नाशिक : वृत्तसंस्था नाशिकमध्ये ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याच्या आरोपाखाली स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी खरातच्या ताब्यातून एक पेनड्राइव्ह जप्त केला असून, त्यात ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अंधारे यांनी आरोप केला की, खरात याच्यावर आधीही लैंगिक शोषणाचे आरोप आल्यावर चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता. सुषमा अंधारे यांनी म्हटले: “आता आम्हाला शंका नव्हे, भीती आहे. पुन्हा एकदा…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात चर्चा व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु, अद्याप या मुद्यावर विधानसभेत चर्चा करण्यास परवानगी मिळालेली नाही, अशी माहिती रोहित पवारांनी दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ११ वेळा राज्याचे बजेट मांडलेले अजितदादा अकाली मृत्यू पावले तरी या गंभीर प्रकरणावर साधी चर्चाही विधिमंडळात होत नसल्याचे दुर्दैवी आहे. त्यामुळे त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत अजित पवारांच्या विमान अपघाताचा विषय चर्चेला घेण्याची विनंती केली असून निवेदनही दिले आहे. रोहित पवारांच्या मते, अजितदादांचे योगदान आणि त्यांच्या…
जळगावः प्रतिनिधी तालुक्यातील आसोदा येथे एका मजुराला ‘खुन्नस’ का दिली, या कारणावरून ७ते ८ जणांच्या टोळक्याने एकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दि. १५ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली असून, या हल्ल्यात पीडित व्यक्तीसह त्यांचे कुटुंबही जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील असोदा येथे अमजद समद शेख (वय ४२) हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रविवारी दुपारी ३ वाजता, ‘तू मला खुन्नस का दिली?’ असा जाब विचारत काही जणांनी अमजद शेख यांना घेरले आणि बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर भांडण सोडवण्यासाठी अमजद शेख यांची पत्नी आणि भाऊ धावून…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या रोहित समाधान पवार (वय १८, रा. निभोरा, ता. धरणगाव) या विद्यार्थ्याने मंगळवारी दुपारच्या सुमारास वस्तीगृहातच हॅलो मित्रांनो मी आयडी बंद करतो आहे, कारण तीला प्रॉब्लम येत आहे, असे इन्टाग्रामवर स्टोरी ठेवत गळफास घेत आत्म्हत्या केली. आत्महत्येच्या काही तासांपुर्वीच रोहीतचे वडील व काका त्याल भेटून गेले आणि त्यानंतर काही वेळातच ही घटना घडली. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथे राहणारा रोहित पवार हा जळगाव येथील शासकीय आयटीआयमध्ये मशिनीस्ट ट्रेंडच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. मंगळवार दि. १७ रोजी सकाळी त्याचे वडील…
जळगाव : प्रतिनिधी पोलिस दलाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावरील अपहार प्रकरणात अटकेत असलेल्या व्यवस्थापक उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ व त्यांचा मुलगा शेखर वाघ यांच्या पोलीस कोठडी संपली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्या पिता-पुत्रांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस दलाच्या वेल्फेअर विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या दक्षता पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक म्हणून नियुक्त असलेल्या उपनिरीक्षक वाल्मिक वाघ याने १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार केला होता. याप्रकरणी उपनिरीक्षक वाल्मीक वाघ व त्यांचा मुलगा शेखर वाघ या दोघांना अटक करण्यात आले आहे. वाघ यांच्याघराची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून १२ लाख ७३ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे. त्या दोघ पिता-पुत्रांच्या…
पाचोरा : प्रतिनिधी पाच हजारांच्या स्टॅम्प घेण्यासाठी अतिरीक्त पाचशे रुपयांची लाच घेतांना स्टॅम्प वेंडर योगेश ईश्वरलाल संघवी (वय ४९) व झेरॉक्स दुकानदार प्रशांत ईश्वरलाल संघवी (दोघ रा. विवेकानंद नगरी, पाचोरा) यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवार दि. १७ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे दि. १५ रोजी पाचोरा शहरातील भडगारस्त्यावर असलेल्या प्रशांत झेरॉक्स दुकानात पाचशे रुपयांचे दहा स्टॅम्प घेण्यासाठी गेले होते. त्यांना स्टॅम्प वेंडर योगेश संघवी यांनी एका स्टॅम्पची किंमत ५५० रुपये सांगितली. तसेच तक्रारदार यांच्याकडे आधारकार्ड नसल्यामुळे त्यांना आधारकार्ड घेवून या तेव्हाच तुम्हाला स्टॅम्प मिळतील असे…
आजचे राशिभविष्य दि.१८ मार्च २०२६ मेष राशी आजचा तुमचा दिवस प्रगतीचा आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचं चीज होणार आहे. पण एखाद्या सहकाऱ्याचं बोलणं तुम्हाला वेदना देऊ शकतं. तुमचं एखादं सरकारी काम बऱ्याच काळापासून लटकलेलं असेल तर ते काम आज पूर्ण होण्याचे संकेत आहेत. जमीनजुमल्याशी संबंधित प्रकरणावर विशेष लक्ष द्या. दुसऱ्यांचं ऐकून मन विचलित करून घेऊ नका. तुमच्या लक्ष्यावर फोकस ठेवा. आरोग्याच्या बाबत सतर्क राहणे इष्ट ठरेल. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी भलताच आनंदाचा असणार आहे. कोणत्याही कामात घाईत निर्णय घेऊ नका. नाही तर परिणाव वेगळे येतील. तुमची ऊर्जा आणि उत्साह आज कायम राहिल. त्यामुळे तुम्ही तुमची कामे पटापट पूर्ण कराल. कुटुंबातील…
सोलापूर : वृत्तसंस्था दहावी बोर्डाच्या उद्याच्या भूगोल विषयाच्या पेपरबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला असून सांगोला येथील एका परीक्षा केंद्रातून प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पेपरच्या गोपनीयतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित पेपर रद्द होणार की नवीन प्रश्नपत्रिका संच पुरवला जाणार, याबाबत शिक्षण मंडळाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांचे लक्ष आता मंडळाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. राज्यात सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असून १८ मार्च रोजी भूगोल विषयाचा पेपर नियोजित होता. मात्र, त्याच्या आदल्या दिवशीच सांगोला शहरातील विद्यामंदिर परीक्षा केंद्रातील स्ट्राँग रूम फोडून भूगोल विषयाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची घटना…
पुणे : वृत्तसंस्था पुण्यातील ओतूर येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालय मध्ये दहावीची परीक्षा सुरू असतानाच एका विद्यार्थ्यावर भयंकर हल्ला घडला. सोमवारी सकाळी एका अल्पवयीन आरोपीने परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला. विद्यार्थ्याने वार हातावर झेलल्यामुळे मोठा अपघात टळला, मात्र तो जबर जखमी झाला. ओतूर पोलीसांनी आरोपीसह इतर ४ जणांना ताब्यात घेतले असून, प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्यातून घडल्याचे समोर आले आहे. जखमी विद्यार्थ्यावर तातडीने औषधोपचार करण्यात आले, त्यानंतर त्याने रायटरच्या मदतीने परीक्षा पूर्ण केली. महाविद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणाले की, घटना सकाळी १०.३५ वाजता घडली आणि त्या वेळी वर्गात कोणताही शिक्षक किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. केंद्रात सुरक्षेसाठी पोलिस आणि आरोग्यकेंद्राचे…
भुसावळ : प्रतिनिधी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे १४ मार्च २०२६ रोजी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झालेल्या शादाब रईस कुरेशी (वय ३५) या सराईत गुन्हेगाराला भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी सापळा रचून अटक केली. तपासात पोलिसांना कुरेशीकडून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि मॅगझीन जप्त झाले असून, तो भुसावळात मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने आला होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशानुसार बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत होते. याच दरम्यान, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त माहिती मिळाली की, बस स्थानकाजवळील रिक्षा स्टॉप परिसरात शस्त्रासह…

