्रतिष्ठापना करतील, या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नव्या नवरीसारखी सजली असून संपूर्ण देश राममय झाला आहे. सुमारे ८ हजार विशेष आमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोहळ्याचे भारतासह परदेशातदेखील बेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचे विधी मंगळवारपासून सुरू झाले. पंतप्रधानांच्या हस्ते सोमवारी दुपारी प्रतिष्ठापनेचा मुख्य विधी पार पडेल. नरेंद्र मोदी सकाळी साडेदहाच्या सुमारास अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा निवडणूक प्रशासन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. उद्या (दि.२३ जानेवारी) नवीन मतदारांच्या समावेशासह मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. सध्या पुरूष व महिला मिळून ३४ लाख ९१ हजार ९८ मतदार आहेत. यात सुमारे ऐंशी हजार नव मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात २०१९ लोकसभा निवडणूकीत ३५५९ मतदान केंद्र होती. या निवडणुकीत ५ मतदान‌ केंद्राची वाढ होत मतदान केंद्रांची संख्या ३५६४ झाली आहे. जिल्ह्यात शहरी भागात १०६९ व ग्रामीण भागात २४९५ मतदान केंद्र आहेत‌. मतदान केंद्राच्या ठिकाणे शहरी भागात ४३०, ग्रामीण भागात १६०८ असे एकूण २०३८ ठिकाणे आहेत. याव्यतिरिक्त १४ ठिकाणी सहाय्यक मतदान केंद्र असू शकतात कारण…

Read More

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून खुनाच्या घटना घडत असतांना नुकतेच सांगली जिल्ह्यात देखील अशीच एक थरारक घटना घडली आहे. मित्राचे प्रेयसीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून चक्क मित्राचाच खून करण्याचा प्रकार कडेगाव तालुक्यातील वांगी या ठिकाणी घडला. या प्रकरणी संशयिताला पोलीसांनी अटक केली आहे. नामदेव प्रल्हाद शिंगे (वय ३० रा. बेघर वसाहत, नरसिंहपूर ता. वाळवा) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत नामदेव शिंगे आणि संशयित अक्षय विष्णु शिंदे यांची मैत्री असून अक्षय याला नामदेवचे प्रेयसीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यातून बुधवारी रात्री वांगी येथे राहत असलेल्या खोलीत कोयत्याने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलक मनोज जरांगे पाटील दि.२० रोजी मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. २५ जानेवारी रोजी मराठा आंदोलक नवी मुंबईत दाखल होणार आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या आंदोलक मराठा बांधवांचे २५ जानेवारी रोजी दुपारचे जेवण पनवेल येथे होईल. पनवेलमध्ये तब्बल १० लाख मराठा बांधवांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या जेवणाची जबाबदारी रायगड जिल्हा सकल मराठा समाजाने उचलली आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यात तालुकावार बैठका घेतल्या जात आहेत. १० लाख मराठा आंदोलक येतील, अशा अंदाजाने भाकरी, भाजी आणि पुलाव याची व्यवस्था केली जाणार आहे. घराघरांतून भाकऱ्या तयार केल्या जाणार आहेत. स्वयंसेवकांमार्फत जेवण…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा ‘कारसेवकांनी’ बाबरीची ढाचा पाडला तेव्हा मी तिथे उपस्थित होतो आणि मला त्याचा अभिमान आहे. असे वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, यावरुन विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर संशय व्यक्त करत टीका केली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा पुराचा आता सादर केला आहे. नागपुरातून अयोध्येतील कारसेवेला जात असतानाचे रेल्वे स्थानकावरील फोटो देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केला आहे. नागपुरातील एका वृत्तपत्रात त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर रेल्वे स्थानकावरचे फोटो प्रकाशित झाला होता. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्राचे देखील आभार मानले आहेत. https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1748909338260128242?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1748909338260128242%7Ctwgr%5Edee77f8232324b9f669cebde1d80d0987dfd24a6%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fmaharashtra%2Fdevendra-fadnavis-share-photo-present-as-karsevak-in-nagpur-political-news-pvw88 देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘जुनी…

Read More