अयोध्या : वृत्तसंस्था
देशातील अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा निश्चित वेळेवर झाली असून यावेळी दिग्गज उद्योगपती, बॉलिवूड आणि दक्षिणेतील अनेक सेलिब्रिटी आणि संत उपस्थित होते. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, मुकेश अंबानी आणि पत्नी नीता, अनिल अंबानी आणि दाक्षिणात्य कलाकार चिरंजीवी-रामचरण यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. बाबा रामदेव हे बागेश्वर धामचे कथाकार पं.धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत दिसले.
कतरिना कैफ, विकी कौशल, आलिया, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित हे देखील अयोध्येत आले आहेत. अनुपम खेर यांनी सोमवारी सकाळी हनुमानगढीला भेट दिली. म्हणाले, “प्रभू रामाकडे जाण्यापूर्वी हनुमानजींचे दर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.” विवेक ओबेरॉय म्हणाले, “मी पहिल्यांदाच अयोध्येत आलो आहे आणि इथे मला प्रत्येक श्वासात श्रीरामाची भक्ती जाणवते. रामलल्ला 500 वर्षांनंतर अयोध्येत परतल्याने लोकांमध्ये उत्साह आहे.
सुपरस्टार रजनीकांत, गुरिंदर सिंग ढिल्लन बाबा जी, अभिनेता पवन कल्याण, भारत फोर्ज ग्रुपचे चेअरमन बाबा कल्याणी, कांची शंकराचार्य, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल चार्टर प्लेनने लखनऊला आले. मग येथून रस्त्याने अयोध्येला पोहोचले. याशिवाय अभिनेता विवेक ओबेरॉय, गायक अनु मलिक, शंकर महादेवन, स्मृती इराणी, स्वामी अवधेशानंद, अनिल कुंबळे, गजेंद्र चौहान शाम, अभिनेता रणदीप हुड्डा, सुरक्षित संजीव कपूर आणि अभिनेता गजेंद्र चौहान हे देखील लखनऊला आले आहेत. सकाळी हे लोक रस्त्याने अयोध्येला जातील.