Author: editor desk

अमळनेर : प्रतिनिधी  कॉपी पुरवण्यास नकार दिल्याने दोघांनी एका होमगार्डला लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केल्याची घटना १४ रोजी रात्री ८.३० वाजता भारत गॅस गोदामाजवळ घडली होती. या प्रकरणी उशिरा ८. गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  डी. डी. नगरमधील भूषण पाटील याचा भाऊ पीयूष पाटील याची एन. टी. मुंदडा माध्यमिक विद्यालयात परीक्षा सुरू होती. त्याला कॉपी पुरवण्यासाठी भूषण याला शाळेत जायला मदत कर, असे अनिकेत राजेंद्र पाटील (रा डीडी नगर) याने होमगार्ड राकेश पुरुषोत्तम चौधरी यांना सांगितले. मात्र, होमगार्ड चौधरी यांनी नकार दिल्याने अनिकेतने त्यांना शिवीगाळ करत खाली पाडले. तसेच भूषणने पकडून ठेवले. अनिकेतने लाथाबुक्क्यांनी होमगार्ड चौधरी यांना मारहाण करून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  मतदार यादी दुरुस्तीविषयी दिलेले काम करण्याबाबत दिरंगाई केल्याने सात बीएलओंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विषयी वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने महाराष्ट्रात लवकरच मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून सन २०२४च्या मतदार यादीतील मतदार शोधून बीएलओ अॅपमध्ये मॅपिंग करणे, अस्पष्ट फोटो दुरुस्ती करणे, एकसारख्या नोंदी शोधणे (डीसीई) असे काम सुरू आहे. यासाठी जळगाव शहरात ३५८ बीएलओंची नेमणूक करण्यात आली. यापैकी सात बीएलओंनी नोटीस देऊनही काम सुरू…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी गुढीपाडव्याच्या उत्साहात रंगलेल्या गोजोरा गावात श्री मरी मातेच्या यात्रेदरम्यान पारंपरिक ‘बारा गाड्या’ सोहळ्यात दुर्दैवी अपघात घडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. उत्सवी वातावरणात घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ गुरुवार रोजी सायंकाळच्या सुमारास चोरवड-गोजोरा मार्गावर यात्रेनिमित्त ‘बारा – गाड्या’ या पारंपरिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला गोजोरा तसेच परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात सोहळा सुरू असताना अचानक ही दुर्दैवी घटना घडली. अशोक बाबुराव कोळी (वय ५७, रा. गोजोरा) हे सोहळा पाहत असताना गर्दीतून पुढे आले असावेत, अशी प्राथमिक…

Read More

आजचे राशिभविष्य दि. २१ मार्च २०२६ मेष राशी आज तुम्ही जे काही काम सुरू कराल ते वेळेवर पूर्ण होईल. नवीन योजना आखण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुमच्या मेहनतीला आणि प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. राजकारणात असलेल्यांना मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारेल. देवी ब्रह्मचारिणीला मिठाई अर्पण करा; तुमचे आरोग्य चांगले राहील. वृषभ राशी आज व्यावसायिक घडामोडींमध्ये सुधारणा होईल. नवीन कंत्राट मिळण्याचीही शक्यता आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तात्काळ कृती करा. आपल्या कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने तुम्हाला बरे वाटेल. मिथुन राशी तुम्ही प्रामाणिक लोकांशी संवाद वाढवण्याची गरज आहे. आज, तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमच्या आणि…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चोपडा शहर पोलिसांनी आंतरजिल्हा गुन्हेगार टोळीचा मोठा डाव उधळून लावत मध्यरात्री थरारक कारवाईत पाच जणांना अटक केली आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी दोन संशयितांना पसार होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र अंधाराचा फायदा घेत ते फरार झाले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहर पोलीस नियमित गस्तीवर असताना संशयास्पद हालचाली आढळून आल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास एका कारमध्ये पाच जण बसलेले दिसले, तर दोन जण बाहेर उभे राहून चर्चा करत होते. पोलिसांची चाहूल लागताच बाहेरील दोघे पळून गेले; मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी भरदिवसा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपुड फेकून त्यांच्याजवळील ५ लाख २७ हजारांची बॅग लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार मनोज खुशाल उर्फ अशोक मोकळ (वय २६, रा. दंडेवाला नगर, मोहाडी, ता. धुळे) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्या अन्य दोघ साथीदारांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. अमळनेर येथील लामा जिनिंगचे मालक यतीन विनोद कोठारी (वय ४८) हे दि. २५ फेब्रुवारी रोजी दुचाकीने जिनिंगमध्ये जात होते. पिंपळे रोडवर मोटारसायलवरुन आलेल्या तिघांनी त्यांना अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकली, आणि त्याच्याजवळ असलेली ५ लाख २७हजार रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून ते पसार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील हरिपुरा येथूनजवळच सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हरिपुरा धरणाच्याजवळ ३८ वर्षीय तरुणाचा मृतदेह पोलिसांना मिळून आला आहे. त्याचा मृतदेह तेथून यावल ग्रामीण आणण्यात आला. अनोळखी तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हरिपुरा ता. यावल येथून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी हरिपूरा धरण आहे. या धरणाच्या एका कोरड्या क्षेत्रात एक सुमारे ३८ वर्षीय वयोगटातील तरुणाचा मृतदेह हा बुधवारी मिळून आला. याची माहिती हरिपुरा पोलीस पाटील ज्योत्ना तडवी यांनी यावल पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले. पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकातील मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की व मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चार संशयितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  गिरड मंडळाचे अधिकारी दिनेश लक्ष्मणराव येडे आणि त्यांचे पथक पिंपरखेड गावाजवळ अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालत होते. या वेळी त्यांना वाळूने भरलेले एक निळ्या रंगाचे स्वराज ट्रॅक्टर (एमएच- २०, जीक्यू- १६८०) दिसले. पथकाने ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने ते वेगाने पळवून नेले. काही अंतरावर ट्रॅक्टर अडवल्यावर त्यात सुमारे सव्वा ब्रास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अनैतिक संबंधाच्या संशयावरुन दिपाली नितीन सोनवणे (वय ३०, रा. निमखेडी, ता. जळगाव) या विवाहितेचा तीच्या पतीने विळ्याने वार करीत निघुण खून केला. त्यानंतर संशयित नितीन विजय सोनवणे (वय ३८) हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होवून त्याने पोलिसांना आपण खून केल्याची माहिती दिली. ही घटना शुक्रवार दि. २० रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास निमखेडी गावात घडली. ऐन गुढीपाडवा सणाच्या दिवशी खून झाल्यामुळे गावात एकच खळबळ माजून केली असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार,   शहरालगत असलेल्या निमखेडी शिवारात दिपाली सोनवणे ही विवाहिता पती, तीन मले व सासूसह वास्तव्यास होती. तीचा पती हा हातमजूरी…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२० मार्च २०२६ मेष राशी दीर्घकाळ सुरू असलेल्या समस्येतून तुम्हाला दिलासा मिळेल. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात काही वेळ घालवल्याने तुमची सकारात्मकता वाढेल. वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. देवी दुर्गेला लवंगा अर्पण करा, सर्व काही ठीक होईल. वृषभ राशी आज, तुम्ही पूर्वी पूर्ण केलेल्या छोट्या कामांचे सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसतील. तुम्हाला जीवनातील वास्तवाची जाणीव होईल. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही तुमचे मनोधैर्य टिकवून ठेवाल. जर तुम्ही तुमचा मुद्दा शांतपणे आणि संयमाने मांडण्याचा प्रयत्न केला, तर सर्व काही ठीक होईल. देवी दुर्गेची आरती करा, आणि तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. मिथुन राशी आजचा दिवस कौटुंबिक देखभाल आणि सुधारणेच्या कामांमध्ये जाईल. घरातील…

Read More