सांगली : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून खुनाच्या घटना घडत असतांना नुकतेच सांगली जिल्ह्यात देखील अशीच एक थरारक घटना घडली आहे. मित्राचे प्रेयसीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून चक्क मित्राचाच खून करण्याचा प्रकार कडेगाव तालुक्यातील वांगी या ठिकाणी घडला. या प्रकरणी संशयिताला पोलीसांनी अटक केली आहे. नामदेव प्रल्हाद शिंगे (वय ३० रा. बेघर वसाहत, नरसिंहपूर ता. वाळवा) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत नामदेव शिंगे आणि संशयित अक्षय विष्णु शिंदे यांची मैत्री असून अक्षय याला नामदेवचे प्रेयसीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यातून बुधवारी रात्री वांगी येथे राहत असलेल्या खोलीत कोयत्याने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला.