Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक मंगळवारी रात्री दीड-दोनच्या सुमारास सर्व प्रवासी निद्राधीन असताना अचानक धावत्या बसच्या टावरला आग लागली. एका विद्यार्थ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे १९ प्रवाशांसह २२ जणांचे प्राण वाचल्याची घटना घडली. या तरुणाच्या लक्षात येताच त्याने चालकाला त्याची कल्पना दिली. बस थांबवण्यास भाग पाडले आणि बसमध्ये झोपलेल्या प्रवाशांना उठवून खाली उतरवले. तेवढ्यात आगीचा भडका उडाला आणि अवघी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या विद्यार्थ्यांचे नाव आर्यन भाटकर असे असून, त्याने समयसूचकता दाखवली नसती, तर काय झाले असते, याची कल्पनाही काळजाचे ठोके चुकवणारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही प्रवासी बस रत्नागिरी येथील हरिश्चंद्र चव्हाण यांच्या ‘औदुंबर छाया ट्रॅव्हल्स’ची असून, ती त्यांनी गौरव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अजित पवार यांच्या गटाला निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळाल्याचा निषेध करण्यासाठी शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे अजित पवार यांच्या मालकीचा असल्याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कार्यालयासमोरील प्रांगणात बुधवारी दुपारी १२ वाजता निषेध आंदोलन करण्यात…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी चारचाकीतून आलेल्या पाच जणांनी भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हनुमानवाडी परिसरात घडली. यामध्ये बाळासाहेब मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे चाळीसगावात खळबळ माजली असून ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे हे त्यांच्या रेल्वे स्थानकाजवळील हनुमानवाडीतील कार्यालयात नेहमीप्रमाणे बसले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चारचाकी वाहनाने पाच जण कार्यालयाच्या बाहेर आले. गाडीतून उतरताच ते श्री. मोरे यांच्या कार्यालयात शिरले आणि समोर बसलेल्या मोरे यांच्यावर…

Read More

प्रेमियुगुलाना नेहमी आकर्षण असलेले दिवस म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन वीक’ हा आठवडा गेल्या ७ फेब्रुवारी पासून रोज डे म्हणून साजरा होत असतो. या आठवड्याचा दुसरा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. नावाप्रमाणेच, या दिवशी जोडपे एकमेकांबद्दल त्यांच्या भावना किंवा प्रेम व्यक्त करतात. तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनवण्याचा हा एक खास प्रसंग आहे. प्रेम, आपुलकी आणि कौतुक व्यक्त करण्याची ही एक उत्तम संधी आहे. या विशेष दिवसाद्वारे, लोक त्यांच्या नात्यात पुढील पाऊल टाकण्यासाठी पुढे जातात. ज्या व्यक्तीला ते आपला जोडीदार बनवू इच्छितात त्यासमोर ते आपल्या भावना एका खास पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. असे काही लोकं आहेत जे बऱ्याच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी काथार (क) वाणी समाज सेवासंघ आयोजीत वाणी प्रिमियर लीग (पर्व-१) २०२४ क्रीकेट स्पर्धेचे आयोजन समाज अध्यक्ष श्री योगेश गोविंद वाणी, जीतेंद्र वाणी, गौरव वाणी, हितेश वाणी, दिपक दाळवाले यांच्या वतीने घेण्यात आल्या. या स्पर्धांच्या कालावधी २६ जाने ते २८ जानेवरी असून या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार श्री. राजुमामा भोळे यांनी स्पर्धेचे उदघाटन केले तसेच क्रिकेट स्पर्धेत पुरूष गटात यंगर्स क्रिकेट कलब या संघाने विजयपद मिळविले तर जय ११यां संघाने उपविजेतेपद मिळवले व पुरूष विजेता संघाला ११००० रू रोख पारितोषीक व ट्रॉफी तसेच उपविजेत्या संघाला ७०००/- रू रोख पारितोषीक व ट्रॉफी. त्याचप्रमाणे महिला विजेत्या संघाला ४०००/- रू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात योग स्थापन करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने बुधवार ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने आजपर्यंत महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदार तसेच जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांच्या हित संबंधाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यात योग स्थापन व्हावा यासाठीची प्रमुख मागणी आहे. गुजरात, हरियाणा व राजस्थान या राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात देखील योग आयोग स्थापन करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी २८ ऑक्टोबर २०२३ रोजी…

Read More

लातूर : वृत्तसंस्था लातूरमधील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी पोलिसांनी बोकडाचा बळी दिल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. पोलिसांनी मात्र सध्या सुरु असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. याबाबतची काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातल्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गेटवर बकऱ्याचा बळी देतानाच एक फोटो सध्या व्हायरल होतो आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढू नये म्हणून पोलिसांनीच ठाण्याच्या गेटवरच बकऱ्याचा बळी दिला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पोलीस अधिकारी मात्र ही बाब आम्हाला माहीतच नाही, असं सांगत आहेत. मात्र पोलीस खरं बोलत आहेत तर नेमका हा प्रकार कुणी आणि का केला असावा याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर करत मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह दिले आहे. याच निकालाच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाचे नेते, जितेंद्र आव्हाडांनी काही ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ‘जो नाही झाला काकांचा, तो काय होणार लोकांचा’ असे पोस्ट करत आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान दुसऱ्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भीड में रहकर भी तनहा कौन है, ये तो झुठे से झुठा भी बतादेगा सच्चा कौन हैं |…

Read More

पारोळा : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील विचखेडा गावाजवळ महामार्गाचे काम सुरू असताना डंपरने अचानक ब्रेक मारल्याने त्यावर बस धडकली. बसच्या मागे मॅटेडोर व तिच्यामागे बस अशा चार गाड्यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात २० जण जखमी झाले. ही घटना ५ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ५ रोजी दुपारी विचखेडे गावानजीक जळगाव- नवसारी बस (एमएच४०/एन९८३०) पुढे असलेल्या डंपर चालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागून धडकली. त्यानंतर मागून येणारी मॅटेडोर (एमएच१५/एफव्ही५९८३) ही बसवर धडकली. मागून येणारी ठाणे भिवंडी बस (एमएच२०/बीएल१५४०) ही मॅटेडोरवर धडकली. खमींना…

Read More

नंदुबार : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात छोट्या मोठ्या कारणाने गुन्हेगारी वाढू लागली असतांना नुकतेच नंदुरबार जिल्ह्यात देखील एक घटना घडली आहे. आपल्या प्रेयसीसोबत बोलत असल्याच्या संशयातून एकाने रिक्षा चालकावर चाकूने हल्ला करून जखमी केले. पोहरा (ता. अक्कलकुवा) शिवारात ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली होती. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितेश तुळशीदास तडवी (रा. पोहरा) असे हल्ला झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितेश हा रविवारी सायंकाळी रिक्षा घेऊन अक्कलकुवा येथून पोहरा गावाकडे जात असताना रोशन सौंदऱ्या वसावे (२८) व वेच्या दिलवर तडवी (२७, दोघे रा. पोहरा, ता. अक्कलकुवा) यांनी त्यास अडवले होते. यावेळी रोशन वसावे…

Read More