जळगाव : प्रतिनिधी मंत्र्यांसह पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध बुधवारी सायंकाळी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी दुपारी सावदा पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर खडसे यांनी त्यांना बोलावून घेतले. यावेळी त्यांनी तासखेडा (ता. रावेर) येथील गौण खनिज प्रकरणात गुन्हा का दाखल केला नाही, असा जाब विचारत मोठ्या आवाजात आरडाओरडा केला. तसेच तुम्ही कोट्यवधी रुपये खाल्ले आहेत, असे म्हणत अपमानास्पद शब्द वापरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांनी याबाबत २९ जानेवारी २०२६ रोजी पाटबंधारे विभागाचे अधिकारी भातेश चौधरी…
Author: editor desk
आजचे राशिभविष्य दि.१२ फेब्रुवारी २०२६ मेष राशी जर तुम्ही सध्या मालमत्ता विकण्याच्या किंवा खरेदी करण्याच्या प्रक्रियेत असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकटी मिळेल. कुठेही प्रवास करण्यापूर्वी आवश्यक वस्तू पॅक करायला विसरू नका. आता तुमच्या कामाच्या शैलीत बदल करणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्यांकडे बारकाईने लक्ष द्या. कुटुंबातील सदस्यांचा परस्पर पाठिंबा घरातील वातावरण आनंददायी आणि सुसंवादी ठेवेल. वृषभ राशी आज, तुमचा समजूतदारपणा आणि शहाणपणा तुम्हाला समस्या सहजपणे सोडवण्यास मदत करेल. ऑनलाइन शॉपिंग आणि मजेदार क्रियाकलापांमध्ये वेळ घालवला जाईल. तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून आमंत्रण मिळेल. इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे तुमचे स्वतःचे महत्त्वाचे काम अपूर्ण राहू शकते.…
जिल्हा विकास आराखड्याचे जिल्हाधिकारी यांनी केले प्रभावी सादरीकरण; वाढीव निधीस सकारात्मक प्रतिसाद जळगाव : प्रतिनिधी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यासाठी डीपीडीसी अंतर्गत किमान 300 कोटी रुपयांचा वाढीव निधी देण्याची ठाम मागणी केली. या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्हा मागील चार वर्षांपासून डीपीडीसी खर्चात राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे नमूद करत, मुख्यमंत्री 150 दिवस सुधारणा कार्यक्रम व 100 दिवसांच्या मूल्यमापनातही…
बारामती : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी नवा वाद निर्माण झाला असून, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या वडिलांनी ही घटना अपघात नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अपघाताच्या दिवशी विमानाचा पायलटच नव्हे तर विमानही ऐनवेळी बदलण्यात आल्याचा दावा शिवकुमार माळी यांनी केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. गत 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण अपघातात अजित पवार, पिंकी माळी यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विविध तर्कवितर्कांना उधाण आले असतानाच शिवकुमार माळी यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना संशय व्यक्त केला. ते म्हणाले, “अपघाताच्या दिवशी फक्त वैमानिकच नव्हे तर विमानही बदलण्यात…
मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता श्रेयस तळपदे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. १० फेब्रुवारी रोजी मैनपुरीच्या भोगांव पोलीस ठाण्यात तळपदे आणि इतर ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकार्यांच्या माहितीनुसार, भोगांवच्या मिश्राणा मोहल्ल्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने अभिनेता आणि त्याच्या साथीदारांवर गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्याने आपल्या साथीदारांसह शहरातील मिश्राना परिसरातील मुंबई बँकेच्या शाखेत गुंतवणुकीच्या माध्यमातून गावकऱ्यांना फसवले असल्याचा तपशील पोलिसांकडे आला आहे. या १२ व्यक्तींमध्ये समीर अग्रवाल, सानिया अग्रवाल, आरके सेट्टी, फंड मॅनेजर संजय मुदगिल, शबाब हुसेन, श्रेयस तळपदे, नरेंद्र नेगी, पंकज अग्रवाल, सुप्रिया, अनुज…
चंद्रपूर: वृत्तसंस्था चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गटाने स्थानिक पातळीवर भाजपला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. सातत्याने कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत न जाण्याची भूमिका मांडणाऱ्या ठाकरे गटाने घेतलेली ही भूमिका काँग्रेसच्या टीकेचे कारण ठरली. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. “चंद्रपूर महानगरपालिकेत 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता मिळवता आली नाही, याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे,” असे ते म्हणाले. राऊत यांनी स्पष्ट केले की काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद, विशेषतः प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील संघर्ष, ही सत्ता गमावण्याची मुख्य कारणे आहेत. त्यांनी सांगितले, ज्यांनी पाठिंबा द्यायचा होता, त्यांनाही वेगळा निर्णय घ्यावा लागला, त्यामुळे शिवसेनेला दोष देण्याची…
बारामती : वृत्तसंस्था राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक आणि संग्रहालय कुठे उभारायचे यावर पवार कुटुंबात मतभिन्नता समोर आली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात स्मारक उभारण्याची चर्चा सुरू होती. या संदर्भात शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक झाली होती. प्राथमिक चर्चेत स्मारकाची रूपरेषा, ठिकाण आणि स्वरूप ठरले असले तरी, आता कुटुंबात मतभिन्नता स्पष्ट झाली आहे. जय पवार यांचा आग्रह आहे की, अजित पवारांचे संग्रहालय पुणे शहरात असावे, तर स्मारक बारामतीत उभारावे. त्यांचा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने ‘वंदे मातरम’ संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, सरकारी कार्यक्रमांमध्ये ते वाजवताना उपस्थितांनी सन्मानार्थ उभे राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. गृह मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. मंत्रालयाच्या निर्देशानुसार, ‘वंदे मातरम’ कोणत्याही सरकारी कार्यक्रमात, सरकारी शाळांच्या उपक्रमांमध्ये तसेच इतर औपचारिक समारंभांमध्ये सादर केल्यास सर्वांनी उभे राहणे आवश्यक राहील. माध्यमांच्या अहवालानुसार, सुमारे ३ मिनिटे १० सेकंदांची सहा कडव्यांची आवृत्ती राष्ट्रगान ‘जन गण मन’पूर्वी वाजवली जाईल. नवीन नियमांनुसार, तिरंगा फडकवताना, राष्ट्रपतींच्या आगमनापूर्वी व नंतर, त्यांच्या राष्ट्राला उद्देशून असलेल्या भाषणांपूर्वी व नंतर, तसेच राज्यपालांच्या अधिकृत कार्यक्रमांदरम्यान ‘वंदे मातरम’ वाजवले जाईल. पद्म पुरस्कारांसारख्या नागरी सन्मान समारंभांमध्ये किंवा…
जळगाव : प्रतिनिधी पैसे न दिल्याचा राग आल्याने तरुण आईला शिवीगाळ करीत होता. त्याला समजवित असतांना त्याने हातातील लोखंडी पाईप भाऊ मयुर चंद्रकांत गुरव (वय २१, रा. पंढरपूरनगर) यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. २ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पंढरपूर नगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पंढरपूर नगरात मयुर गुरख हा तरुण वास्तव्यास आहे. दि. २ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तो घरी आला आणि आईकडे पैसे मागू लागला. आईने त्याला माझ्याजवळ पैसे नाही असे सांगितले असता, त्याला राग आल्याने त्याने आईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्याचे…
जळगाव : प्रतिनिधी पैसे न दिल्याचा राग आल्याने तरुण आईला शिवीगाळ करीत होता. त्याला समजवित असतांना त्याने हातातील लोखंडी पाईप भाऊ मयुर चंद्रकांत गुरव (वय २१, रा. पंढरपूरनगर) यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. २ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पंढरपूर नगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पंढरपूर नगरात मयुर गुरख हा तरुण वास्तव्यास आहे. दि. २ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तो घरी आला आणि आईकडे पैसे मागू लागला. आईने त्याला माझ्याजवळ पैसे नाही असे सांगितले असता, त्याला राग आल्याने त्याने आईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्याचे…

