छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक भागांत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका शेती पिकांना बसत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. विशेषतः फळबाग उत्पादक शेतकरी द्राक्ष, आंबा, काजू आणि केळी यांसारख्या नगदी पिकांच्या अतोनात नुकसानीची भीती व्यक्त करत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव शहरात दुपारी अचानक ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आला. या गारपिटीमुळे शहरात घरांच्या छतावर आणि रस्त्यांवर पांढराशुभ्र थर साचला, तर नागरिकांमध्ये मोठी धावपळ उडाली. मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आलेल्या या अचानक गारपिटीमुळे वातावरण तात्पुरते गार झाले असले तरी शेती आणि फळबागांना होणाऱ्या संभाव्य नुकसानीची भीती अधिक वाढली आहे.…
Author: editor desk
नागपूर : वृत्तसंस्था “महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून राज्याला पुढे नेणे, हाच आपल्या नव्या वर्षाचा संकल्प आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने केले. गुढीपाडवा निमित्त नागपुरात आयोजित भव्य शोभायात्रेत सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. आधुनिकतेसोबतच प्राचीन परंपरा, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा हा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नरेंद्र मोदी यांनीही ‘विकास आणि विरासत’ या संकल्पनेवर भर दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजीनामा प्रकरणामुळे नाराज असल्याचे म्हटले जात असलेले आमदार संदीप जोशी यांची नाराजी दूर झाल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. संदीप जोशी आणि मित्रपरिवारातर्फे दरवर्षी या शोभायात्रेचे आयोजन केले जाते आणि आपण दरवर्षी…
पुणे : वृत्तसंस्था बारामतीसह राज्यातील दोन विधानसभेच्या पोटनिवडणुकांबाबत महाविकास आघाडीत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत, शरद पवार गटाने निवडणूक लढवली नाही तर संबंधित जागांवर काँग्रेस उमेदवार देण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, बारामती पोटनिवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या न लढण्याच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत नाही. या संदर्भात महाविकास आघाडीत अद्याप अधिकृत चर्चा झालेली नसून, परस्पर चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, बारामतीतील काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार न दिल्यास काँग्रेस स्वतःचा उमेदवार उभा करेल, असा…
मुंबई : वृत्तसंस्था मराठी नववर्षाचा पहिला दिवस असलेला गुढीपाडवा सण आज राज्यभर मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला. मुंबई, ठाणे, नागपूरसह अनेक शहरांमध्ये भव्य शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले असून ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या पताकांनी सजलेल्या वातावरणात संपूर्ण महाराष्ट्र रंगून गेला. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. नववर्षाच्या स्वागतासाठी घराघरांत गुढी उभारण्यात आल्या असून नव्या संकल्पांसह वर्षाची सुरुवात करण्यात आली. नागपूर येथे आयोजित भव्य शोभायात्रेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी सामूहिक रामरक्षा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडवा हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा सण असल्याचे सांगत त्यांनी नव्या वर्षात सकारात्मक संकल्प घेऊन पुढे जाण्याचे आवाहन केले.…
नाशिक : वृत्तसंस्था नाशिक शहरात तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावरणारा कॅप्टन अशोक खरात याला गंभीर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राचा आधार घेत महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे कारवाई करत त्याला ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला २३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये कॅनडा कॉर्नर परिसरात एका ३५ वर्षीय विवाहित महिलेची आरोपीशी ओळख झाली होती. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत त्याने मंत्रतंत्र आणि धार्मिक विधींच्या माध्यमातून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर…
धरणगाव : प्रतिनिधी बोगस फळबाग दाखवून ६ कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी धरणगाव तालुक्यातील ५ सीएससी सेंटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार अंतर्गत योजनेची अंमलबजावणी भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत करण्यात येत होती. धरणगाव तालुक्यात आंबिया बहार सन २०२५ २६मध्ये केळी पिकांसाठी प्राधान्याने फळपीक विम्यासाठी शेतकऱ्यांमार्फत सहभाग नोंदवण्यात आला होता. यासाठी पिक विमा पोर्टलद्वारे अर्जदार ऑनलाइन सीएससी सेंटर, बँक किंवा स्वतः संबंधित कंपनी विमा कंपनीकडे अर्ज सादर केला होता. या फळपीक विमा योजनेत प्रति हेक्टरी विम्याचा शेतकरी ८ हजार ५०० रुपये, राज्याचा २८ हजार ५०…
यावल : प्रतिनिधी चिंचोली बसस्थानकाजवळ १८ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकींवरील बालकासह ५ जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना तातडीने जळगाव येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली येथील प्रमोद प्रकाश साळुंखे हे आपली पत्नी जयमाला साळुंखे व मुलगा प्रिन्स साळुंखे (वय २ वर्षे) यांच्यासह आपल्या दुचाकीवरून चिंचोली पेट्रोल पंपाकडून चिंचोली गावात जात होते. तर चोपडा शहराकडून किनगावकडे चोपडा तालुक्यातील पारगाव येथील भावेश गणेश पाटील व कपिल विकास कोळी हे पल्सर गाडी (एमएच १९, बीव्ही- ९५५५) ने जात होते. चिंचोली बसस्थानकाजवळ या दोन्ही दुचाकी एकमेकांवर समारासमोर धडकल्या. या…
जळगाव : प्रतिनिधी दीड वर्षांपुर्वीच वापी येथे अग्रिशमन विभागात नोकरीस लागलेल्या प्रफुल्ल सुनिल पाटील (वय २२, मूळ रा. भोकर, ता. जळगाव) या तरुणाला भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला, ही घटना मंगळवार दि. १७मार्च रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास चापी येथे घडली. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भोकर येथे राहणारा प्रफुल्ल पाटील हा वापी येथील अग्निशमन दलात आपली सेवा बजावत होता. मंगळवारी रात्री आपली ड्युटी संपवून तो खोलीवर परतला होता. जेवण झाल्यानंतर तो काही वेळासाठी शत्तपावली करण्यासाठी बाहेर पडला. याच दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. या अपघातात प्रफुल्लचा…
आजचे राशिभविष्य दि.१९ मार्च २०२६ मेष राशी आज, तुमच्यासाठी कुटुंबियांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. विद्यार्थी आज काहीतरी नवीन करून पाहतील आणि तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करण्याची गरज आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या व्यक्तींसोबत एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याची संधी मिळेल आणि तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा. संध्याकाळी, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जेवणासाठी एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाल. वृषभ राशी आज तुमचे विरोधकसुद्धा तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुम्ही सर्व काही तुमच्या बुद्धिमत्तेने हाताळाल. काम करणाऱ्यांना सहकाऱ्यांकडून मदत मिळेल, ज्यामुळे त्यांचे काम लवकर पूर्ण होईल. आज तुम्हाला व्यवसायानिमित्त राज्याबाहेर प्रवास करावा लागू शकतो. या राशीत जन्मलेले विद्यार्थी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुलींची शाळेतील उपस्थिती वाढविणे आणि ड्रॉपआऊटचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली. मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी सर्वांगीण उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी मांडली होती. यावर झालेल्या चर्चेत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, किशोर दराडे, अभिजीत वंजारी आणि इद्रिस नाईकवाडी यांनी सहभाग घेतला. मंत्री भुसे म्हणाले की, प्राथमिक शाळांमधील मुलींची उपस्थिती वाढविण्यासाठी आणि गळती रोखण्यासाठी १९९२ पासून ‘उपस्थिती भत्ता’ योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते चौथीतील आदिवासी व अनुसूचित जाती-जमातीतील दारिद्र्यरेषेखालील मुलींना ७५…

