जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील एका ३० वर्षीय महिलेने विषारी औषध सेवन केल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी शायदा अहमद तडवी (वय ३०) यांना दि. २९ रोजी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या कुटुंबियांनी सायंकाळच्या सुमारास त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना दि. ३० रोजी रात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. नम्रता अच्छा यांनी दिलेल्या खबरीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.