Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच पालघरमध्ये एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चारचाकी वाहन आणि बाईकमध्ये जोरदार धडक झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तीन जखमी झाले असून सर्वांवर उपचार सुरु आहे. अपघाताची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या बोईसर चिल्हार एमआयडीसी मार्गावर गुंदलेजवळ हा अपघात झाला आहे. भरधाव चारचाकी वाहनाने बाईकला धडक दिली. अपघाताची घटना चारचाकी वाहनाच्या डेस्क बोर्डवर लावलेल्या कॅमेरात कैद झाली. व्हिडीओमध्ये दिसतंय त्यानुसार, चारचाकी वाहन वेगाने धावत असताना अचानक समोर बाईक आडवी येते. https://twitter.com/pravinwakchoure/status/1753992537537405116?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1753992537537405116%7Ctwgr%5E4cfde292d99434e18fd9bb2e5a961ee0b6e7a0be%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fmumbai-pune%2Fpalghar-accident-video-car-hit-bike-video-viral-3-injures-pvw88 वाहन चालकाने वेग कमी करुन वाहन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला व जाळपोळ करणे असे २६ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तीन जणांच्या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. यामध्ये टोळी प्रमुख मुकेश प्रकाश भालेराव (वय २७, रा. राहुलनगर याच्यासह भरत मधुकर महाजन (वय २७, रा. शिवपूर कन्हाळा रोड) व शामल शशिकांत सपकाळे (वय २७, रा. न्यू. सातारा, भुसावळ) यांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील गुन्हेगारीला रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून कठोर कारवाईचे पाऊल उचलले जात आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांसह टोळींवर देखील कारवाई केली जात आहे. दरम्यान, भुसावळातील टोळीने – गुन्हे करणाऱ्या टोळीवर भुसावळ शहरव…

Read More

भडगाव : प्रतिनिधी मालवाहतूक वाहन अमळनेर तालुक्यातील बेटावद गावानजीक उलटल्याने गाडीतील दोनजण जखमी झाले आहेत तर गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कजगाव येथील रहिवासी सुरेश चिंधा मांडोळे व संजय किसन मोरे हे आयशर गाडीने (एम.एच.१९/झेड५५६८) कजगाव येथून कापूस भरून सकाळच्या सुमारास गुजरातला जाण्यासाठी निघाले. मात्ररस्त्यातच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी अमळनेर तालुक्यातील बेटावद गावानजीक उलटली, यात गाडीतील दोघांना मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावेळी बेटावद व त्या परिसरातील नागरिकांनी व वाहनधारकांनी जखमी दोघांना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले.

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यासह नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे असलेल्या दाखल रवी उर्फ माया महादेव तायडे (२५, रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करत स्थानबद्ध करण्यात आले. तसे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ बाजारपेठ, शहर, मुक्ताईनगर पोलिस ठाण्यासह नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलिस ठाण्यात रवी तायडे याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ११ गंभीर गन्द्रे दाखल आहेत. मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहायक फौजदार युनूस शेख ईब्राहीम, पोहेकॉ सुनील…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील मालेगावरोडवरील बायपास परिसरातील एका हॉटेलमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने हॉटेल मालक व त्याच्या मित्राने तिला धमकी देत बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी महिलेसह तिघांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एका अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये काम देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले होते. त्यावेळी हॉटेलमालक आणि त्याठिकाणी उपस्थित असलेला त्याचा मित्र यांनी तिच्यावर जबरदस्ती केली. ही अल्पवयीन मुलगी एका महिलेच्या मदतीने हॉटेलवर बोलावण्यात आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. दरम्यान, या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून दिवसभर याच घटनेची सर्वत्र चर्चा होती. घटनेची माहिती माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक अभयसिंह देशमुख यांनी शहर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी प्रा. संदीप दिलीप पाटील यांना विद्यावाचस्पती (Ph.d). झाल्याबद्दल आमदार किशोर भाऊ दराडे यांच्या शुभहस्ते व जुक्टो संघटना व माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला. दिनांक 2 फेब्रुवारी रोजी शिक्षक दरबार कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार किशोर भाऊ दराडे जळगाव येथे आले असता .त्या कार्यक्रमांतर्गत प्रा. संदीप दिलीप पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. यांच्या वतीने विद्यावाचस्पती पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली आहे. प्रा. संदीप पाटील हे किसान कनिष्ठ महाविद्यालयात सेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या संशोधनाच्या विषय जळगाव “जिल्ह्यातील शिलालेखांच्या चिकित्सक अभ्यास “या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला. त्यांचे मार्गदर्शक म्हणून प्रो. डॉ .सुधाकरराव सु. देशमुख…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकारी गेल्या अनेक दिवसापासून विविध प्रकरणाच्या माध्यमातून अडचणीत येत आहेत. दि.२ फेब्रुवारी रोजी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुख मंगेश करंजकर याने पोलिस कर्मचाऱ्याला पोलिस ठाण्यात श्रीमुखात दिल्याने शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्याप्रकरणी सत्ताधारी शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुख मंगेश सोमनाथ करंजकर याला तपासासाठी पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले होते. मंगेश करंजकर पोलिस ठाण्यात येताच पोलिस कर्मचाऱ्यांना शिव्याशाप करत मला बोलवले कसे, सत्तेत आम्हीच तुमची हिंमत कशी झाली असे म्हणत त्रास दिला तर दंगली घडवून आणेल, असे म्हणत असतानाच फिर्यादी पोलिस…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पक्षाचे नेते प्रदेश सदस्य बंगालसिंह चितोडिया यांचे अध्यक्षतेखाली जामनेर येथे नुकतीच संपन्न होऊन पक्ष बांधण्यासाठी संपूर्ण तालुक्यात युवा जागर यात्रेचा शुभारंभ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. युवा जागर यात्रा जिल्ह्यासह जामनेर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटामधून तसेच प्रत्येक गावातून जाणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष अरविंदभाऊ चितोडिया यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी अजित दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा या उद्देशाने व तालुक्यातील तरुण वर्गाने जास्तीत जास्त संख्येने अजित दादांच्या सोबत यावे. असे आवाहन अरविंद भाऊ चितोडिया यांनी केले. बैठकीत स्थानिक तालुका नेते प्रदेश सदस्य बंगालसिंह चितोडिया,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बोली भाषांना प्राचीन इतिहास आहे. अनेक बोलीभाषा काळाच्या ओघात लूप्त होत गेल्या. आपल्याला आपली प्राचीन संस्कृती जपायची असल्यास सर्व प्रथम बोली भाषांचे संवर्धन होणे गरजेचे आहे, असा सूर खान्देशी बोलीभाषा (अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर) परिसंवादात उमटला. कविवर्य ना.धो.महानोर सभागृह, सभामंडप क्रमांक २ मध्ये पार पडलेल्या खान्देशी बोलीभाषा परिसंवादात डॉ. रमेश सूर्यवंशी (अहिराणी) – कन्नड, अशोक कौतिक कोळी (तावडी) – जामनेर, डॉ. पुष्पा गावीत – (भिल्ली) – धुळे, डॉ. जतीनकुमार मेढे (लेवा गणबोली) भालोद डॉ. सविता पटेल – (गुर्जर) – नंदुरबार यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी डॉ. रमेश सूर्यवंशी होते. सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले. डॉ.सविता पटेल…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सोशल मीडियावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर ते दुसरे भाजप नेते आहेत, ज्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात येणार आहे. मोदींनी लिहिले की, ‘मला कळवताना अतिशय आनंद होत आहे की लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यात येणार आहे. मी त्यांच्याशी बोललो आणि अभिनंदन केले. ते आपल्या काळातील सर्वात आदरणीय राजकारणी आहेत. देशाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान कोणीही विसरू शकत नाही. तळागाळातून कामाला सुरुवात करून त्यांनी देशाच्या उपपंतप्रधानपदापर्यंत मजल मारली. ते देशाचे गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्रीही होते.…

Read More