Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बेपत्ता तरुणाने रेल्वेखाली संपविले आयुष्य !
    क्राईम

    बेपत्ता तरुणाने रेल्वेखाली संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskDecember 28, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेलेल्या प्रशांत प्रभाकर गोपनारायण (वय ३५, रा. श्रीरत्न कॉलनी) या तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही घटना असोदा रेल्वेगेटजवळ मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील श्रीरत्न कॉलनीमध्ये प्रशांत प्रभाकर गोपनारायण हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास ते घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले. काही वेळानंतर ते ईश्वर कॉलनीत राहणाऱ्या त्यांच्या मावसभावाकडे गेले, परंतू ते घरी मिळून आले नाहीत. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्रशांत गोपनारायण यांनी असोदा रेल्वेगेट जवळील खांबा क्रमांक ४२८/ २२ ते २४ – दरम्यान, रेल्वेखाली स्वःला – झोकून देत आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माणिक सपकाळे, ज्ञानेश्वर कोळी व जयेंद्रसिंग पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    दुपारपासून बेपत्ता असलेला मुलगा घरी न आल्याने गोपनारायण कुटुंबीय मुलाचा शोध घेत होते. दरम्यान, ते हरविल्याची तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गेले. याठिकाणी त्यांनी तक्रार देण्यापुर्वी पोलिसांनी प्रशांत यांचा फोटो दाखविला. यावेळी मयत आपलाच मुलगा असल्याचे बघताच त्यांच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला. प्रशांत गोपनारायण यांचे वडील सेवानिवृत्त कर्मचारी आहे. त्यांच्या मोठ्या मुलाने पाच वर्षांपुर्वी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या मुलाने आत्महत्या केल्यामुळे गोपनारायण कुटुंबियांवर दुःखा डोंगर कोसळला असून कुटुंबियांना मानिसक धक्का बसला आहे. प्रशांत यांच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मास्टर कॉलनीत भीषण दुर्घटना; बाप–लेकीचा विजेच्या धक्क्यात मृत्यू, भाची गंभीर

    December 5, 2025

    ओव्हरटेकचा अट्टहास ठरला घातक; एसटी बस दोन तुकड्यांत, तीन ठार !

    December 5, 2025

    सोनीनगरात मध्यरात्री धाड : दोन घरांत चोरी; १ लाख ६३ हजारांचा ऐवज गायब

    December 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.