यावल : प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथे दंगल उसळली होती. डीवायएसपी व त्यांच्या पथकाला धक्काबुक्की करण्यात आली. यात दोन्ही गटांतील तब्बल ५० ते ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच ते सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावात ४८ तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव येथे बुधवारी रात्री मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर फलक विटंबनेच्या संशयावरून दोन गटात वाद झाला. यावर अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, फैजपूरच्या डीवायएसपी अन्नपर्णा सिंग. पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी जमावाला शांत केले. या प्रकरणात निष्पाप तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी एका गटातील महिला व पुरुषांनी पोलिस ठाण्यासमोर…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील गणेशपूर येथील जिल्हा बँक शाखेचे मॅनेजर व कर्मचाऱ्याला खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील १५ हजार रुपयांची रोकड दोन अज्ञातांनी हिसकावून नेली. ही घटना शुक्रवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास खडके पुलानजीक घडली. यावेळी मॅनेजर यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यात ते जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा बँक शाखेचे मॅनेजर किसन विश्वनाथ भवर व कर्मचारी महेश दत्तात्रय पाटील हे खडकी येथून मोटारसायकलने गणेशपूर शाखेवर जात होते. खडकीजवळील पुलाचे काम चालू असल्याने वळण रस्त्यावरील निर्जन ठिकाणी मोटारसायकलवर तोंडावर पट्टी बांधलेल्या दोन अज्ञात युवकांनी त्यांना खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखविला. त्यांच्याजवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. बँक मॅनेजर भवर हे बॅग…
जळगाव : प्रतिनिधी मूळजी जेठा महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन चैतन्य २०२४ चे आयोजन दिनांक ९ व १० फेब्रुवारी या दरम्यान करण्यात आलेले आहे. या स्नेहसंमेलनात विविध कला प्रकारांसाठी 22 समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. दि. ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान विविध वेशभूषा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दि. ६ रोजी पारंपरिक वेशभूषेसह महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी हे सावित्रीबाई फुले,महात्मा फुले, डॉ.आनंदीबाई जोशी, रमाबाई आंबेडकर, लोकमान्य टिळक, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, आदिवासी समाजातील वेशभूषेसह महाविद्यालयीन परिसरात समाज सुधारकांच्या वेशभूषेत उपस्थित होते. या तीनदिवसीय स्पर्धेत ३८० विद्यार्थी, ७८ शिक्षक व ४० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.…
वरणगाव : प्रतिनिधी शहरातील अक्सा नगर परिसरातील मोकळ्या जागेत लहान मुले खेळत असताना मागून येणाऱ्या चारचाकी गाडीने जोरदार धडक दिल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दि ८ रोजी सायकाळच्या सुमारास शहरातील अक्सा नगर परिसरातील रहिवाशी असलेला नुमान आशिक बेग ( १४ ) हा घराच्या शेजारीच असलेल्या मोकळ्या पटांगणावर त्याच्या मित्रा सोबत सायकल चालवत असतांना त्याच ठिकाणी चारचाकी मालवाहु (क्र एम एच ०४ इ एल ८३०२ )या गाडीचे दुरुस्तीचे काम सुरू होते. काम झाल्या नंतर गाडी चालवून पाहताना नुमानच्या सायकलीला चारचाकी गाडीने जोरदार धडक दिल्याने तो खाली कोसळल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला . त्याला…
चाळीसगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसापूर्वी चाळीसगाव शहरातील पोलिस शुभम आगोणे खून प्रकरणातील आतापर्यंत फरार असलेल्या, आरोपी सिद्धांत आनंदा कोळी यास चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी अटक केली आहे. संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून धुळे येथून आरोपीस अटक करून चाळीसगाव येथे आणण्यात आले आहे. या गुन्हेतील आता पर्यंत सौरभ आंनदा कोळी, वसंत बच्छाव, पृथ्वी कुमावत, चित्रा मोरे, जय मोरे, विष्णू नेवरे, अमोल सिताराम कोळी, राहुल नारायण कोळी या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या घटनेतील मुख्य आरोपी आनंदा उर्फ अण्णा कोळी अजूनही फरार आहे. या गुन्हेगारांचा एलसीबी जळगावसह चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे चार तुकड्या…
बोदवड : वृत्तसंस्था जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका दिवसेदिवस वाढत असतांना नुकतेच बोदवड तालूक्यात विवाहाची पत्रिका देऊन परतणार्या मामा-भाच्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने उडविल्यामुळे त्यांचा अंत झाल्याची करूण घटना तालुक्यात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साळशिंगी येथील शिवाजी रामदास काळबहिले ( वय ५०) हे आपला भाचा ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील ( वय ३५ ) याच्यासह विवाहाची पत्रिका वाटण्यासाठी गेले होते. जळगाव येथून परत येत असतांना बोदवड ते भुसावळच्या दरम्यान असणार्या करंजी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. काल रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात शिवाजी काळबहिले आणि ज्ञानेश्वर पाटील हे गंभीर जखमी झाले. परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असतांना गुन्हेगारी घटना सातत्याने प्रेमप्रकरण तसेच अनैतिक संबधातून खूनासारख्या घटना घडू लागल्या आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. प्रेयसीला भेटायला गेलेल्या एका तरुणाची आसाममधील गुवाहाटी शहरात हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोघांना अटक केली आहे. संदीप सुरेश कांबळे (वय ४४, रा. येरवडा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संदीप याचा मृतदेह गुवाहाटी शहरातील तारांकित हॉटेलमध्ये सोमवारी ५ फेब्रुवारी आढळून आला होता. याप्रकरणाचा तपास करताना गुवाहाटी पोलिसांनी तरुणीसह दोघांना अटक केली आहे. अंजली शॉ, विकासकुमार शॉ, अशी अटक करण्यात आलेल्या…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरानजीक असलेल्या कुसुंबा येथील रवींद्र नातू पवार (वय ३६) या तरुणावर चॉपरने वार करत लोखंडी रॉड आणि दगडांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पाच जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील गजानन पार्कमध्ये रवींद्र पवार हे वास्तव्यास आहे. त्यांचा चुलत भाऊ राजेश जगराम पवार याने गावातील काही जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही तक्रार रवींद्र यानेच द्यायला सांगितल्याच्या संशयावरून दि. ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता औद्योगिक वसाहत परिसरातील एका बेकरीजवळून तो जात असताना कुसुंबा येथील पाच जणांना…
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कजगाव येथून जवळच असलेल्या गोंडगाव येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घर व अंगणवाडी फोडून काही ऐवज लांबवला. लागोपाठ होत असलेल्या चोऱ्यांच्या घटनेमुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोंडगाव येथे चोरीचे सत्र सुरूच असून दोन डॉक्टरांची घरे व एका अंगणवाडीचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना ७ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास उघडकीस आली. गोंडगाव येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी डॉक्टर गल्लीतील दोन डॉक्टरांची घरे व अंगणवाडीचे कुलूप तोडून चोरी करुन पोबारा केला. यातील डॉ. जाधव हे देव दर्शनासाठी गेल्याने त्यांचे बंद घराचे कुलूप तोडत घरातील ऐवज लांबवला. मात्र, नेमकी काय व कितीची चोरी झाली आहे, याचा खुलासा झाला नाही. दरम्यान,…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील स्वातंत्र्य चौकात दोन गटात शाब्दिक वाद सुरु होते. त्यांचा वाद वाढतच असल्याने रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी गावठी कट्टे काढून दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. हा प्रकार तेथे कर्तव्य बजाविणाऱ्या वाहतुक पोलिसांच्या लक्षात येताच, त्यांनी चौघांना ताब्यात घेत जिल्हापेठ पोलिसात आणले. याठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील स्वातंत्र्य चौकातील एका हॉटेल समोर (एमएच १८ बीआर ९००९) क्रमांकाच्या कारमधून दोन जण आले. त्याठिकाणी (एमएच १९ ईसी ६७२८) क्रमांकाच्या दुचाकीवर बसलेल्यांमध्ये वाद झाला. त्यांच्यातील वाद वाढतच असल्याने दोन्ही गटातील गोल्या उर्फ लखन दिलीप मराठे, सोन्या उर्फ…

