Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात अनेक दिवसापासून बेकायदेशीर पद्धतीने वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बेकायदेशीर वाळूची वाहतूक असल्याने अनेक चालक हे डंपर भरधाव वेगाने पळवत असल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नेहमीच अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच जामनेर – एरंडोल रस्त्यावर भरधाव डंपरने दुचाकीस्वाला उडविले आहे. यात ६४ वर्षीय वृद्ध जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथे जामनेर एरंडोल रस्त्यावर सकाळी ६ घ्या सुमारास नि.पं.पाटील हायस्कूलच्या पुढे दर्ग्यआजवळ भरधाव वेगाने रेती वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाचे डंपरने मोटारसायकल क्रमांक MH 19DN 7914 जळके येथील रहिवासी असलेल्या कमलाकर मोतीराम पाटील वय वर्षे ६४ हे आपल्या यांना जबर…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील नाशिकमध्ये आज पाहाटेच्या सुमारास अपघाताची एक मोठी घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेल्या एका धावत्या बसने अचानक पेट घेतला. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास नाशिकच्या नांदगाव-मालेगाव रोडवर रामवाडी शिवारात इंदैरहून पुण्याला जाणा-या खाजगी ट्रॅव्हल्स गाडीचा पाठी मागील टायर अचानक फुटला. धावत्या बसचा टायर फुटल्यानंतर बसने तेथेच पेट घेतला. यावेळी वाहनचालकाने वेळीच बस थांबवत बसमध्ये असलेल्या ४० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र बसने पेट घेतला असल्याने बसमधील जे पार्सल होते ते बस सह जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच मालेगाव येथून अग्निशामक घटनास्थळी पोहचले. मात्र अग्निशामकदल घटनास्थळी पोहचेपर्यंत बस…

Read More

जालना : वृत्तसंस्था राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर शनिवारी २७ जानेवारी नवी मुंबईतून मराठा आंदोलक माघारी परतले. मनोज जरांगे पाटील देखील मध्यरात्रीच्या सुमारास जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पोहचले. मुंबईतून मराठा आरक्षण घेऊनच परतल्यानंतर गावातील मराठा बांधवांनी जरांगेचं जंगी स्वागत केलं. यावेळी डीजेवर मनोज जरांगे पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच गुलाल उधळून पेढे देखील वाटण्यात आले. मध्यरात्रीपर्यंत अंतरवाली सराटीत मराठ्यांचा जल्लोष सुरू होता. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. दरम्यान, मनोज जरांगे पाटील रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मराठा समाजाची बैठक घेणार आहेत. या बैठकीला तब्बल १२३ गावातील मराठा बांधव उपस्थित…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यात मनोज जरांगे पाटलांनी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला मोठे यश आल्यानंतर यावर मंत्री छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यांनी या अध्यादेशावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, यासंदर्भात अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता ती भूमिका राष्ट्रवादी पक्षाची नाही, असे म्हणत प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांची ती भूमिका असल्याचे म्हटले आहे. अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल पुढे बोलताना म्हणाले की, छगन भुजबळ ओबीसींच्या बाबतीत आपली भूमिका समता परिषदेच्या माध्यमातून मांडत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते समता परिषदेचे काम करत आहेत. ओबीसींच्या आणि मराठ्यांच्या आरक्षणासंबंधी त्यांची भूमिका ही समता परिषदेच्या माध्यमातून असते. ती…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरु असतांना दि.२७ रोजी दिल्ली येथे देवीचं जागरण सुरू असताना अचानक मंदिरातील स्टेज कोसळला. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून १७ भाविक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. थरकाप उडवणारी ही घटना दिल्लीतील कालकाजी माता मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. मृत महिलेचं वय ४५ वर्ष असल्याचं सांगितलं जातंय. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कालकाजी मंदिरात शनिवारी (२७ जानेवारी) रात्रीच्या सुमारास देवीच्या जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पतीच्या कामाचे पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात विवाहिता वास्तव्यास आहे. त्या विवाहितेला एकाने तुझ्या पतीच्या कामाचे पैसे द्यायचे असल्याचे सांगितले. विवाहिता पैसे घेण्यासाठी गेली तीने पैसे घेण्यासाठी आपला हात पुढे केला. त्या वेळी तिचा हात पकडून तिला घरात ओढून विनयभंग केला. ही घटना दि. २५ जानेवारी रोजी तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी महिलेने नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संजय जाधव करत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील ६६ वर्षीय वृद्धाला नाशिक जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॉट घेण्यासाठी टोकन व बुकिंग म्हणून दिलेले चार लाख ९५ हजार ३९० रुपये परत न देता खोटे दस्तऐवज देऊन गोपालसिंग भीमसिंग राजपूत यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी नाशिक येथील चार जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील सेवानिवृत्त असलेले गोपालसिंग राजपूत यांना प्लॉट घ्यायचा असल्याने त्यांनी ठाणगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक येथील प्लॉटसाठी दोन हजार २०० रुपये टोकन म्हणून दिले. बुकिंगसाठी दोन लाख ४० हजार ३९० रुपये दिले. त्यानंतर दुसऱ्या भागातील प्लॉट घेण्यासाठी दोन लाख ५५ हजार रुपये दिले. असे एकूण…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दुकानामध्ये झोपलेल्या कारागिरांना धमकावत दागिने घडवण्यासह सोने पॉलिशचे काम होणाऱ्या दुकानांमधून १४ लाख ५९ हजार ५२४ रुपये किमतीचे एकूण २५१.७८० ग्रॅम वजनाचे सोने चोरट्यांनी चोरून नेले, ही धाडसी चोरी २६ जानेवारी रोजी पहाटे मारुती पेठमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मारुती पेठ भागात एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सचिन प्रभाकर सोनार (३८, रा. रामपेठ) यांचे दागिने बनवण्याचे श्री अलंकार नावाचे दुकान असून, दुसऱ्या मजल्यावर शेख जोसीमोद्दीन बशीरोद्दीन यांचे नूर पॉलिश छिलाई सेंटर नावाचे सोने पॉलिशचे दुकान आहे. २२ जानेवारी रोजी, एका नामांकित सुवर्ण पेढीकडून सचिन सोनार यांच्याकडे…

Read More

चंद्रपूर : वृत्तसंस्था ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरातील सरकारनगर परिसरमधून समोर आली आहे. अज्ञातांनी युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर याची हत्या करण्यात आली आहे. 30 वर्षीय शिवा वझरकर याचा मृतदेह त्यांच्याच एका मित्राच्या कार्यालयाजवळच आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांच्या हत्येनंतर समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि इतर वाहनांची तोडफोड केली. पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असतानाच घडलेल्या या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. हत्येच्या घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वझरकर याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात पाठवण्यात आला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आपला लढा देत होते. आज अखेर त्यांच्या सर्वच मागण्या सरकारने मान्य केल्या आहे. सरकारने मध्यरात्रीच याबाबतचे अध्यादेश देखील काढले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करताच नवी मुंबईत मराठा आंदोलकांनी मध्यरात्रीच जल्लोष सुरू केला होता. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, तसेच आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या ५ महिन्यांपासून आंदोलन करीत होते. त्यांच्या आंदोलनाची सुरुवात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून झाली. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारने जरांगे…

Read More