जळगाव : प्रतिनिधी नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी ट्रॅक्टरवरून लाकडं घेऊन जात असताना, मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्याने ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टर तापी नदीत कोसळल्याची घटना नांद्रा येथे गुरुवारी दुपारी अडीच वाजता घडली. या घटनेत ट्रॅक्टरचालक वासुदेव गोपीचंद सपकाळे (वय ४२, रा. नांद्रा खु. ता.जि. जळगाव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे वासुदेव गोपीचंद सपकाळे हे पत्नी चंद्रभागा सपकाळे, आई मंगलाबाई सपकाळे, दोन मुलं हितेश व रितेश आणि एका मुलीसह वास्तव्याला होते. नांद्रा गावात त्यांच्या मामीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या दशक्रियेचा शुक्रवारी कार्यक्रम असल्याने वासुदेव सपकाळे हे गुरुवारी दुपारी लाकडे घेण्यासाठी…
Author: editor desk
बोदवड : प्रतिनिधी शहरातील शिवद्वारजवळील प्रकाश प्रल्हाद कासार यांच्या दुमजली घर व भांड्याच्या दुकानाला गुरुवारी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. घर जुने असल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, आग आटोक्यात आणताना एक जण जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आगीमुळे सुमारे सहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे बंद घराला अचानक आग लागली. आगीने मोठे रौद्ररूप धारण केले. यात घरातील पितळी, तांब्याची भांडी, जुनी भांडी, सागवानी लाकूड, जुन्या नक्षीकार सागवानी लाकडाच्या बल्ल्या, दरवाजे, प्लास्टिकचे भांडे वस्तू जळून खाक झाले. दिवाळीत उरलेले फटाके असल्याने त्यांचा मोठा आवाज झाला. यामुळे रहिवाशांनी घटनास्थळी धाव…
चाळीसगाव : प्रतिनिधी भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र भगवान मोरे (६०) यांच्यावर बुधवारी पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाला होता. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच हल्लेखोरांनी वापरलेली कारही सायगव्हाण शिवारात आढळून आली आहे. दरम्यान, नाशिक येथे हलविण्यात आलेल्या मोरे यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक महेंद्र मोरे हे बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशनजवळील सिंधी कॉलनीत असलेल्या त्यांच्या कार्यालयात बसले होते. त्याचवेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या पाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या. गोळीबार प्रकरणी अजय संजय बैसाणे (लक्ष्मी नगर, चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून संशयित उद्देश उर्फ गुड्डू शिंदे (३५), सॅम चव्हाण (३४), संतोष निकुंभ उर्फ संता…
जळगाव : प्रतिनिधी जलजीवन मिशन योजना सामन्यांचे जीवन सुकर करणारी व जनतेला वरदान ठरणारीआहे. लहान मोठे पुलांचे काम करून रस्त्यांचे जाळे विणले आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या रस्त्यांना प्राधान्य दिले आहे. ८०% समाजकारण व २०% राजकारण या बाळासाहेबांच्या शिकवणी नुसार गोर- गरिबांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत असून हनुमंतखेडा येथे उर्वरित रस्त्यांवर पेव्हिग ब्लॉक बसवून १०० % पेव्हिंगचे गाव करणार असल्याची ग्वाही दिली. सिझनेबल पुढाऱ्यांना जनता थारा देत नसून जनता त्यांचा टांगा पलटी घोडे फरार कधी करेल सांगता येत नसल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हनुमंत खेडा येथे विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी केले. यावेळी…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडत आहे. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते “मंडलनामा” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर देखील मंचावर उपस्थित होते. यावेळी मंत्री भुजबळ यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. मंत्री भुजबळ म्हणाले कि, सगळे म्हणतात भुजबळ जाती जातीत भांडण लावतायेत. परंतु माझं एवढंच म्हणणे आहे माझं हिरावू नका हवं असेल तर नव्याने घ्या. असं विधान त्यांनी केले आहे. अवघ्या काही दिवसात सर्व्हे पूर्ण करण्यात आला त्यावरूनही त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. ओबीसी समाजाच्या मंडल आयोग…
उल्हासनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात खुनाच्या घटना नेहमीच घडत असतांना उल्हासनगर मध्ये आज गुरुवार पहाटे एका युवकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समाेर आली आहे. प्राथमिक माहितीनूसार डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारून युवकास मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्या डोक्यात कडप्पा लादी घालून त्याची हत्या करण्यात आली. राहुल महेंद्र जयस्वाल (वय 25) असे मृत युवकाचे नाव असल्याचे पाेलिसांनी सांगितले. ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन भागात असलेल्या इमलीपाडा परिसरात आज पहाटेच्या सुमारास घडली. राहुल जयस्वाल हा इमलीपाडा परिसरात आला हाेता. त्यावेळी काही तरुणांनी त्याला घेरले आणि त्याच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून त्याला मारहाण केली. तरुणांनी त्याच्या डोक्यात कडप्पा लादी घालून त्याची निर्घृण…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात शुल्लक कारणाच्या संशयावरून एका तरूणाला धारदार चाकूने वार करून दुखापत केली. तर घरातील साहित्य तोडून तरूणाच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे पोत तोडून नुकसान केल्याची घटना मुंगसे गावात मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या महितीनुसार, तालुक्यातील मुंगसे गावातील रहिवासी प्रदीप मच्छिंद्र कोळी (वय-३४) आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. प्रदीप कोळी हा गावात जागेबाबत अर्जफाटे करत असल्याच्या किरकोळ करणाच्या संशयावरून मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता गावात राहणारे भरत मोतीलाल कोळी, मोतीलाल आधार कोळी, चुनीलाल आधार कोळी, प्रवीण भाऊलाल कोळी, गोपाल प्रकाश…
नाशिक : वृत्तसंस्था मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता महाराष्ट्र दौऱ्यावर बाहेर पडले आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक या बालेकिल्ल्यात त्यांची तोफ धडाडणार आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव येथे ते भेट देणार आहेत. यावेळी मराठा समाजाकडून ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय जरांगे साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शनही घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत सरकराने काढलेल्या अध्यादेशाला देखील भुजबळ यांनी विरोध…
नांदेड : वृत्तसंस्था जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे बाळूमामाच्या मेंढ्या गावात आल्या असताना गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ६ फेब्रुवारी रोजी रात्री आरतीनंतर दहा वाजता एकादशीनिमित्त महाप्रसादात उपवासाच्या भगरीसोबत शेंगदाणे, आलूची कढी खाल्ल्यामुळे दोन ते अडीच हजार भाविकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. बाळूमामाच्या पालखीचा प्रसाद घेऊन घरी परतल्यावर रात्री एकच्या सुमारास अनेकांना चक्कर येणे, उलट्या, अंगात थरथर होणे सुरू झाले. सावरगाव, मस्की, माळाकोळी, हरणवाडी, रिसनगाव, हुलेवाडी, करेवाडी, आष्टुर, मुरंबी व परिसरातील गावातून भेटेल त्या वाहनाने अनेक रुग्ण उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे दाखल झाले. मात्र, रुग्णालयाची एवढ्या बेडची क्षमता नसल्यामुळे पोलिस तसेच स्थानिक प्रशासनाची धावपळ झाली. यातील काही…
धुळे : वृत्तसंस्था तालुक्यातील वडणे (बुरझड) गावात मंगळवारची रात्र एका कुटुंबासाठी काळरात्र ठरली. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घराचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत प्रवीण भगवान पाटील (वय ४५) व मुलगा गणेश (वय १३) या पिता-पुत्रांना प्राण गमवावे लागले. तर प्रेरणा पाटील (४१) यांच्यासह मुलगी भूमी (१७) व हेमांगी (१५) या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. धुळे तालुक्यातील वडणे येथील प्रवीण पाटील हे मंगळवारी कुटुंबीयांसोबत घरात झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास मातीचे छत कोसळले. त्यामुळे संपूर्ण पाटील परिवार मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबला गेला. छत पडल्याचा आवाज आल्याने, ग्रामस्थ मदतीला धावले, सर्वांना खासगी वाहनांनी धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी करणाऱ्या वैद्यकीय…

