Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मैदानावर खेळता खेळता दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
    क्राईम

    मैदानावर खेळता खेळता दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

    editor deskBy editor deskDecember 31, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    उत्तरप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैदानावर क्रिकेट खेळता खेळता १० वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने मृत मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या अमरोहा येथील प्रिन्स सैनी असे या मुलाचे नाव असून आहे. राजीव सैनी यांचे कुटुंब हसनपुरनगरमधील मोहल्ला कायस्थान येथे राहते. त्यांचा मुलगा प्रिन्स श्रीमती सुखदेवी इंटर कॉलेजमध्ये दहावीचा विद्यार्थी होता. शनिवारी (३०,डिसेंबर) दुपारी तो मित्रांसोबत शहरातील सोहरका रोडवर असलेल्या मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता.

    दुपारी खेळताना प्रिन्सला तहान लागली. मैदानावरच बॉटलमधील थंड पाणी प्यायला ज्यानंतर त्याची प्रकृती खालावली आणि तो चक्कर येऊन जमिनीवर पडला. प्रिन्सला बेशुद्धावस्थेत पाहून मित्र घाबरले. माहिती मिळताच कुटुंबीय तेथे पोहोचले. त्यानंतर प्रिन्सला ई-रिक्षाच्या मदतीने खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचाराआधीच मृत घोषित केले. प्रिन्सच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. प्रिन्सला एक भाऊ- बहिण आहे. तो शाळेतही हुशार असल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले. घटनेनंतर कोणतीही कारवाई न करता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या धक्कादायक घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    माजी सरन्यायाधीश भूषण गवईंची बागेश्वर धाम भेट चर्चेत; श्रद्धा विरुद्ध अंधश्रद्धा वादाला पुन्हा उधाण

    April 22, 2026

    मंत्री महाजनांना विचारलं महिलेने जाब : मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

    April 22, 2026

    एसआयटी चौकशीत भोंदूबाबा अशोक खरातची प्रकृती बिघडली; प्रकरणाला नवे वळण

    April 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.