Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भावाने केला बहिणीचा छळ : बहिणीने घेतले विषारी औषध !
    क्राईम

    भावाने केला बहिणीचा छळ : बहिणीने घेतले विषारी औषध !

    editor deskBy editor deskJanuary 1, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    दिलेले पैसे परत मागितल्याने भावाने आणि त्याच्या पत्नीने बहिणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून बहिणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी शनिवारी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
    मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता ऊर्फ नीता रामेश्वर राठोड (३१, रा. ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव आहे. याप्रकरणी सुनीता यांचे पती रामेश्वर राठोड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनीता यांचा भाऊ संदीप शामराव चव्हाण आणि त्याच्या पत्नी (दोघे रा. ताथवडे) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ६ डिसेंबर रोजी वाकड येथे घडला. फिर्यादी रामेश्वर आणि सुनीता यांना दोन मुले आहेत. दोघेही मजुरीचे काम करत होते. सुनीता यांनी भाऊ संदीप याला दोन लाख रुपये उसने दिले होते. ते परत मागण्यासाठी ३ डिसेंबर रोजी त्या भावाच्या घरी गेल्या होत्या. तिथे भावाची पत्नी सुनीताने शिवीगाळ करून घरातून हाकलून दिले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री उशिरा रामेश्वर यांच्या घरी येऊन संदीप याच्या पत्नीने सुनीता यांना मारहाण केली. ४ डिसेंबर रोजी याबाबत त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, ५ डिसेंबर रोजी सुनीता एका सोसायटीमध्ये घरकाम करण्यासाठी गेल्या होत्या.

    काम करून घरी परत येत असताना त्यांना भाऊ संदीप आणि त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून बेदम मारहाण करून जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. याबाबत पुन्हा तक्रार दाखल करण्यात आली. ६ डिसेंबर रोजी सुनीता सकाळी दहा वाजता ताथवडे येथे बेशुद्ध अवस्थेत दिसल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम संधी

    December 13, 2025

    जळगावातील घरफोड्यांचा भंडाफोड; मध्यप्रदेशातील टोळी उघड

    December 13, 2025

    माझ्यावर एवढं प्रेम का? अमिताभ बच्चन यांचा मनाला स्पर्श करणारा ब्लॉग

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.