Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बांधकाम कामगार भांडी योजना लाभासाठी शंभर रुपयांची लाच!
    क्राईम

    बांधकाम कामगार भांडी योजना लाभासाठी शंभर रुपयांची लाच!

    editor deskBy editor deskApril 16, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी शासनातर्फे मोफत भांडी योजना राबवण्यात येत असून या योजनेचा लाभ देण्यासाठी शंभर रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील महिलेला जळगाव एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. सलग दोन दिवसात झालेल्या एसीबीच्या कारवाईने जिल्ह्यातील लाचखोर हादरले आहेत. आसमा इरफान शेख (शिवाजी नगर, जळगाव, चिंचोली, ता. जळगाव) असे अटकेतील महिलेचे नाव आहे.

    असे आहे लाच प्रकरण महाराष्ट्र शासनाचा कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या शासनाच्या योजनेतंर्गत गृह उपयोगी संच वाटप केले जातात व त्यासाठी काही कंत्राटी एजन्सी नेमण्यात आल्या आहेत. चिंचोली येथेदेखील देण्यात आलेल्या एजन्सीत कार्यरत खाजगी इसम आसमा परवीन शेख इरफान यांनी शंभर रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे बुधवारी दिल्यानंतर सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, महिलेकडे तब्बल 41 हजार 250 रुपयांची रोकड आढळल्याने ती जप्त करण्यात आली आहे. संबंधित एजन्सी चालकाची आता चौकशी होणार असून त्यांच्यादेखील अडचणी वाढल्या आहेत.

    बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटीत कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ विविध कल्याणकारी योजना राबवत असते. यामध्ये त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि मूलभूत गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या जातात. अशाच योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगार भांडी योजना आहे. या योजनेंतर्गत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत कामगारांना त्यांच्या दैनंदिन उपयोगासाठी आवश्यक असलेल्या स्वयंपाकाच्या भांड्यांचा संच मोफत दिला जातो. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व सहकाऱ्यांनी हा सापळा यशस्वी केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नाशिक धर्मांतर-छळ प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; ‘निदा खान’च मुख्य सूत्रधार !

    April 16, 2026

    शेतात विजेचा धक्का बसून १६ वर्षीय सुपियानचा मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा

    April 16, 2026

    एटीएम चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जळगावात जेरबंद !

    April 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.