Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघाताच्या घटना नियमित होत आहे. नुकतेच शेतात जाण्यासाठी दुचाकीस्वाराला हात देऊन दुचाकीवर जात असताना तोल जाऊन खाली पडल्याने अनिता आनंदा ब्राह्मणे (३५, रा. जळके, ता. जळगाव) जखमी झाल्या. उपचार सुरू असताना शनिवार, १० रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळके गावातील रहिवासी अनिता ब्राह्मणे या शेतात मजुरी काम करतात. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी त्या शेतात जात असताना एका दुचाकीस्वाराला त्यांनी हात देऊन शेतापर्यंत सोडून देण्याची विनंती केली. त्यानुसार दुचाकीस्वाराने त्यांना दुचाकीवर बसवून तो वराड गावाच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून तोल गेल्याने त्या दुचाकीवरून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जळगावात त्यांच्या उपस्थितीत युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी रविवारी जामनेरात बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती मिळाली आहे. १५ फेब्रुवारी रोजी अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून, जळगावसह अकोला व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. अमित शाह यांच्या उपस्थितीत जळगावात मोठे युवा संमेलन घेण्यात येणार आहे. या संमेलनातून ते जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधणार आहेत. अमित शाह यांचा दौरा, तसेच संमेलनाच्या नियोजनासाठी रविवारी जामनेरात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील दोनगाव येथील माजी ग्रां.पं.सदस्य श्री. वसंत सिताराम जळके यांच्या सौभाग्यवती स्व. सरलाबाई वसंत जळके (अंगणवाडी सेविका) दोनगांव बु. यांचं वयाच्या ५२ व्या वर्षी दीर्घ आजाराने दि.१० रोजी संध्या. ६.४५ वा.निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज ११ रविवारी सकाळी ११ वाजता दोनगाव बु. येथुन त्यांच्या राहत्या घरापासून निघेल. त्या श्री. सतीश वसंत जळके व श्री. निलेश वसंत जळके यांच्या आई होतं.त्यांच्या पश्यात पती, दोन मुलं, सुना, नातवंडं असा मोठा परिवार आहे. ताईच्या आत्मांस चिर शांती लाभो ही प्रभु परमेश्वर चरणी प्रार्थना

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत आहे. गेल्या दोन वर्षांसाठी हद्दपार असतानाही शहरात तलवार घेऊन फिरणाऱ्या विशाल मुरलीधर दाभाडे (रा. रामेश्वर कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या जवळ एक तलवार सापडली असून, ती जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाच, तर रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असलेल्या विशाल दाभाडे याला जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. तरीदेखील तो शहरात फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यावरून त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकों, गणेश शिरसाळे, पोलिस नाईक योगेश बारी, सुधीर सावळे, पोकॉ.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विजया केसरी प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘मंदिर आमची श्रद्धा… स्वच्छता आमचा ध्यास’ हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उद्योजक अविनाश पाटील-जाधव यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. विजया केसरी प्रतिष्ठानतर्फे सामाजिक क्षेत्रात विविध कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील विविध भागात हे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने, प्रसिद्ध वक्ते राहूल सोलापूरकर यांची व्याख्याने, आरोग्य शिबिर असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘मंदिर आमची श्रद्धा… स्वच्छता आमचा ध्यास… हे अभियान राबविण्यात येणार आहे.…

Read More

जालना : वृत्तसंस्था नाशिक दौऱ्यावर असताना माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला. तसेच अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आला, पण सुदैवाने आम्ही वाचलो, असा मोठा गौप्यस्फोट मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अंतरवाली सराटी येथे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाचे तातडीने कायद्यात रुपांतर करावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे शनिवारपासून (१० फेब्रुवारी) पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं. उपोषणाला बसण्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावं अन् सग्या-सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. जोपर्यंत राजपत्रित अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आपण…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातून अनेक परिसरातून लाखो रुपये किंमतीच्या महागड्या सायकली चोरणारा सराईत रेकॉर्डवरील चोरटा जयेश अशोक राजपूत (वय १९, रा. मयुर कॉलनी) याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या ७ सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मायादेवी नगरात राहणारे योगेश बडगुजर यांची स्कॉट कंपनीची स्पीड स्टार सायकल त्यांच्या घराच्या कंपाऊंटमधून २४ जानेवारी रोजी चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना ही सायकल पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनी येथील सराईत चोरटा जयेश राजपुत याच्याकडे असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस…

Read More

जालना : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले होते. त्यानंतर आजपासून १० फेब्रुवारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. यासाठी त्यांनी सरकारला ९ फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन दिली होती. मात्र, सरकारकडून अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मुंबईत मराठा आंदोलक धडकण्याआधीच राज्य सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले होते. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश निघाल्यानंतर जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, सरकारने जरांगे यांच्यासह मराठा समाजाची…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथे गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान महेंद्र मोरे यांनी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. सुरुवातीला महेंद्र मोरे यांना चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण ते उपचारांना साथ देत नव्हते. म्हणून त्यांना नाशिकच्या अशोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना प्राणज्योत मालवली. 7 फेब्रुवारीला महेंद्र मोरे हे आपल्या कार्यालयामध्ये बसलेले असताना त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात महेंद्र मोरे हे गंभीरित्या जखमी झाले होते. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी हा गोळीबार झाला होता. या प्रकरणात चाळीसगाव शहर पोलिसांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील शिरसोली रस्त्यावर असणाऱ्या रायसोनी इन्स्टिट्यूटच्या महाविद्यलयातील काही विद्यार्थिनींचे फोटो काढत असल्याच्या संशयावरून एका रिक्षाचालकाला तरुणांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी संतप्त तरुणांनी रिक्षाची तोडफोड करीत रिक्षा उलटवून दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसानी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती – नियंत्रणात आणली. रिक्षाचालकाला पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायसोनी इन्स्टिट्यूटची विविध महाविद्यालये शिरसोली रस्त्यावर आहे. या महाविद्यालयात शेकडो मुले मुली प्रवेशित आहेत. दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून मुले-मुलींसाठी महाविद्यालयाची बस – नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. बसअभावी विद्यार्थ्यांना रिक्षाचाच पर्याय आहे. याचाच एका तांबापुरा येथील रिक्षाचालकाने गैरफायदा घेत…

Read More