Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वावडदा येथील मारूती मंदीराच्या बांधकामाच्या ठिकाणाहून आणि जळगाव शहरातील पुरूषोत्तम नगर शिरसोली नाका या दोन ठिकाणावरून सेटींग प्लेटा व साहित्य चोरून नेणाऱ्या एकुण चार संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी शुक्रवारी २३ फेब्रुवारी रोजीसकाळी १० वाजता वावडदा येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरून नेलेले साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वावडदा गावातील मारुती मंदिर आणि शिवस्मारक परिसरात जवळ बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ ते २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान ३ हजार रुपये किमतीचा लोखंडी सेंटिंग प्लेटा चोरून नेले होते.…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील उमर्टी ते सत्रासेन रस्त्यावर २३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मध्य प्रदेशातून थेट पुणे येथे ३ गावठी कट्टे व ८ जिवंत काडतूस घेवून जातांना ३ संशयित आरोपींना रंगेहात पकडण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील उमर्टी येथून ३ गावटी कट्टे आणि काही जिवंत काडतूस घेवून सत्रासेन मार्गे चोपडा व्हाया पुणे येथे काही जण जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी बुधगाव फाट्याजवळ सापळा लावला. या वेळी राखाडी रंगाची ऑर्टिगा (एमएच १२, आरएफ – १४९६) अडवून झडती घेतली असता त्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात क्रिकेट खेळताना वाद होऊन वेदांत नरेश बागडे (वय १८) या तरुणाच्या डोक्यात लोखंडी सळई मारून दुखापत केली. या वेळी या तरुणाच्या चुलत भावालादेखील मारहाण करण्यात आली. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी सोनी नगरात घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोन जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनी नगरातील मैदानावर काही तरुण क्रिकेट खेळण्यावरून वाद उद्भवला व दोन जणांनी वेदांत बागडे याला मारहाण करत त्याच्या डोक्यात लोखंडी सळई मारली. त्यावेळी या तरुणाच्या चुलत भावालादेखील शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी वेदांतने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी प्लॉट खरेदी करून देण्याच्या बहाण्याने रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून १८ लाख रुपये घेऊन प्लॉटची खरेदी करून न दिल्याचा प्रकार शहरात घडला. या प्रकरणी सागर शिवदास वानखडे (६३, रा. इंद्रप्रस्थनगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून महेंद्र उर्फ विकी प्रकाश संसारे (साकरी फाटा, वरणगाव रोड, भुसावळ) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वानखडे यांनी फसवणुकीनंतर दिलेल्या तक्रारीनुसार माहिती अशी की, सव्र्व्हे क्रमांक १८८/१/१९०/२/अ मधील प्लॉट क्रमांक ७९ हा तक्रारदारांना विक्री करण्याच्या बहाण्याने विकी संसारे याने १८ लाख रुपये स्वीकारले. मात्र, प्लॉटची खरेदी करून दिली नाही. आरोपी महेंद्र संसारे याने मीच तुम्हाला ३० लाख रुपये दिले आहेत, असा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वाळू बांधकामासाठी लागणारी अत्यावश्यक गोष्ट असल्यामुळे त्यात अनेक गैरप्रकार घडत. दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले होते म्हणून राज्य सरकारने १६ फेफ्रुवारी २०२४ ला नवे धोरण जाहीर केले. त्याप्रमाणे आता वाळू ६०० रुपये प्रती ब्रास मिळणार आहे. आता जिल्हा प्रशासनाने घरकुलासाठी गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन करावे असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. तापी नदी पात्रातील नांदेड येथील शासकीय वाळू डेपोचे पालकमंत्री यांच्या हस्ते उदघाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे,उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा खानिकर्म अधिकारी रविंद्र उगले, प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड, तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार सातपुते,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दिनांक 22 रोजी निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब गटाला प्रलंबित असलेले तुतारी हे नवीन पक्ष चिन्ह म्हणून देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव व घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्या नंतर शरदचंद्रजी पवार साहेबाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव निवडणूक आयोगातर्फे देण्यात आले होते तसेच काल दिनांक 22 रोजी निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला देण्यात आले. दिनांक 23 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष कार्याललंय आकाशवाणी चौक येथे नवीन पक्ष मिळाल्या बद्दल तुतारी चे औक्षण करून व तुतारी वाजउण , पेढे वाटप करून व फटाके फोडून…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवसेदिवस वाढत असतांना नुकतेच पैठण शहरातील एका ३२ वर्षीय तरूणाचा तोंडावर आणि डोक्यावर लोखंडी फावड्याने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कृष्णा एकनाथ डोळस असे मृत तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरातील लक्ष्मीनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या कृष्णा डोळस याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन घरी येत असल्याने त्याचे आणि कुटुंबातील सदस्यांचे सतत भांडण व्हायचे. त्यामुळे लक्ष्मीनगर येथे तो एकटाच राहत होता. त्याला त्याचे वडील जेवणाचा डबा रोज पोहचवून देत होते. दरम्यान मंगळवारी दुपारी चार वाजता वडिलांनी त्याला डबा दिला. यानंतर ते निघून गेले…

Read More

लखनौ : वृत्तसंस्था येथील आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी एका मौलवीला अटक केली असून त्याच्या भावाचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपायुक्त (पश्चिम) विश्वजीत श्रीवास्तव यांनी सांगितले की, एका व्यक्तीने मलिहाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, ज्यात त्याच्या आठ वर्षांच्या मुलीवर मदरशात शिकवणाऱ्या दोघांनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. दोन आरोपींची ओळख मोहम्मद अबेदिन आणि त्याचा भाऊ मोहम्मद अर्शद अशी आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध ‘३७६ ड’ (सामूहिक बलात्कार) आणि पोक्सो कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला, पोलिसांनी बुधवारी अबेदिन आणि पीडितेच्या आईला अटक केली. आमचे पथक दुसरा फरारी आरोपी अर्शदला अटक करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी हे चिन्ह पक्षाला बहाल केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरा पक्ष कुणाचा हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता. त्यावर निवडणूक आयोगाने पक्षाचे मूळ नाव ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षाचे मूळ चिन्ह अजित पवार गटाला दिले होते. तर राज्यसभा निवडणुकीपूर्वी ‘राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष’ हे नाव शरद पवार गटाला दिले होते. त्यानंतर निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला दिले आहे. हे चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे दि.२३ रोजी शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे. मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते होते. शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी जोशी होते. विधानपरिषदेचे आमदार, मुंबईचे महापौर, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले वहिले मुख्यमंत्री म्हणून अनेक पदे मनोहर जोशी भूषवली होती. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती खराब असल्याने…

Read More