Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात २७ वर्षीय महिलेचा एकाने घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी नशिराबाद पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथे एका परिसरात राहणाऱ्या २७ वर्षे महिलेला तिच्या घरी जाऊन आरोपी नामदेव फकीरा माळी रा. नशिराबाद याने महिलेच्या घरात घुसून दरवाजा बंद करून घे असे बोलून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल येईल असे कृत्य केल्याप्रकरणी पीडित महिलेने नशिराबाद पोलिसात धाव घेऊन तक्रार दिल्यावरून आरोपी नामदेव फकीरा माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी वातावरण तापविले आहे. मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत दाखल होताच या मोर्चाची सरकारने दखल घेतली असून आता सरकार मधील मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे यांच्या सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्याची घोषणा केली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाची आज मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झाली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. त्यात त्यांच्या सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्या. आता त्याची विहित नियमांत अंमलबजावणी होईल, असे केसरकर यांनी सांगितले आहे. मंत्री दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की,मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील हे संवेदनशील आहेत. ते महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून अनेक ठिकठिकाणी ध्वजारोहन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जात आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पद्म पुरस्कार विजेत्यांचेही अभिनंदन केलं आहे. मोदींनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून (पूर्वीचे ट्विटर) ट्वीट करत आपल्य ा भावना व्यक्त केल्या आहेत. काय म्हणाले PM नरेंद्र मोदी? “देशातील आपल्या सर्व कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद”, अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांच्या मान्यवरांचंही अभिनंदन केलं आहे. “पद्म पुरस्कारानं सन्मानित झालेल्या सर्वांचे अभिनंदन.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मनोज जरांगे पाटील हजारो मराठा आंदोलकांसह तब्बल ६ दिवसांच्या पायी यात्रेनंतर आज अखेर मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहेत. जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव जमले आहेत. सकाळी ९ वाजेच्या सुमारास जरांगे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेनंतर असून सकाळी ११ वाजेनंतर ते आझाद मैदानाच्या दिशेने कूच करणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी एपीएमसी मार्केटमध्ये झेंडावंदन केले. यानंतर त्यांनी पत्रकारपरिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा अद्याप झालेली नाही. थोड्या वेळात चर्चा होईल. बैठकीत तोडगा निघाला नाही तर आझाद मैदानावर जाणार आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितलं. मनोज जरांगे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील काही भागात नियमित चोरीच्या घटना घडत असतांना नुकतेच दि. २२ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास रिंगरोडवरील फॉरेस्ट कॉलनीत देखील चोरीची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील फॉरेस्ट कॉलनीतील तृष्णा अपार्टमेंटमध्ये रुपाली मुकेश पुर्णपात्रे या वास्तव्यास असून दि. २१ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास त्यांना मंदिरात जायचे असल्याने त्यांनी देवघरात ठेवलेल्या डब्यातून पैसे घेवून त्या मंदिरात गेल्या. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्या घरी परतल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे रुपाली पुर्णपात्रे या देवघर स्वच्छ करीत होत्या. यावेळी त्या त्यांच्या पतीने दिलेले पैसे ठेवण्यासाठी त्या डबा शोधत असतांना त्यांना देवघरात ठेवलेला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी हरिविठ्ठलनगर भागातील रहिवासी असलेल्या गोपाल राजू भोई (वय ३२) या युवकाचा बुधवारी रात्री वर्धमान शाळेजवळ रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरिविठ्ठलनगर भागात गोपाल राजू भोई हा युवक आपले दोन भाऊ व आईसमवेत वास्तव्यास होता. तसेच ठेकेदारीचा व्यवसाय करत होता. बुधवारी रात्री जेवण करून घराबाहेर निघाला होता. गुरुवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास गोपालचा मृतदेह सावखेडा शिवारातील रेल्वेलाइनलगत आढळून आला. पोलिसांना आधार कार्डद्वारे गोपालची ओळख कळली. या ठिकाणी गोपालची दुचाकीदेखील आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून गोपालचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तरप्रदेशमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये ट्रक आणि टेम्पोमध्ये गुरूवारी पहाटे भयानक अपघात झाला. या अपघातात १२ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रस्त्यावर पडलेले मृतदेह, नातेवाईकांच्या किंचाळ्यांनी अवघा परिसर सुन्न झाल्याचे पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये गुरूवारी पहाटे ट्रक आणि टेंम्पोमध्ये मोठा अपघात झाला. शाहंजहापूर भागातील दमगडा गावचे काही लोक गंगेत स्नान करण्यासाठी ऑटोने फरुखाबाद येथील पांचाळ घाटाकडे रिक्षामधून जात होते. यावेळी बरेली-फर्रुखाबाद महामार्गावर आल्हागंज येथील सुगुसुगी गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या ऑटोला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की ऑटोचा चक्काचूर झाला.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या २० तारखेपासून मुंबईकडे धाव घेत असतांना आता याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आझाद मैदान, शिवाजी पार्कसाठी परवानगी नसल्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाची मागणी करत लाखो बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. जरांगे पाटील यांच्या मोर्चाला प्रचंड मोठा प्रतिसाद पाहायला मिळत असून सध्या ते लोणावळ्यात आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच मुंबई पोलिसांकडून मनोज…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील भाऊसाहेब राऊत विद्यालयात झालेल्या चोरीचा छडा जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने लावला आहे. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा चौकशी करीत गुन्हा दाखल झाल्यानंतर दुस-याच दिवशी तपास लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील भाऊसाहेब राऊत विद्यालयात दिनांक १९ जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 05:20 ते दि. 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान क्रिडा दालनाच्या रुमचा कडी कोंडा तोडून त्यातील पाच नग सिलींग फॅन व एक नग ताशा असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरी केला होता. शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण सुका तायडे यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दि. 23 जानेवारी 2024 रोजी या चोरीच्या घटनेप्रकरणी फिर्याद…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मी पण येथेच राहतो म्हणत विवाहितेची वाद घालून विवाहितेच्या डोक्यात फरशी मारली. यामध्ये विवाहिता गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी योगेश कौतिक पाटील (रा. पाथरी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजीनगरात भावना योगेश पाटील (वय २८) या विवाहिता वास्तव्यास आहे. दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विवाहिता या घरी असतांना योगेश कौतिक पाटील हे महिलेच्या घरी गेले, त्यांनी महिलेला मी पण येथेच राहतो म्हणत वाद घालू लागला, महिलेने त्याला विरोध केला असता, योगेश पाटील याने महिलेचे केस धरू। तीला जमिनीवर आपटले, तसेच सोबत आणलेल्या फरशीचा तुकडा महिलेच्या डोक्यात हाणून त्यांना…

Read More