अकोला : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अनेक अपघाताच्या अनेक घटना घडत असतांना एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. लग्नात आलेल्या चारचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एक ठार तर चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात अकोला जिल्ह्यात झाला आहे. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील माना येथील राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री ट्रक आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला. चारचाकी वाहनात प्रवास करणारी लोक मित्राच्या लग्नाला गुजरातहून वरुडकडे निघाले असताना ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात वाहन चालक धीरज वैराळे (राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा) याचा जागीच मृत्यू झाला आहे. या…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात भाजपच्या आमदाराने सत्ताधारी शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याची घटना घडल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. आता याच घटनेचा व्हिडीओ व्हायरल होवू लागला आहे. त्यात भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर खुलेआमपणे गोळीबार केल्याचे दिसून येत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गणपत गायकवाड यांनी आपण स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा केला होता. पण या फुटेजमुळे त्यांचा हा दावा निखालस खोटा असल्याचे स्पष्ट होत आहे. गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री उल्हासनगरच्या हिल पोलिस ठाण्यात शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरमी पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह 3 जणांना अटक केली आहे.…
पाचोरा : प्रतिनिधी येथील बसस्थानकातील जळगाव बसमध्ये चढताना एका महिलेच्या गळ्यातील ७ ग्रॅम वजनाची २० हजारांची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली असून या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील सटाणा नाका परिसरातील अयोध्या नगरमधील वैष्णवी ज्ञानेश्वर जाधव (वय २३) या खासगी कामानिमित्त पाचोरा येथे आल्या होत्या. दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वैष्णवी जाधव या पाचोरा येथून पाथरी या गावी जाण्यासाठी पाचोरा ते जळगाव बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरुन पोबारा केला. काही वेळाने वैष्णवी जाधव यांच्या लक्षात चोरीची घटना येताच त्यांनी तपासले असता…
जळगाव : प्रतिनिधी चोरीच्या दुचाकी घेऊन फिरणाऱ्या धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी गुरुवार १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सुप्रीम कॉलनी परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैय्याज शकुर मनीयार रा. दोंडाईचा जि. धुळे सुप्रीम कॉलनी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रीम कॉलनी फैय्याज शकुर परिसरात मनीयार हा तरुण चोरीची दुचाकी असल्याची एमआयडीसी घेऊन फिरत गोपनीय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, त्यानुसार पथकाने गुरुवार १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४…
पाचोरा : प्रतिनिधी उसनवारीचे पैसे परत केले नाहीत, याचा राग येऊन दोघांनी घरात घुसून महिलेसह तिच्या पतीला मारहाण केली. महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दिनेश पाटील व अमोल पाटील यांच्याकडून पीडित महिलेच्या पतीने पैसे घेतले होते- दोघांनी उसनवारीचे पैसे घेण्यासाठी वारंवार तगादा लावला. मात्र पीडितेच्या पतीने पैसे परत केले नाहीत. याचा राग येऊन दोघांनी पीडितेच्या घरी जाऊना शिवीगाळ करीत गैरवर्तन केले. पती क पत्नीला मारहाण केली. ही घटना २७ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी पोलिसात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेको भगवान बडगुजर करीत आहेत.
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्री सेकम, फुलगावच्या जवळ शेत रस्त्यावर वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाने दि. १ रोजी रात्री अडवले. या वाहनाच्या चालकाला वाहन तहसील कार्यालयात नेण्याची सूचना केली. मात्र वाहन चालक ऐकण्यास तयार नव्हता. त्याचवेळी तेथे २५ ते ३० जणांचा जमाव आला. आणि कारवाईला विरोध करत होता. महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांची मदत घेतली. पोलिस घटनास्थळी आल्यावर जमाव पांगला आणि वाहन तहसील कार्यालयात नेण्यात आले. तापी पात्रामध्ये अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक करीत असताना महसूल विभागाच्या पथकाने किरण संतोष सूर्यवंशी रा. रामपेठ, वरणगाव याच्या मालकीचे ट्रॅक्टर पकडले. दरम्यान मदतीसाठी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन जगताप, सहायक पोलिस…
जळगाव : प्रतिनिधी बँकेमध्ये गेल्यानंतर विवाहितेची एका जणाशी ओळख झाली, त्याने जवळीक साधत मैत्री केली व नंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. त्यानंतर नोंदणी विवाह केला खरा; पण महिलेला घरी नांदण्यास न नेता तिच्यावर वेळोवेळी जळगावसह पुणे येथे नेऊन अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विवाहितेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने अत्याचार करणाऱ्या ईश्वर गोविंद व्यास (रा. इंद्रप्रस्थ नगर) याच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका २९ वर्षीय विवाहितेची शहरातील एका खासगी बँकेत ईश्वर व्यास याच्याशी ओळख झाली त्यावेळी त्याने विवाहितेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, मी विवाहित असल्याचे महिलेने…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी कृष्णा महादेव गोरे (वय २५) रा. कुसुंबा, ता. जळगाव याला जिल्हा न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी गोरे याने त्याचा मित्र अनुप मांडवे याच्या मदतीने दि. १० जून, २०२१ रोजी पीडितेला पळवून नेल्याचा आरोप होता. त्यानंतर, अत्याचारातून ती गर्भवती राहिली होती. या प्रकरणात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात सरकार पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. यात भुसावळ येथील विशेष जिल्हा न्यायधीश व्ही.सी. बर्डे यांनी कृष्णा गोरे याला १० वर्षे सक्तमजुरी आणि दंड ठोठावला आहे, तर अनुप जितेंद्र मांडवे (वय…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्रात अध्यात्म, ज्ञान, तत्वज्ञान रूजविणार अमळनेर हे महत्त्वाचे शहर आहे. राज्याचा सर्वांगिण विकासाबरोबर साहित्य, कला, संस्कृती व क्रीडा क्षेत्रातही शहरांचा विकास झाला पाहिजे. तरच ते शहर श्रीमंत शहर म्हणून ओळखले जाईल. साहित्य संमेलनाला आर्थिक बाबतीत कमतरता पडू नये, याची दक्षता शासनाकडून घेतली जाते. मराठी साहित्य संमेलनास गौरवाशाली परंपरा आहे. तीन वर्षांनी होणारे शंभरावे साहित्य संमेलन दिमाखात पार पडण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. प्रताप हायस्कूलमध्ये सानेगुरुजींचे सहा वर्ष वास्तव्य होते. साने गुरुजींच्या स्मारकाचा प्रस्ताव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तयार करावा. या प्रस्तावानुसार साने गुरुजींच्या स्मारकास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. साने गुरुजींचे नावाप्रमाणेच भव्य स्मारक…
पाडळसे प्रकल्पाच्या माध्यमातून अमळनेर व परिसरात आर्थिक सुबत्ता येणार आहे. या प्रकल्पाच्या कामांसाठी ४८९० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे. सात उपसा सिंचन योजनेचे काम सुरू करण्यासाठी केंद्राची मदत मिळणार आहे. जून २०२५ पर्यंत या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी अडविण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाच्या कामांसाठी केंद्र शासनाची मदत घेऊन निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमळनेर तालुक्यातील पाडळसे निम्न तापी प्रकल्प धरणाची आज पाहणी केली. याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी…

