Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात माजवीत होते दहशत ; पोलिसांनी घेतले ताब्यात मात्र एक फरार !
    क्राईम

    जळगावात माजवीत होते दहशत ; पोलिसांनी घेतले ताब्यात मात्र एक फरार !

    editor deskBy editor deskDecember 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका परिसरात दोन गुन्हेगार धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवीज असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी धाव घेत एकाला अटक केली. दुसरा फरार झाला आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापुरा परिसरात धारधार चॉपर घेऊन दोन जण दहशत माजवीत असल्याची माहिती माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. निरीक्षण जयपाल हिरे यांच्या पथकातील ललित नारखेडे व इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेत तांबापुरा गाठले. रईस शेख रशीद (वय ३२, रा.तांबापुरा) व शोएब शेख सलीम (रा. जुम्मा शाहा वखारजवळ मेहरुण) असे दोघेही पोलिसांना पाहून पळू लागले. त्यापैकी रईस शेख रशीद हा पोलिसांच्या तावडीत सापडला तर त्याचा साथीदार पळून जाण्यास यशस्वी ठरला. पोलिसांना रईसकडे चॉपर आढळून आले. पोलीस नाईक ललित नारखेडे यांच्या तक्रारीवरून दोघं संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; ‘माझा घातपात करण्याचा कट सरकारकडून दडपला जातोय’

    December 8, 2025

    मध्यरात्री महिलेच्या घरात शिरून केला विनयभंग !

    December 8, 2025

    बायपासवर भीषण अपघात; कार दोनदा उलटून थेट ट्रेलरच्या डिझेल टॅंकवर धडक

    December 8, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.